Bigg Boss Show Review

Bigg Boss Review: बिग बॉस हा फडतूस आणि खोटा शो बघणारे रिकामटेकडेच

Bigg Boss Review: दरवर्षीप्रमाणे या हि वर्षी बिग बॉस हा प्रसिद्ध रियालिटी शो पुन्हा सुरु झाला आहे. हा बिग बॉस हिंदीचा 17 वा सीजन आहे. आणि आता लवकरच बिग बॉस मराठी चा 5 वा सीजन सुद्धा सुरु होत आहे. बिग बॉस च्या या 17 व्या सिजानलाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसतेय. म्हणजेच भारतात रिकामटेकडे लोक भरपूर आहे. बिग बॉस सारखा फडतूस शो ला प्रेक्षकांची एवढी पसंती मिळतेय म्हणजेच आपल्या देशातील लोकांना खोटेपणा बघण्याची जास्त आवड आहे हेच सिद्ध होतंय.

बिग बॉस हा खरंच एक फडतूस आणि खोटा शो आहे. बिग बॉस च्या घरात कसं वागायचं, कधी भांडायचं, कधी गोड व्हायचं, फुटेज कसं आपल्यावरच राहील याचा प्रयत्न कसा करायचा हे सर्व घरात एन्ट्री घेण्याअगोदरच ठरलेलं असतं. आणि मग जो खोटा खोटा प्लॅन ठरलेला आहे त्यानुसार घरात वागायचं. हे आता सर्वच स्पर्धक करत असतात. सर्व स्पर्धक फुतेज सारखं त्यांच्यावर कसं राहील याचे प्रयत्न करत असतात.

कपल जोडी तर पूर्ण प्लॅनिंग करूनच घरात येतात. एकमेकांशी कसं भांडायचं कसं गोड व्हायचं हे ठरवून येनचे घरात रुसवे फुगवे सुरु असतात. एकमेकांवर खोटे खोटे ओरडतात. भांडणाचा दिखावा करत फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे बिग बॉस च्या प्रत्येक सीजन मध्ये घडत असल्याचे बघायला मिळत आहे.

मला आश्चर्य वाटतं की असा फडतूस आणि खोटारडा शो लोक कसं काय बघू शकतात. त्याचे कारण हेच की भारतात खूप बेरोजगारी आहे. त्यामुळे रिकामटेकडे लोक जास्त आहे. हे रिकामटेकडे लोक बिग बॉस बघतात आणि कोण कोणाशी भांडलं, कोण बरोबर, कोण चूक, या अशा फालतू गोष्टींची तासंतास सोशल मिडियावर चर्चा करत बसतात. मग असं वाटतं की यांना खरंच काहीच कामं नाही का? बाहेर काही काम मिळत नसेल हे समझू शकतो पण घरातली तर कामं करा. रिकामटेकडे असलो तरी बिग बॉस सारखं फडतूस शो बघण्यापेक्षा आई वडिलांची सेवा तर करूच शकतात.

काही स्पर्धक तर फक्त हा शो जिंकण्यासाठी खोटे प्रेमाची नाटकं सुद्धा करतात. काहीवेळा यातील स्पर्धक खुलेआम सिगरेट पितांना दिसतात. अनेकवेळा तर काही महिला आणि पुरुष स्पर्धकांमध्ये किसिंग सीन किंवा बेड सीन सुद्धा बघायला मिळाला आहे. त्यामुळे या शोला आता पारिवारिक शो तर म्हणताच येणार नाही. पण चैनेल कडून या शो चे प्रमोशन पारिवारिक शो असं म्हणूनच केलं जातंय. हा शो म्हणजे एकंदरीतच तरुण मुलं बिघडवण्याला प्रोत्साहन देणारा शो आहे.

जे लोक बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक म्हणून जातात. त्यांच्यासाठी हे त्यांच्या करियरचा एक भाग आहे. त्यातून त्यांना पैसे मिळतात. जेवढे जास्त दिवस ते बिग बॉसच्या घरात राहतात तेवढ्या दिवसांचे त्यांना पैसे मिळतात. म्हणून ते फुटेज साठी असे खोटे खोटे भांडतात. पण हा शो बघणाऱ्यांचे काय? त्यांना काय मिळतं? तर काहीच नाही. तासंतास जरी बिग बॉस हा शो बघितला तरी यातून शो बघणाऱ्यांना काहीच मिळत नाही. उलट या शो मधील खोटे खोटे भांडणं आणि एकमेकांवर ओरडणं पाहून बघणाऱ्यांना मानसिक त्रास होतो. काही प्रेक्षक तर यातील आपापल्या आवडत्या स्पर्धकांची बाजू घेऊन सोशल मिडीयावर एकमेकासोबत भांडत बसतात. किती हा रिकामटेकडेपणा.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top