अभिनेत्री तितीक्षा तावडे चा हा आहे खरा बॉयफ्रेंड – मालिकेच्या सेटवर मैत्री आणि प्रेम | Titeekshaa Tawde Boyfriend

titeekshaa tawde real boyfriend

Titeekshaa Tawde Boyfriend: सध्या सिनेसृष्टीत एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता अजून एका अभिनेत्रीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (Marathi actress Titeekshaa Tawde real boyfriend Siddharth Bodake)

अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी या अगोदरही अनेकवेळा एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत, त्यावरुन चाहत्यांनी अनेकदा त्यांच्या प्रेमाबाबत चर्चा केली होती. मात्र तेव्हा दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. आता मात्र तितीक्षा व सिद्धार्थने त्यांच्या या डेटच्या चर्चांना पूर्णविराम देत ते लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. तितीक्षा तावडेने सिद्धार्थ बोडकेबरोबरचा केळवणाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. “त्याने मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेटचं केळवणात रुपांतर झालं” असं तितीक्षाने या फोटोखाली म्हटलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेमध्ये काम करताना दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी बरेचदा एकत्र फोटोही शेअर केलेले पाहायला मिळाले.

अभिनेता सिद्धार्थने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तसेच तो ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतही झळकला होता. सिद्धार्थने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह ‘दृश्यम 2’ या चित्रपटातही काम केलं आहे. नुकताच तो ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटामध्येही झळकला होता. त्याच्या ‘अनन्या’ या नाटकातील भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.

अभिनेत्री तितीक्षा तावडे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री खुशबू तावडे हिची बहिण आहे. तितीक्षा तावडे ही आतापर्यंत ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचे लग्न होणार असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सुभेच्छा.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top