Ashwini Mahangade Brother: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा भाऊ झाला उपसरपंच, “तू फार संयमी बाबा…”

Ashwini Mahangade Brother

Ashwini Mahangade Brother: आई कुठे काय करते या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे ही तिच्या सामाजिक सेवेमुळे सतत चर्चेत असते. पण आता मात्र ती राजकीय कारणामुळे चर्चेत आलीय. (aai kuthe kay karte actress ashwini mahangade brother badrinath became upsarpanch)

अभिनेत्री अश्विनी महांगडेचा भाऊ बद्रीनाथ महांगडेची उपसरपंचपदी निवड झाली आहे. अश्विनीने इन्स्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा भाऊ बद्रीनाथ हा उपसरपंच झाल्यानंतर तिने भाऊ बद्रीचे अनेक फोटो शेअर केले आहे. यातील एक फोटोत अभिनेत्री अश्विनी आणि भाऊ बद्री हे त्यांच्या परिवारासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत अश्विनीने जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटलंय की “बद्री ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला त्या दिवशी हा फोटो काढला होता. राजकारणाचे धडे गिरवायचे तर सुरुवात होते ती याच निवडणुकीपासून. नाना कायम म्हणायचे विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित ठेवावा. कारण निवडून आलेला माणूस हा सगळ्यांचा असतो, जे मत देत नाहीत त्यांचाही. राजकारणाला कायम समाजकारणाची जोड हवी. कारण हा सगळा पसारा फक्त आणि फक्त समाजासाठी उत्तम काम करता यावे या साठी असतो. आम्ही तयार झालो #नानांच्या तालमीत. बद्री…. अभिनंदन, शुभेच्छा आणि आशीर्वाद…” असं अश्विनी महांगडे म्हटले आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडेचा भाऊ बद्रीनाथ महांगडे हा आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावाचा उपसरपंच झाला आहे. याबद्दल भावाचे कौतुक करत अभिनेत्री अश्विनीने म्हटलंय की “तू फार संयमी बाबा… शांत आणि फक्त शांत. तू आज पसरणी गावचे #उपसरपंच म्हणून पदभार स्विकरल्याबद्दल अभिनंदन…. तुझ्या हातून नानांच्या आशीर्वादाने उतमोत्तम कामे व्हावी.. आपल्याला राजकारणाचा वसा देणाऱ्या #नानांनी समाजासाठी कामी येणे किती महत्त्वाचे आहे हेच कायम मनी रुजवले.
आज या महत्त्वाच्या घटनेसाठी जे जे तुझ्यापाठी उभे राहिले त्यांची मी कायम ऋणी राहीन…” असं अश्विनी महांगडेने म्हटलंय.

अभिनेत्री अश्विनी महांगडेचा भाऊ बद्रीनाथ महांगडे हा उपसरपंच झाल्याबद्दल अभिनंदन.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top