Nana Patekar: नाना पाटेकरांचा रागटपणा, चाहत्याला मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माफीनामा

nana patekar apology 1

प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या एका कृत्यामुळे खूप चर्चेत आले आहे. खरंतर या कृत्यामुळे ते खूप ट्रोल होता आहे. संपूर्ण भारतातून त्यांच्यावर टीका होत आहे. शुटींग मध्ये व्यत्यय आणल्याने रागाच्या भरात नानांनी त्यांच्या एका चाहत्याला मारल्याचा प्रकार घडला आहे. यावर आता नानांनी माफी सुद्धा मागितलीय. (Actor Nana Patekar Apology for Slapping a Fan)

नाना पाटेकर यांचा रागट स्वभाव

अभिनेते नाना पाटेकर हे खूप तापट असल्याचे इतर कलाकार म्हणत असतात. त्यांना पटकन राग येतो असं म्हटलं जातं. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार नाना सोबत काम करायला घाबरतात. यातच आता नाना पाटेकर यांच्या रागटपणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एका सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला डोक्यावर जोरदार फटका मारताना दिसत आहे. इतकंच नाही तर ते रागाने त्या मुलावर ओरडतानाही दिसले. नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. नानांच्या या कृत्यावरून आता त्यांना खूप ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

चित्रपटाचे शुटींग सुरु असतांना घडला प्रकार

अभिनेते नाना पाटेकर हे सध्या ‘गदर २’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘जर्नी’ या चित्रपटात झळकणार आहेत. याचेच सध्या उत्तर प्रदेश मधील वाराणसीमध्ये शुटींग सुरु आहे. या चित्रपटाची कथा डिमेन्शियाने ग्रस्त वडील आणि त्यांचा मुलगा यांच्यातील नात्याभोवती फिरते. यात दिग्दर्शक अनिल शर्मांचा मुलगा उत्कर्ष हा सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे.

वाराणसीमध्ये याच चित्रपटाचं शूटिंग सुरु असतांना एक चाहता तिथे सेल्फीसाठी येतो. शूटिंग चालू असताना त्याने सेल्फीसाठी शॉटमध्ये व्यत्यय आणल्याने नाना यांना राग अनावर झाला व त्यांनी त्याच्या डोक्यावर जोरदार फटका मारला. नाना रागाने त्या मुलावर ओरडतानाही दिसले. यांनतर त्या मुलाला तेथून हुसकावण्यात आले. हे सर्व एका व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालं. अनेकांनी नानांचा हा व्हिडीओ बघून त्यांच्यावर खूप टीका केली. पण आता या घडलेल्या प्रकाराबद्दल नानांनी माफी मागितली आहे.

नाना पाटेकर यांचा माफीनामा

याविषयी नाना पाटेकर म्हणाले आहे की “काल जो व्हिडीओ दिवसभर व्हायरल झाला त्याचे मी इथे स्पष्टीकरण देतो की आम्ही जर्नी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्यात मी एकाला कानाखाली वाजवतो असा एक सिन असतो तो व्यक्ती माझ्या डोक्यावरची टोपी हलवतो म्हणून मी तसे करतो असा तो सिन होता. या सिनचा एक टेक झाल्यानंतर आम्ही पुन्हा तो सिन रिटेक केला पण तेवढ्यात दुसरीच कोणीतरी व्यक्ती माझ्याकडे आली.

मला वाटलं तो आमच्याच टीमचा व्यक्ती आहे म्हणून मी त्याला सीनमध्ये सांगितल्याप्रमाणे मारत असतो. त्यानंतर त्याला बाजूला जायला सांगतो. पण हा क्रू मेम्बर नसल्याचे मला सांगण्यात आले. तेव्हा हे चुकून घडलं असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्या व्यक्तीची माफी मागण्यासाठी त्याला शोधत होतो पण तोपर्यंत तो व्यक्ती तिथून निघून गेलेला होता. त्याच्याच कोणी मित्राने हा व्हिडीओ शूट केला असावा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.” असं नाना म्हणाले आहे. तसेच त्यांनी हात जोडून त्या चाहत्याची माफी सुद्धा मागितली आहे.

तसेच पुढे नाना पाटेकर म्हणाले आहे की “मी कधीच कोणाला असं करत नाही. सगळ्यांना फोटो काढून देत असतो. ही गोष्ट मी जाणूनबुजून केलेली नाही. प्रेक्षक आम्हाला नेहमीच सपोर्ट करत असतात. त्यावेळी तेथे खूप गर्दी होती पण लोकांकडून कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही. लोकांचं एवढं प्रेम मिळत असतं त्यामुळे कधीच कोणती अडचण येत नाही. पण ही जी घटना घडली ती चुकून घडली मी त्याची माफी देखील मागायला तयार होतो पण तो व्यक्ती तिथून निघून गेला होता.” असं म्हणत नाना पाटेकर यांनी त्या मुलाची माफी मागितली आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top