Gemini AI: दिवसेंदिवस नवनवीन आर्टीफिसिअल इंटेलिजन्स टूल्स (AI Tools) मार्केटमध्ये येतच आहेत. यामुळे अनेकांना त्यांचे जॉब जाण्याची भीती असली तरीही आता या नवीन AI तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ते शिकून घेणे हि काळाची गरज आहे. यात ChatGPT या AI चा वापर ही तर आता अनेकांच्या दररोजच्या जीवनातील साधारण गोष्ट झाली आहे. पण आता नुकतंच गुगलने ChatGPTला तोडीस तोड असा AI टूल Gemini लाँच केला आहे. यामुळे आता आर्टीफिसिअल इंटेलिजन्सचे हे तंत्रज्ञान खूप पुढच्या लेवलवर जाणार हे नक्की.
तर आज आपण गुगलच्या या नवीन Gemini AI बद्दल थोडक्यात जाणून घेऊ. (What is Google Gemini AI? How to use Gemini AI? Google Gemini AI Features, type and everything you should know about googles this new ai model)
सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम
Chatgpt कूप लोकप्रिय झाल्याने त्याच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी Google ने स्वतःचे AI टूल ‘Bard’ हे लाँच केले होते, पण ते लोकांना Chatgpt इतके आवडले नाही. त्यामुळे आता अजून काही पाऊले पुढे जात पुन्हा एकदा Google ने आपले नवीन AI तंत्रज्ञान जगासमोर आणले आहे, जे Gemini या नावाने ओळखले जाईल. हे गुगल हे Gemini टूल Open AI च्या Chatgpt प्रमाणे एक AI चॅटबॉट आहे.
गूगलचे Artificial Intelligence तंत्रज्ञानावर आधारित Gemini AI हे Google चे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम AI मॉडेल आहे. हे टूल टेक्स्ट, कोड, फोटोज,ऑडिओ आणि विडिओ या सगळ्या पॅरामीटर्सना एकाचवेळेस समजू शकते आणि या पॅरामीटर्सवर आधारित योग्य निर्णय घेऊ शकण्याची कार्यक्षमता या टूलमध्ये आहे. Gemini चा Alphacode 2 हा एकदम अचूक आणि जलद अशे कोडींग प्रॉब्लेम्स सोडवू शकतो. Gemini AI हे मल्टीमॉडेल टूल आहे जे एकाच वेळी अनेक कामे हाताळू शकते. एक मल्टीमॉडेल म्हणून Gemini AI हे गणित, भौतिकशास्त्र आणि इतर क्षेत्रातील जटिल कार्ये पूर्ण करण्यास तसेच विविध प्रोग्रामिंग भाषांमध्ये उच्च-गुणवत्तेचे कोड समजून घेण्यास आणि तयार करण्यास सक्षम असल्याचे म्हटले जात आहे.
Gemini AI कोणी तयार केले?
Gemini AI हे Google आणि Google ची मूळ कंपनी Alphabet द्वारे तयार केली गेले होते आणि कंपनीचे आजपर्यंतचे सर्वात प्रगत AI मॉडेल म्हणून त्याला रिलीज करण्यात आले. Gemini AI च्या विकासात Google DeepMind चेही मोठे योगदान आहे. Google ने Gemini चे वर्णन एक लवचिक मॉडेल म्हणून केले आहे, जे Google च्या डेटा सेंटर्सपासून ते मोबाइल डिव्हाइसपर्यंत सर्व गोष्टींवर चालण्यास सक्षम आहे.
Gemini हे ChatGPT पेक्षा चांगले कसे?
अनेकजण आता गेल्या काही वर्षांपासून OpenAI चे ChatGPT वापरतच आहे, यात ChatGPT अनेक बाबतींत पूर्णपणे सक्षम नसल्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. जेव्हा जेव्हा जटिल प्रश्न आपण ChatGPTला प्रोसेस करण्यास देतो, तेव्हा तेव्हा भरपूर वेळा चुकीचे उत्तर आपल्याला ChatGPTकडून मिळण्याचे प्रमाण फार अधिक आहे.
Let's go hands-on with #GeminiAI.
— Google (@Google) December 6, 2023
Our newest AI model can reason across different types of inputs and outputs — like images and text. See Gemini's multimodal reasoning capabilities in action ↓ pic.twitter.com/tikHjGJ5Xj
पण आता गुगलचा हा Gemini AI हे सर्व जटिल प्रॉब्लेम्स अचूक आणि जलदरीत्या सोडवू शकेल असा गुगलने दावा केला आहे. ChatGPT आणि Gemini हे दोन्हीपण GPT4 वरच आधारित आहेत. गुगलच्या मते GPT4 च्या 32 पैकी 30 बेंचमार्क्स Gemini AI पूर्ण करतो. गुगलने याबाबत काही व्हिडीओ ही जारी केले आहे. यापैकी एका व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल की Gemini AI हे कालांतराने प्रतिमा कसे वाचत आहे आणि त्यात बदल होत असताना माहिती देत आहे. व्हिडिओमध्ये व्यक्ती कमांड देत असल्याने हे टूल अपडेटेड माहिती देत आहे. म्हणजेच Gemini AI हे Google चे हे असे नवीन आणि शक्तिशाली AI मॉडेल आहे, जे केवळ मजकूरच नाही तर फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ देखील समजू शकते. खालील फोटो मधेही ChatGPT आणि Gemini यातील फरक स्पष्ट दिसून येतो.
