Cervical Cancer: 2024 च्या आर्थिक बजेटमध्ये भारत सरकारने 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV vaccine मोफत देण्याची घोषणा केली आहे. सध्या सर्वाधिक महिलांचा मृत्यू हा सर्वायकल कॅन्सरमुळे होतो. त्यामुळे भारत सरकारने याबद्दल एक मोठे पाउल उचलत देशात HPV चे लसीकरण सुरु करण्याची घोषणा केली आहे. पण अनेकांना आता असा प्रश्न पडला आहे की हा सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? हा आजार नेमका कशामुळे होतो? तसेच या आजराची लक्षणं आणि यावर उपचार काय? असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेय. त्यामुळेच आपण आजच्या या लेखात सर्वायकल कॅन्सर बद्दल ही सर्व माहिती बघूया. (Cervical Cancer: What is Cervical Cancer? What are the symptoms and remedies? What is the right age to get the HPV vaccine?)
नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी सर्वायकल कॅन्सर मुळे निधन झाल्याची बातमी स्वतः पूनम पांडे ने तिच्या instagram वर एक पोस्ट करत सर्वत्र पसरवली. या बातमी ने मोठी खळबळ उडाली. पूनम पांडेच्या अशा अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण आता पूनम पांडेने स्वतः एक व्हिडिओ शेअर करत ती जिवंत असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने सर्वायकल कॅन्सर बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निधनाची खोटी बातमी पसरवली असल्याचे म्हटले आहे.
सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय?
सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा स्त्रियांमध्ये आढळणारा कॅन्सर आहे. दरवर्षी या कॅन्सरमुळे लाखो स्रियांचा मृत्यू होतो. सुरुवातीला या कॅन्सरची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. पण काही काळाने शरीरातून पांढरा स्त्राव बाहेर पडणे, योनीमार्गातून दुर्गंधी येणे, लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे यांसारखी लक्षणं महिलांमध्ये दिसू लागतात. तसेच या आजाराची इतर लक्षणे खाली दिलेली आहे.
सर्वायकल कॅन्सर हा गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो त्यामुळे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात.
सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो?
HPV (Human Papilloma Virus) हा विषाणू शरीरात पसरल्यामुळे सर्वायकल कॅन्सरची समस्या निर्माण होते. या HPV व्हायरसचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत. या व्हायरसचं संक्रमण झाल्यास सहसा आणि लगेचच कोणतीही लक्षण दिसत नाही. काही प्रमाणात तुमच्या हातावर, पायावर, गुप्तांगांवर किंवा तोंडाच्या आत फोड येऊ शकतात. पण अनेक लोकांना याची लागण झाल्याचं कळतच नाही. आणि बऱ्याच वेळा कोणत्याही उपचारांशिवाय या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. पण काही वेळा HPV च्या संसर्गामुळे पोटातील काही टीशूची वाढ होऊन कॅन्सर होऊ शकतो.
HPV संसर्गानंतर महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. गर्भाशयात काही असामान्य पेशी तयार झाल्यास त्यावर उपचार करता येतात. तसेच तज्ज्ञांच्या मते महिलांनी वेळोवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. एका अहवालानुसार, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे एचपीव्हीमुळे होतात.
त्याशिवाय आनुवंशिकता हेही याचे प्रमुख कारण आहे. काही अभ्यासांत सर्वायकल कॅन्सर हा कौटुंबिक इतिहासामुळेही होऊ शकतो असंही आढळून आलं आहे. तसेच सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजेच व्यसन करणे हा सुद्धा या आजारासाठी एक कारणीभूत घटक समजला जातो.
लैंगिक संबंधांमध्ये याचा प्रादुर्भाव
कमीतकमी 80 टक्के लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिला आणि पुरुषांना त्यांच्या आयुष्यात या विषाणूचा सामना करावा लागतो. HPV हा विषाणू शारीरिक संपर्कातून पसरतो. HPV ची बाधा झालेल्या व्यक्तीच्या शरीराला जवळून स्पर्श झाला तरीही दुसऱ्या व्यक्तीला HPV चा संसर्ग होऊ शकतो. 80 टक्के लोक 25 वर्षांचे होण्याआधीच HPV च्या संपर्कात येतात.
बहुतेक प्रकरणांमध्ये 18 महिने ते दोन वर्षांपर्यंत HPV व्हायरसचं संक्रमण शरीरात राहू शकते. लैंगिक संबंधांमधून पसरणारे इतर आजारांसारखा हा रोग नाही. पण स्पर्श केल्यानं हा विषाणू पसरतो. त्यामुळे लैंगिक संबंधांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासात 80 टक्के लोकांना लैंगिक संक्रमणातूनच या विषाणूची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
WHO (World Health Organization) ने दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 90 टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. याचे महत्वाचं कारण म्हणजे HPV ची बाधा होणे आहे. अनेक वेळा शरीरात HPV चा मोठ्या प्रमाणात संसर्ग होईपर्यंत चाचणीच केली जात नाही. त्यामुळे सर्वायकल कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
सर्वायकल कॅन्सरची लक्षणं कोणती?
