डान्सर गौतमी पाटीलची संघर्षमय कहाणी – वडील दारुडे, आईला मारहाण करायचे | Dancer Gautami Patil Life Story

Dancer Gautami Patil Life Story

Dancer Gautami Patil Life Story: महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लावणी डान्सर गौतमी पाटील ही सतत वेगवेगळ्या वादात अडकत असल्याने तिच्या डान्स शोची सुद्धा खूप चर्चा होत असते. आज गौतमी पाटील हि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डान्सर बनली आहे. तिच्या शो साठी प्रचंड गर्दी होत असते. पण खऱ्या आयुष्यात गौतमी पाटीलची कहाणी खूप संघर्षमय आहे. तर बघूया गौतमीची संघर्षमय कहाणी आणि काही वाद.

गौतमी पाटीलच्या डान्सचे तरुणाईला वेड

वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जिच्या डान्सने अख्या महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावले ती लावणी डान्सर म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil). लोक गौतमीला लावणी डान्सर म्हणतात पण गौतमी मात्र स्वतःला DJ डान्सर म्हणत असते. कारण लावणीच्या नावाखाली गौतमी अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकवेळा तिच्यावर झाला आहे. त्यामुळेच गौतमी स्वतःला DJ Dancer असं म्हणत असते.

गौतमी पाटीलच्या डान्स शोमुळे अनेक वाद ही झाले, अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर टीकाही केली पण तिच्या डान्स शो ची गर्दी काही कमी झाली नाही. उलट दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच चालली आहे. कारण आता महिला सुद्धा तिच्या या डान्स शो ला उपस्थित राहतात. आणि अनेकवेळा असंही दिसले आहे की अनेक महिला गौतमीच्या डान्स शो वेळी सर्वांत पुढे बसून गौतमीला कोणताही तरुण त्रास देणार नाही याची काळजी घेतात. तर काही गावांत काही महिला स्वतः हातात दंडुके घेऊन गौतमी पाटीलला प्रोटेक्शन देतात.

गौतमीची संघर्षमय कहाणी

गौतमी पाटील ही आता प्रसिद्धीच्या शिखरावर आहे पण तिचा येथ पर्यंतचा प्रवास काही सोप्पा नव्हता. गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची. म्हणूनच तिला खान्देश कन्या असा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतलंय. अनेकजण गौतमी पाटीलचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार असल्याचे सांगतात. यामुळे खूप वादही झाला होता. मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी गौतमी ने पाटील हे आडनाव वापरू नये नाहीतर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. पण गौतमीने मात्र या इशाऱ्याला न घाबरता पाटील हे आडनाव लावणे सुरु ठेवले आहे. तसेच गौतमीच्या वडील ‘रवींद्र नेरपगारे पाटील’ यांनी सुद्धा समोर येऊन आपल्या मुलीचे समर्थन करत गौतमीचे आडनाव पाटीलच असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Gautami Patil  with her Mother and her Father
Gautami Patil with her Mother and her Father

गौतमीने तिच्या वडिलांना स्वतः पासून दूर केलं होतं पण तरीही गौतमीच्या वडिलांनी मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने पुन्हा त्यांना भेटायला यावे. तसेच आता म्हातारपणात गौतमीने त्यांना खर्चास पैसे द्यावे ही इच्छा जाहीर केली होती. तसेच मी गौतमी आणि तिच्या आईला नाही तर त्या मला सोडून गेल्याचा खुलासा गौतमीच्या वडिलांनी मिडिया समोर केला.

वडील दारुडे, आईला मारहाण करायचे

मग नेमकी काय आहे गौतमी पाटीलची खरी कहाणी. तर गौतमीने काही मिडिया चैनेलला सांगितल्याप्रमाणे चोपडा हे गौतमीच्या वडिलांचे गाव. पण गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला वाऱ्यावर सोडून दिलं. वडील दारुडे होते तसेच ते आईला मारहाण करायचे. यानंतर गौतमीच्या आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी त्यांचा संभाळ केला. आठवीत शिक्षण सोडून गौतमी पुण्यात राहायला आली. गौतमी आणि तिची आई पुण्यात स्थिरावल्यानंतर तिने वडिलांना परत घरी आणून एकत्र राहण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांचे दारुचे व्यसन काही केल्या कमी होत नव्हते, तसेच वडिलांचे दारू पेऊन आईला मारहाण करणे सुरुच राहिल्याने गौतमीने वडिलांना पुन्हा दूर केले.

आईचा अपघात, गौतमीवर सर्व जबाबदारी

पुण्यात गौतमी पाटीलची आई नोकरी करत होती. आईची नोकरी होती तो पर्यंत त्याचे सर्वकाही सुरळीत सुरु होते. पण पुढे तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची सर्व जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची (Dance) आवड होती. तिने डान्स क्लासही लावला होता. त्यावेळी अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. आणि तिथे तिला पाचशे रुपये बक्षीस मिळालं होतं. यानंतर गौतमीने याच क्षेत्रात करियर करायचं ठरवलं. आणि इथूनच गौतमीचा एक डान्सर म्हणून खरा प्रवास सुरु झाला.

