Navra Maza Navsacha 2 Star Cast: नवरा माझा नवसाचा 2 मध्ये झळकणार हे कलाकार

Navra Maza Navsacha 2 Star Cast: प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येतोय. नुकतंच या दुसऱ्या भागात कोणते कलाकार झळकणार हे जाहीर करण्यात आलंय. (navra maza navsacha 2 star cast ashok saraf sachin pigaonkar)

अभिनेते तसेच निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे आता पुन्हा एकदा तब्बल 19 वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटासाठी निवडण्यात आलेल्या कलाकारांची माहिती सचिन पिळगावकर यांनी दिली आहे.

नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार असे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकणार आहे.

‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट 2004 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आणि आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. नवरा माझा नवसाचा चित्रपटात आपल्याला गणपती पुळेच्या सहलीची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी गणपती बाप्पाचं दर्शन घडलं. आता या दुसऱ्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार? तसेच या प्रवासात कोणकोणते ट्विस्ट येणार? आणि यामुळे काय धम्माल उडणार हे सर्व आपल्याला ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटात बघायला मिळेल.

नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या पहिल्या भागात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर हे कलाकार झळकले होते. पण आता यापैकी रीमा लागू, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, आनंद अभ्यंकर या कलाकारांचं निधन झालं आहे.

पण आता या दुसऱ्या भागात काही नवीन कलाकारांसोबत अनेक जुने कलाकार तेच असणार आहे. या नवीन भागात कहाणी काय असणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही फार उत्सुक आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त