AI मुळे जॉब धोक्यात येणार का?
AI च्या या युगात आपण बर्याचदा अनेक नवीन AI टूल्स पाहतो, जे आपली विविध कामे सहज सोप्पी आणि कमी खर्चिक करतात तसेच या AI च्या वापरामुळे आपला वेळ वाचतो कारण AI मुळे कमी वेळात कामे होतात. Gemini AI हे अनेक बाबतीत मानवांपेक्षा तेज आहे, आणि ते गणित, कायदा, भाषा समजण्यात मनुष्यांपेक्षा वेगवान आहे. त्यामुळे या सारख्या आर्टीफिसिअल इंटेलिजन्स टूल्समुळे आपला जॉब धोक्यात येतो कि काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यात आता नवनवे AI टूल्स डेव्हलपर्सच्या चिंतेत भर टाकत आहे असं काही लोक म्हणत असले तरी वस्तुस्तिथी अशी आहे कि काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान हे येतच राहणार. आपल्याला या अत्याधुनिक टूल्सचा योग्यरीत्या आणि अचूकपणे वापर करता आला तर कोणीच आपला जॉब हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून हे सर्व AI टूल्सचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा हे सर्व आपण शिकून घ्यायला हवे.
Gemini Nano, Gemini Pro, आणि Gemini Ultra
Gemini चे Ultra, Pro आणि Nano हे 3 वेगवेगळे मॉडेल्स लवकरच गूगलकडून लाँच केले जाणार आहेत.
1- Gemini Nano: या मॉडेलचा आकार स्मार्टफोनवर चालण्यासाठी डिझाइन केला आहे, विशेषत: Google Pixel 8. Gemini Nano हे ऑन-डिव्हाइस कार्य करण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यासाठी बाह्य सर्व्हरशी कनेक्ट न करता AI प्रक्रिया करणे आवश्यक असते, जसे की चॅट ऍप्लिकेशनमध्ये उत्तरे सुचवणे किंवा मजकूर सारांशित करणे.
2- Gemini Pro: हे Google च्या डेटा सेंटर्सवर चालणारे, Gemini Pro कंपनीच्या AI चॅटबॉट, Bard ची नवीनतम आवृत्तीला सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ते त्वरीत प्रतिसाद देण्यास आणि जटिल प्रश्न समजून घेण्यास सक्षम आहे.
3- Gemini Ultra: Google ने Gemini Ultra चे सर्वात सक्षम मॉडेल म्हणून वर्णन केले आहे. हे अत्यंत क्लिष्ट कार्यांसाठी डिझाइन केले आहे आणि याच्या चाचणीचा सध्याचा टप्पा पूर्ण केल्यानंतर हे रिलीज केले जाईल.
Gemini AI चा वापर कसा करायचा?
सध्या, Google कंपनीने Bard chatbot आणि Google Pixel 8 Pro वापरकर्त्यांसाठी Gemini AI ची प्रो आणि नॅनो आवृत्ती जारी केली आहे. आणि हळूहळू ते इतर Google सेवांमध्ये समाविष्ट केले जाईल. Pixel वापरकर्ते Gboard आणि Recorder या App मध्ये Gemini AI या नवीन टूल्सचा वापर करू शकतात. (Gemini AI is now accessible on Pixel 8 Pro and within Bard chatbot)
Google कालांतराने Gemini ला त्यांच्या Discover, Advertise, Chrome आणि इतर सेवांमध्ये समाविष्ट करण्याची योजना आखत आहे. डेव्हलपर आणि एंटरप्राइझ ग्राहक 13 डिसेंबरपासून Google च्या AI स्टुडिओ आणि Google Cloud Vertex AI मध्ये Gemini API द्वारे Gemini प्रो मध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. Android डेवलपर्स हे AICore द्वारे जेमिनी नॅनोमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील.
गुगल पुढील वर्षी Bard ची नवीन आवृत्ती Bard Advanced लाँच करण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये Gemini Ultra हे Gemini चे सर्वात शक्तिशाली आणि सक्षम आवृत्ती वापरली जाईल. Gemini Ultra हे खूप वेगवान असल्याने त्याचा अनेक गोष्टींतील वापर नक्कीच आपली कामे सहज आणि सोप्पी करतील. पण यामुळे अनेकांना नोकरी जाण्याची भीती सुद्धा आहे. त्यामुळे या नवीन AI तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कुठे करायचा हे शिकून घेणे हेच आपल्या फायदाचे ठरेल. जेणेकरून काहींच्या नोकरी गेल्या तरी असे AI तंत्रज्ञान शिकलेले असेल तर रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा निर्माण होतील.