Raj Thackeray’s MNS on Ajit Pawar: “धमक होती तर काढा ना स्वतःचा पक्ष..” मनसेचा अजित पवारांवर निशाना

old video of Ajit Pawar

Raj Thackeray’s MNS on Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या पक्ष फुटीचे ग्रहण लागले आहे. अगोदर शिवसेनेत फुट पडून मुळात बाळासाहेब ठाकरेंचा असलेला पक्ष एकनाथ शिंदेंना मिळाला. आताही निवडणूक आयोगाने तसाच निर्णय देत मुळात शरद पवारांचा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेल्या अजित पवार यांना दिला आहे. यावरच आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. (Raj Thackeray’s MNS party shared a old video of Ajit Pawar)

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना पक्ष सोडला होता. पण त्यांनी शिवसेना पक्षावर अधिकार न सांगता स्वतःचा नवीन मनसे हा पक्ष निर्माण केला आणि तो महाराष्ट्रभर वाढवला. पण आता पक्षच हिसकावून घेण्याची परंपरा सुरु झालीय. यावर राज ठाकरेंच्या मनसेने म्हटलेय की “बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !” अशी प्रतिक्रिया मनसे पक्षाने दिली आहे.

Raj Thackeray's MNS on Ajit Pawar
Raj Thackeray’s MNS on Ajit Pawar

तसेच मनसेने त्यांच्या ट्विटर पेजवर अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाना साधलाय. या व्हिडिओत अजित पवार हे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष हिसकावल्या वरून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधत म्हणाले होते की “अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि तो वाढवला, मुंबईच्या शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतलात. त्यांचं चिन्ह काढून घेतलंत. निवडणूक आयोगाने जरी निर्णय दिला असला तरी हा निर्णय जनतेला पटलाय का, त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर स्वतःचा पक्ष काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं?” असं अजित पवार तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत म्हणाले होते.

पण आता अजित पवार यांनी स्वतःही तेच केलंय, जे तेव्हा एकनाथ शिंदे यांनी केले होते. यावरच अजित पवारांचा हा जुना व्हिडिओ शेअर करत मनसेने त्यांच्यावर निशाना साधत म्हटलंय की “‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या…!”

अशा प्रकारे सध्या राज ठाकरेंच्या मनसेने अजित पवारांचे जुने व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाना साधला आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top