Viral Video: सोशल मीडियावर सध्या नवनवीन प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यातील असंख्य व्हिडिओ आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. त्यात सोशल मीडियावर लाईक आणि व्हीव्ज मिळवण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे असते. असाच एक व्हिडिओ khushivideos1m या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक महिला असं काही करताना दिसत आहे. ज्यामुळे व्हिडिओने 30 Million लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (viral video of woman on instagram got 30 million views)
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकतं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याशिवाय काय व्हायरल होईल आणि का होईल हे सांगता येत नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला रस्त्यावर ठेवलेल्या तिच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेवून पळताना दिसत आहे. महिलेने पिवळ्या रंगाचा सूट घातला असून तिने ‘तू रूठा तो रूठ के इतनी दूर चली जाऊंगी…’ या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये महिला कॅमेरा सुरू ठेवून गाण्याप्रमाणे ही महिला मागे सरळ धावताना दिसत आहे. पण धावत असतांना ती थांबली नाही तर सरळ धावत निघून गेली, त्यामुळेच अनेकांनी या व्हिडीओखाली खूप विनोदी कमेंट केल्या आहे.
सोशल मीडियावर khushivideos1m नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ करोडो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओखाली एकानं प्रतिक्रिया देत, “ऑलिम्पिक सुवर्णपदक दीदीच घेऊन येणार” असं म्हंटलंय तर आणखी एकानं “Me running away from my problems be like….”, तर पुढे “Kasam h didi laot mt ana….😂😂”, “Legends say she is still running 🏃♀️ 🤧”, “Itna bhi dur Nahi Jana tha😂”, “Are didi phone leke jana tha na 😹😂”, “Lady Flash with gold dust edition!”, “Vo raj bhi uske sath chala gya”, “Didii ko koi dhundh ke lao uski maa dhundh rahi hai 😢😅”, अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी तिच्या या व्हिडिओखाली दिल्या आहे. या सर्वांच्या कमेंटही खूप विनोदी आहे, त्यामुळे अनेकजण तर या व्हिडीओखाली असलेल्या विनोदी कमेंट वाचण्यासाठी वारंवार हा व्हिडिओ बघत आहे.