Realme 12 Pro आणि Pro Plus भारतात लॉन्च, बघा किंमत आणि Specifications

Realme 12 Pro and Pro Plus Features and Specifications: Realme कंपनीने Realme 12 Pro ची सिरीज भारतात लॉन्च केली आहे. यात Realme 12 Pro आणि Realme 12 Pro Plus या फोनचा समावेश आहे. या दोनीही फोनचे डिझाईन सारखेच आहे, पण स्पेसिफिकेशन मात्र वेगळे आहेत. तर बघूया या दोनीही फोनचे काही खास फीचर्स.

Realme 12 Pro चे फीचर्स (Specifications)

Realme 12 Pro या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर काम करतो. 6.7-इंचाचा वक्र OLED FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2412 x 1080 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. 10-बिट स्क्रीन 2160Hz PWM डिमिंग आणि 950 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. या फोनची जाडी 8.75mm आणि वजन 190 ग्रॅम आहे. Realme 12 Pro मध्ये फॉक्स लेदर बॅक आणि एक विशाल कॅमेरा मॉड्यूल आहे. धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी यात IP65 रेटिंग देण्यात आलेली आहे.

या स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा Sony IMX882 प्राथमिक कॅमेरा, 2x टेलिफोटो आणि OIS सपोर्टसह 32 मेगापिक्सेल सोनी IMX709 कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. या फोन मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच या फोन मध्ये डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह ड्युअल स्पीकर्स आणि इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलेले आहे.

Realme 12 Pro किंमत (Price)

Realme 12 Pro च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे, आणि 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. हा फोन Submarine Blue आणि Navigator Beige या कलर्स पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकतो. हा फोन विक्रीसाठी ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट, Realme.com आणि इतर रिटेल स्टोअरवरही उपलब्ध असेल. या फोनचा सामान्य सेल 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.

Realme 12 Pro Plus चे फीचर्स (Specifications)

Realme 12 Pro Plus या फोन मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 SoC हे प्रोसेसर आहे. तसेच यात ग्राफिक्स प्रोसेसिंगसाठी Adreno 710 GPU आहे. हा फोन TUV Rhineland लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येतो. या फोन मध्ये 6.7-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे ज्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आहे. यात P3 कलर गॅमटसाठी 100 टक्के कव्हरेज आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 800 nits आहे.

या फोन मध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये डायनॅमिक रॅम फीचर देण्यात आलेले आहे ज्याच्या मदतीने रॅम 24GB पर्यंत वाढवता येते.

Realme 12 Pro Plus या फोनच्या मागील बाजूस मुख्य लेन्स म्हणून फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX 890 सेंसर दिलेला आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) दिलेले आहे. यात 4 इन 1 पिक्सेल फ्यूजन टेक्नोलॉजी आणि 1/1.56 इंच सेन्सर आहे. सेटअपमधील दुसरा कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा OmniVision OV64B सेन्सर आहे जो OIS सह 3X ऑप्टिकल झूमला देखील सपोर्ट करतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देखील आहे. या फोन मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

Realme 12 Pro Plus या फ्लॅगशिप फोनमध्ये 3X पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहे, ज्याची लाँच इव्हेंट दरम्यान Samsung आणि Apple सारख्या ब्रँडच्या इतर प्रमुख फ्लॅगशिप फोनशी तुलना केली गेली आहे. ही लेन्स 120X पर्यंत सुपरझूम देते.

या फोनची बॅटरी क्षमता 5,000mAh असून ही 67W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा फोन केवळ 48 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. यात बॅटरी 390 तासांचा स्टँडबाय टाइम, 17.41 तास YouTube व्हिडिओ प्लेटाइम देऊ शकते. साउंडसाठी यात डॉल्बी ॲटमॉस आणि ड्युअल स्पीकर आहेत. धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी यात IP65 रेटिंग बिल्ड सर्टिफिकेशन देण्यात आलेली आहे. या डिव्हाइसची जाडी 8.75 मिमी आहे आणि वजन 196 ग्रॅम आहे.

Realme 12 Pro Plus ची किंमत (Price)

Realme 12 Pro Plus या फोनचा बेस व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज हा कंपनीने 29,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. यातीलच 8GB+256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. तर 12GB+256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. हा फोन Submarine Blue, Navigator Beige आणि Explorer Red या कलर्स पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकतो. Realme 12 Pro Plus या फोनचा सेल 6 फेब्रुवारीपासून दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन विक्रीसाठी ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट, Realme.com आणि इतर रिटेल स्टोअरवरही उपलब्ध असेल.

Check Offers

realme 12 pro
1Offer
Realme 12 Pro 5G

8 GB RAM | 128 GB ROM
17.02 cm (6.7 inch) Full HD+ Display
50MP + 8MP + 32MP | 16MP Front Camera
5000 mAh Battery
Snapdragon 6 Gen 1 Processor

realme 12 pro plus
2Offer
Realme 12 Pro+ 5G

8 GB RAM | 256 GB ROM
17.02 cm (6.7 inch) Full HD+ Display
50MP + 8MP + 64MP | 32MP Front Camera
5000 mAh Battery
Snapdragon 7s Gen 2 Processor

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त