HPV व्हायरसचं संक्रमण झाल्यास सुरुवातीला सहसा कोणतीही लक्षणं दिसत नाही. पण काही काळाने हळूहळू याची लक्षणे दिसायला लागतात. ही लक्षणं खालील प्रमाणे आहेत.
- गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे
- योनीमार्गातून दुर्गंधी येणे
- वारंवार लघवीला होणे
- छातीत जळजळ होणे
- जुलाबाचा त्रास होणे
- अनियमित मासिक पाळी
- वजन कमी होणे
- भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे
- जास्त थकवा जाणवणे
- ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे
- अनेकवेळा थोडा ताप येणे आणि सुस्त वाटणे
- लैंगिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होणे
- मासिक पाळीदरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे
HPV च्या संसर्गामुळे शरीरात इतर प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो. यामध्ये घशाचा कॅन्सर आणि पुरुषांना जननेंद्रियाच्या कॅन्सर होण्याचाही धोका असतो.
सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून उपाय काय?
सर्वायकल कॅन्सर होऊ नये यासाठी म्हणजेच HPV व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे योग्य वयात HPV vaccine घेणे. या लसीबद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.
यासोबतच जर तुम्हाला सर्वायकल कॅन्सरपासून स्वत:चं संरक्षण करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची योग्य काळजी घेणे. शरीर स्वच्छ ठेवणे, नियमितपणे या रोगाशी संबंधित चाचण्या करणे , धूम्रपानाच्या सवयीने किंवा सिगारेट, दारू यांच्या व्यसनानेही सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये.
सर्वायकल कॅन्सर अनेक प्रकारच्या एचपीव्हीमुळे होतो. त्यामुळे HPV व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी लैंगिक संबंधांदरम्यान कंडोम वापरावे. सुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यामुळे सर्वायकल कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. तसेच जर जोडीदारापैकी कोणाच्याही प्रायव्हेट पार्टवर पुरळ उठत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि समस्या दूर होईपर्यंत सेक्स टाळावा. HPV व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवू नये.
HPV लस (HPV vaccine)
सर्व्हायकल कॅन्सरवर आता भारताने स्वतःची HPV vaccine ही लस विकसित केली आहे. महिलांना सध्या या लसीचे तीन डोस देण्यात येताय. सर्व मुली वयाच्या 9 व्या वर्षापासून ही लस घेऊ शकतात. ही लस घेण्यासाठी वयोगट आहे 9 ते 45 वर्ष. पण जितक्या लवकर ही लस घेतली जाईल तितका जास्त फायदा आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार या लसीचे एक किंवा दोन डोस दिले जाऊ शकता. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना दोन किंवा तीन डोस देण्याची सूचना सुद्धा दिली जाते. HPV vaccine ही एकूण 9 प्रकारच्या एचपीव्ही विषाणूंपासून संरक्षण करते. यामध्ये गर्भाशयाच्या, मानेच्या, डोक्याच्या आणि जननेंद्रियाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत असणाऱ्या काही वायरसच्या प्रकारांपासून ही लस तुम्हाला सुरक्षित करते.
काही रिसर्चमधून हे ही स्पष्ट झालं आहे की एकदा का तुम्ही HPV लस घेतली की त्यानंतर किमान 10 वर्ष तुम्हाला गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळू शकते. काही लोकांमध्ये हा प्रभाव आणखीन जास्त काळ टिकू शकतो अशी अपेक्षा आहे.
जागतिक आरोग्य संघटनाने 2030 पर्यंत जगातील 90 टक्के लोकांना HPV vaccine देऊन पुढच्या शतकापर्यंत या रोगापासून मुक्त होण्याचे लक्ष्य ठरवले आहे. त्यानुसारच आता 140 देशांनी HPV चे लसीकरण सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
भारत सरकारही आता सर्वाइकल कॅन्सर रोखण्यासाठी HPV लसीकरण सुरू करत आहे. नुकतंच केंद्र सरकारने 2024 च्या आर्थिक बजेट मध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV vaccine मोफत देण्याची घोषणा केली आहे.
Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.
Health Disclaimer: The information given in this article/post regarding health is preliminary. This information is not a substitute for medical advice and should be checked by a doctor or medical specialist before using this information. Marathijan (marathijan.com) neither our website nor its author takes responsibility for this information. Our aim behind this news is to make people aware about health and inspire them for it.