राज ठाकरेंनी मराठी कलाकारांची कानउघडनी केल्यानंतर अशी आहे कलाकारांची प्रतिक्रिया | Raj Thackeray on Marathi Actors

Marathi actor Reaction on Raj Thackeray

Marathi actor Reaction on Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांनी एकमेकांचा मान राखला पाहिजे असा सल्ला दिलाय. आता यावर अनेक मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहे. यात अनेक मराठी कलाकार हे राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत आहे.

राज ठाकरेंनी केली कानउघडणी

हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार सुपरस्टार आहेत. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत एकही सुपरस्टार झालेला नाही. यावर मराठी कलाकारांची कानउघडणी करत राज ठाकरे यांनी 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात म्हटलंय की “मराठी कलाकार एकमेकाकांचा मान राखत नाही. तुम्ही एकमेकांना लोकांसमोर, मंचावर आणि इतर ठिकाणी आद्या, पद्या, शेळ्या, मेंढ्या अशा हाका मारत राहिलात, पुष्प्या आलाय…आंड्या आलाय… असं तुम्ही भर मंचावर आणि शेकडो लोकांसमोर बोलता, ही सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळेच आज मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार नाही. मराठीत कलावंत आहेत, पण स्टार नाही.

तुम्ही जर तुमचा मान राखला नाही, तर लोक का तुम्हाला मान देतील?” असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना उद्देशून म्हटलं होतं. दक्षिण भारतात जसे तेथील कलाकार एकमेकांचे पर्सनली कितीही चांगले मित्र असले तरीही ते एकमेकांना स्टेजवर सर असं म्हणतात. एकमेकांचा रिस्पेक्ट करतात. तसंच मराठी कलाकारांनी सुद्धा एकमेकांचा रिस्पेक्ट करायला हवा असंही राज ठाकरे म्हणाले.

आनंद इंगळे यांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता मराठी कलाकारांच्या सुद्धा यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. यात सर्वच कलाकार राज ठाकरेंच्या या वक्तव्याशी सहमत असल्याचे दिसत आहे. नुकतंच अभिनेते आनंद इंगळे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. रेडिओ सिटी मराठी या रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते आनंद इंगळे म्हणाले की “या अगोदरही राज साहेबांशी बोलताना अनेक वेळेला हा विषय निघाला होता. ते असं जाहीरपणे म्हणतील याचा मला सुखःद धक्का बसलाय. ते म्हणतायत तो मुद्दा मला 100 टक्के पटतो.

कोणी तरी मला माझ्या टोपणनावाने हाक मारून माझी किंमत कमी होते असं नाहीये. पण सगळ्याच जणांसाठी सगळ्या गोष्टी नसतात. हे जसं आपण कलाकारांनी पाळलं पाहिजे. तसंच वेगवेगळ्या चॅनेलवरच्या कार्यक्रमांमध्ये किंवा पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर विनोद करणंही थांबलं पाहिजे. काही कार्यक्रमांमधून मी अत्यंत कुचका आणि सतत किचकिच करणारा माणूस आहे, असं विनोद म्हणून जे केलं जातं, तेव्हा मला असं वाटतं. आपणच ही गोष्ट जपायला हवी. नॅशनल टेलीव्हिजनवरून जपायला हवी. वैयक्तिक आयुष्यात जपायला हवी. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे राज साहेबांचं म्हणणं मला 100 टक्के पटतं”. असं अभिनेते आनंद इंगळे यांनी म्हटलंय.

तेजस्विनी पंडितची प्रतिक्रिया

तसेच राज ठाकरेंच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ शेअर करत मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मिडीयावर म्हटलंय की “थेट, परखड आणि 100 टक्के बरोबर राजसाहेब!” यावरूनच तेजस्विनीने राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमती दर्शविली आहे.

आता स्वतः राज ठाकरेंनीच कानउघडनी केल्यानंतर तरी सर्वच मराठी कलाकार प्रेक्षकांसमोर एकमेकांचा मान राखतील अशी आशा आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top