Ramsha Faruki won Jau Bai Gavat: बिग बॉस सारखाच पण वेगळी संकल्पना असलेला झी मराठीचा नवीन रिअॅलिटी शो जाऊ बाई गावात या शो चा महाअंतिम सोहळा 11 फेब्रुवारी रोजी पार पडला. यात रमशा ही जाऊ बाई गावात या शोच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली.
4 डिसेंबर पासून साताऱ्यातील बावधन या गावात शुटींग होत असलेल्या जाऊ बाई गावात या शो च्या महाअंतिम सोहळास आदेश बांदेकर, महेश मांजरेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यासह कुशल बद्रिके, शिवा मालिकेचे कलाकार आणि पारू मालिकेच्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
अभिनेता हार्दिक जोशी हा सूत्रसंचालक असलेला जाऊ बाई गावात या शो च्या रमशा फारुकी (Ramsha farooqui), संस्कृती साळुंके (Sanskruti Salunke), रसिका ढोबळे (Rasika Dhobale), श्रेजा म्हात्रे (Shreyja Mhatre), अंकिता मेस्त्री (Ankita Mestry), या पाच मुली या वर्षीच्या top 5 स्पर्धक ठरल्या होत्या. यापैकी संस्कृती, रमशा आणि अंकिता या तीन फायनलिस्ट ठरल्यानंतर विजेती कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
या top 3 पैकी अंकिता आणि रमशा या दोघींमध्ये महाअंतिम फेरीत चुरशीची लढत रंगली. यात रमशा फारुकी हिने बाजी मारत ती या पहिल्याच सीजनची विजेती ठरली. रमशाला बक्षीस स्वरूपात 20 लाख रुपयांचा धनादेश आणि विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली.
अंकिता मेस्त्री ही जाऊ बाई गावात या शोची उपविजेती ठरली. तर संस्कृती साळुंके ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
जाऊ बाई गावात या शोचा हा पहिलाच सीजन होता. नवीनच संकल्पना असल्याने सुरुवातीला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, पण गावाकडच्या मातीत एक खेडगावात तेथील लोकांसोबत राहून शहरातील मुलींना तेथे सांगितलेले कामे एका टास्क प्रमाणे करावे लागत होते. त्यामुळे हळूहळू प्रेक्षकांना हा शो आवडू लागला. आता हा पहिला सीजन संपल्याने पुढचा दुसरा सीजन कधी सुरु होणार याची प्रेक्षकही आतुरतेने वाट बघत आहे.
रमशा फारुकी ही जाऊ बाई गावात या शोच्या पहिल्या सीजनची विजेती ठरल्याबद्दल तिचे अभिनंदन.