आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चे असणारे राज्याचे सध्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांविषयी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील शेतकरी त्यांच्यावर संतापल्याचे दिसत आहे.
या अगोदर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) शेतकऱ्यांविषयी म्हणाले होते की “हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली.” असं वक्तव्य केल्याने मंत्री कोकाटे यांच्यावर खूप टीका झाली होती.
यानंतर आता पुन्हा एकदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलंय की “पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जमाफी (Loan Waiver) झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात, त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का?” असा प्रश्न करत कोकाटे पुढे म्हणाले की “सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये (Farm) गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत, सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा.” असं वादग्रस्त वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या शेतकऱ्यांबद्दलच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता संपूर्ण राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच राज्यातील शेतकरीही त्यांच्यावर संतापल्याचे दिसत आहे.
या मुद्यावरुन किसान सभा देखील आक्रमक झाली आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम म्हणून शेतकरी किती अडचणीत आहेत याची काडीची जाणीव नसल्यानेच कृषीमंत्री मामिकराव कोकाटे यांनी असे विधान केले असल्याची टीका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
सरकारच्या धोरणाकडे कानाडोळा करुन माणिकराव कोकाटे सारखी माणसे अशी विधाने करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचे अजित नवले म्हणाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली होती. अशा उथळ व सहिष्णुता नसलेल्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. लोकांनी अशी माणसे निवडून दिल्याचा पश्चाताप होत असल्याचे अजित नवले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त केले पाहिजे अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
राज्यभरातून प्रचंड टीका झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आता tv न्यूज चैनेलवर त्यांच्या शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. हा लेख शेअर करायला विसरू नका.
इतर अधिक माहितीसाठी आपल्या मराठीजन या वेबसाईटला फॉलो करा, तसेच आपले App डाउनलोड करा – Download App