बॅकडान्सर ते फ्रंट डान्सर असा गौतमीचा प्रवास

सुरुवातील गौतमी पाटील ही बॅकडान्सर म्हणून काम करत होती. या दरम्यान गौतमीने पुणे आणि कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त शो केले होते. दिवसेंदिवस तिचा डान्स प्रेक्षकांना खूप आवडू लागला. TikTok आणि Instagram मुळे गौतमीचे सोशल मिडियावर अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले. विशेषतः तरुणाई मध्ये गौतमीची प्रचंड क्रेझ निर्माण झाली. तिची डान्सशो साठी मागणीही वाढू लागली आणि ती बॅकडान्सर वरून फ्रंट डान्सर बनली. आता अगदी छोट-छोट्या कार्यक्रमांसाठी सुद्धा लोक लाखो रुपये खर्चून गौतमीचा डान्स कार्यक्रम ठेवतात. काही वर्षांपूर्वी जेथे कीर्तन आणि तमाशाचे कार्यक्रम होत असत तेथे आता लोक गौतमीचे कार्यक्रम घेऊ लागले आहे. यामुळे नक्कीच काही कीर्तनकार मंडळी आणि तमासगीर मंडळी गौतामीवर नाराज असल्याची दिसतेय.

गौतमी पाटील आणि वाद

सध्या गौतमी पाटील आणि तिच्यामुळे होणारे वाद आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. विविध कारणांमुळे गौतमी नेहमीच चर्चेत असते. सुरुवातीला गौतमी ही तिच्या अंगावर पाणी ओतण्याच्या तसेच कमी कपड्यांत केलेल्या अश्लील डान्स शो मुळे खूप वादात सापडली होती. सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर गौतमीने सर्वांची माफी मागत पुन्हा असे डान्स करणार नाही असे म्हटले. यानंतर आता गौतमीच्या डान्स शोला प्रचंड गर्दी होत असते. कायदा सुव्यस्था आणि प्रशासनाच्या दृष्टीने या ठिकाणी मोठ्या समस्या निर्माण होतात अनेक तरुण हुल्लडबाजी करतात. यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागतो. गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असल्याने अनेक तरुण घरांच्या छपरावर तसेच झाडावरही चढतात यामुळे अनेकवेळा अपघात सुद्धा झाले आहे. अनेक ठिकाणी तर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांवरच गुन्हे दाखल झाले आहेत. अशा विविध कारणांमुळे गौतमी पाटील ही सतत वादात असते.

काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने गौतमीचा कपडे बदलतांनाचा एक व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून व्हायरल केला होता. यामुळे खूप वादही झाला. यांनतर त्या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. (Gautami Patil Viral Video)

गौतमी पाटील बनली अभिनेत्री

डान्स शो सोबतच आता गौतमी पाटील ही अभिनेत्री सुद्धा बनली आहे. तिचा ‘घुंगरू’ हा पहिलाच चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे गौतमीच्या या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. बाबा गायकवाड यांनी ‘घुंगरू’ सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. गौतमीचे चाहतेही तिच्या या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट बघत आहे.

वडील सापडले बेवारस अवस्थेत

काही दिवसांपूर्वी गौतमीचे वडील ‘रवींद्र नेरपगारे पाटील’ हे रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत पडल्याचे सापडले होते. ते या उतरत्या वयात एकटेच राहत होते. गौतमी हि तिच्या आई सोबत वेगळी राहते. गौतमीच्या वडिलांकडे या वयात काहीही काम नसल्याने ते खूप आर्थिक अडचणीत होते. दोन वेळेच्या जेवणाचाही त्यांना प्रश्न पडला होता. त्यामुळेच गौतमीने आता त्यांना खर्चायला पैसे द्यावे असं त्यांनी मिडिया समोर म्हटलं होतं. पण गौतमीने मात्र त्यांना कोणताही रिप्लाय दिला नाही.

gautami patil father
Gautami Patil Father

शेवटी एक दिवस गौतमीचे वडील रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत पडल्याचे सापडले. धुळे शहरातील आजळकर नगर भागात एक व्यक्ती रस्त्यावर मरणासन्नावस्थेत असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन बेवारस अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्याकडे मिळालेले आधार कार्ड सोशल मिडियावर शेअर केले. त्यानंतर ती बेवारस व्यक्ती प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलचे (Gautami Patil Father) वडील रवींद्र बाबुराव नेरपगारे पाटील असल्याची माहिती समोर आली.

शेवटच्या क्षणी गौतमीने दिली वडिलांची साथ

वडील प्रचंड आजारी असून ते बेवारस अवस्थेत सापडल्याची माहिती गौतमीला मिळाली. त्यानंतर माणुसकी दाखवत गौतमीने वडिलांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवले पण त्यांची अवस्था खूपच खराब झाल्याने डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही. गौतमी पाटीलने पुणे येथेच वडिलांचा अंतिम संस्कार केला. शेवटच्या क्षणी का होईना पण गौतमीने वडिलांची साथ दिली.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top