World Cup 2023 Final: क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या काल झालेल्या फायनल मैच मध्ये भारतीय टीमचा पराभव झाला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीमने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत सलग 10 सामने जिंकले. भारताने सर्व टीमला हरवल्याने असं वाटलं होतं की भारतीय टीम हि फायनल मैच सुद्धा जिंकणार. पण असं झालं नाही. वर्ल्ड कप 2023 ची 11 वी मैच मात्र भारतीय टीम पराभूत झाली. (Marathi Actor about India lost in India Vs Australia Cricket World Cup 2023 Final)
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारतीय संघाचा 6 विकेटने पराभव केला. भारतीय टीमने दिलेल्या 241 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 43 ओव्हर्स मध्ये 6 विकेट्स शिल्लक असताना सहज गाठलं. फायनल मध्ये झालेल्या या पराभवामुळे सर्व भारतीयांची मनं तुटली. सर्व भारतीय खेळाडूंचे स्वप्न भंगले. भरमैदानात भारतीय क्रिकेटर्सना अश्रू अनावर झाले. भारतीय टीमला हा वर्ल्ड कप जिंकण्याची खूप चांगली संधी होती पण त्यांनी ती गमावली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये सर्व खेळाडूंना धीर देतांना दिसले.
भारतीय टीम वर्ल्ड कप हरल्यामुळे आता सोशल मिडीयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी भारतीय टीमचा फायनलमध्ये पराभव का झाला याचे वेगवेगळे कारणे सांगितली आहे. यात काही जण भारतीय टीम आणि कॅप्टन रोहित शर्मा कुठे चुकला याविषयी बोलत आहेत. तर काहींनी चुकीच्या मैदानावर फायनल मैच ठेवल्याने BCCI आणि जय शाह यांच्यावर निशाना साधलाय. 2011 प्रमाणे याही वर्षीची वर्ल्डकप फायनल मैच मुंबईतील वानखेडे मैदानावरच व्हायला हवी होती असं अनेकांनी म्हटलंय.
भारताच्या पराभवानंतर बऱ्याच मराठी कलाकारांनी नाराजी व्यक्ती केली. काही जणांनी तर भारतीय टीमचा पराभव होणार असं दिसताच टीव्ही बंद केला. अनेक मराठी कलाकारांनी तर अंतिम सामना हा वानखेडेलाच झाला पाहिजे होता असं मत व्यक्त केलं आहे. तसेच फायनल मैच सुरु असतांना भारतीय टीम पराभूत होणार हे दिसत असतांना अनेक मराठी कलाकारांनी नाराज होऊन tv बंद केली.
पण साहजिकच आहे की अमित शाहचा मुलगा जय शाह हा गुजराती असल्याने त्याने त्याच्या घरेलू मैदानावर म्हणजेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हि मैच ठेवली. पण येथेही भारतीय टीमने अनेक मैच जिंकल्या आहे. खरंतर काल भारतीय टीमचा पराभव हा प्रचंड दबाव असल्याने झाला आहे. फायनल मैच तेही ऑस्ट्रेलिया विरुद्ध. त्यात मैच बघण्यासाठी अनेक मोठ मोठे सेलेब्रिटी आलेले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच इतर अनेक राजकारणी आणि बॉलीवूडचे अनेक सुपरस्टार मैदानात हजर होते. या सर्वांसमोर चांगला खेळ दाखवण्याचा दबाव भारतीय टीमवर होता.
या प्रचंड दबावात खेळत असतांना भारताची बॅटिंग खराब झाली. जिथे 300 च्या पुढे स्कोर करणे गरजेचे होते तेथे भारतीय टीम फक्त 240 रण बनून ऑल आउट झाली. बॉलींग मध्येही विकेट घेण्यात भारतीय टीम अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड हा भारतीय टीमसाठी मोठी डोकेदुखी ठरला. त्याने फायनलमध्ये शानदार शतक ठोकत ऑस्ट्रेलिया टीमला सहज विजय मिळवून दिला. क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या फायनल मध्ये भारतीय टीमच्या दृष्टीने नक्कीच ठीक नव्हते. पण या पराभवास फायनल मैच अहमदाबाद मधेच खेळवण्याचा अट्टाहास सुद्धा कारणीभूत ठरला आहे.