Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी हे पत्नीवर संशय घेऊन मारहाण करत.. गश्मीरच्या आईचा खुलासा

Ravindra Mahajani Wife

Ravindra Mahajani Wife: दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांचे नुकतंच ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. यात माधवी महाजनी यांनी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या विषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. अभिनेते रवींद्र महाजनी हे पत्नी माधवी यांच्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत असल्याचाही धक्कादायक खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांची ही दुसरी बाजू समोर येत असल्याने त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसलाय. पण रवींद्र महाजनी यांच्या अत्यंत दुखद निधनानंतर ते परिवारापासून दूर एकटेच का राहत होते? त्यांचे आणि त्यांच्या परिवारात नेमके काय बिघडले होते? असे अनेक प्रश्न त्यांच्या असंख्य चाहत्यांना पडले होते. त्याचेच उत्तर माधवी महाजनी यांनी या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे. (actor ravindra mahajani was beating his wife she revealed in her book chautha anka)

अभिनेते रवींद्र महाजनी हे संशय घेऊन मारहाण करत असल्याचे सांगताना माधवी यांनी यामागचे कारण आणि घटना सुद्धा या पुस्तकात सांगितले आहे. माधवी यांनी लिहिल्या प्रमाणे पुण्याजवळील एक वादग्रस्त जमीन विकण्यासाठी रवींद्र महाजनींचा एक मित्र त्यांच्या मागे लागला होता. रवींद्र महाजनींची एका इन्कम टॅक्स कमिशनरची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या या ओळखीचा फायदा घेऊन ही वादग्रस्त जमीन विकली जावी, यासाठी त्यांचा तो मित्र रवींद्र यांच्या मागे लागला होता. पण रवींद्र यांनी यात पडू नये असं माधवी यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी बेकायदेशीर गोष्टींत रवींद्र यांना न पडण्याचा सल्ला दिला आणि रवींद्र यांनी पत्नीचा हा सल्ला ऐकला. पण हा व्यवहार न झाल्यामुळे रवींद्र यांचा तो मित्र माधवी यांच्यावर नाराज झाला आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठी तो माधवी यांच्याविरुद्ध रवींद्र यांचे कान भरू लागला.

या मित्रामुळे रवींद्र महाजनी हे पत्नीवर संशय घेऊन त्यांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक खुलासा माधवी यांनी पुस्तकात केला आहे. याबद्दल माधवी यांनी या पुस्तकात लिहिलंय की “अलीकडे रवी कोल्हापूरच्या त्याच्या चांगल्या मित्राबद्दल संशय घेऊन मला मारू लागला होता. खरंतर हा माणूस तसा स्वभावानं चांगला होता. तो उलट रवीला सांगत असे की, “तू वहिनींच्या चारित्र्याबद्दल संशय घेणं बरोबर नाही. मी तर किती वर्षांपासून वहिनींना ओळखतो. तू त्यांच्याशी नीट वाग.’ पण झालं उलटंच. जो लबाड होता तोच रवीला चांगला वाटत होता आणि जो रवीचा हितचिंतक होता त्याच्याबद्दल रवीनं गैरसमज करून घेतला होता.”

यापुढे माधवी असं म्हणाल्या की “दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पुन्हा तो मित्र व रवी दोघे त्या तथाकथित ज्योतिषाकडे गेले. त्याने पत्रिका पाहिल्यावर माझी निंदा करायला सुरुवात केली. “ही तुमच्याशी एकनिष्ठ नाही. हिचं तुमच्या मित्राशी अफेअर आहे. ही तुमच्या पाठीत खंजीर खुपसतेय वगैरे वगैरे…” मला पुष्कळ नावंही ठेवली. रवींद्रचा स्वभाव आधीच संशयी बनला होता. त्यात या गोष्टीमुळं भरच पडली. ज्योतिषानं रवीच्या त्या चांगल्या मित्राचं नाव माझ्याशी जोडून ह्या दोघांचे संबंध असल्याचं त्याला सांगितलं. रवींद्रच्या त्या मित्रानं त्या ज्योतिषाला आधीच सांगून ठेवलं होतं. नंतर असंही कळलं की, ते दोघे बांधकाम व्यवसायात पार्टनर होते. याचा अर्थ मी रवीला जागेबाबत जो सल्ला दिला, त्यामुळे त्या मित्राचं आर्थिक नुकसान झालं होतं आणि त्याचा तो अशा तऱ्हेने सूड घेऊ पहात होता. दुर्दैवानं त्याला तशी संधीही मिळाली. रवीचा माझ्यावरचा विश्वास उडला होता. त्यामुळे तो सहज त्याच्या डावाला बळी पडला.” असा धक्कादायक खुलासा माधवी यांनी केला आहे.

ImageProductFeaturesPrice
Our Pick1
chautha anka book
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top