Adaptive Display Smartphone: कमाल स्मार्टफोन – घड्याळा सारखा हाताभोवती गुंडाळला जाऊ शकतो, स्टँड बनवला जाऊ शकतो

Adaptive Display Smartphone: Lenovo ने Mobile World Congress 2024 (MWC 2024) मध्ये त्यांच्या स्मार्टफोन ब्रंड Motorola चा Adaptive Display असलेला हा स्मार्टफोन सादर केला, या फोनची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच झाली होती. MWC मध्ये कंपनीने या स्मार्टफोनचा डेमो प्रत्येकासाठी उपलब्ध करून दिला, यात असेही दाखवण्यात आले की हा स्मार्टफोन इतका लवचिक बनवण्यात आलाय की तो युजरच्या मनगटालाही चिकटू शकतो. (Motorola’s Adaptive Display Concept is a bendable smartphone)

मोटोरोलाने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) मध्ये सादर केलेल्या या नवीन adaptive display smartphone संकल्पना असलेल्या या स्मार्टफोनमध्ये FHD+ pOLED डिस्प्ले दिलेला आहे, या स्मार्टफोनला यूजर्सच्या वापरानुसार वेगवेगळ्या प्रकारे वाकवला आणि आकार दिला जाऊ शकतो. तसेच याला स्टॅन्डर्ड स्मार्टफोन प्रमाणेही वापरले जाऊ शकते. तया स्मार्टफोनला दुमडले जाऊ शकते आणि मनगटाभोवती गुंडाळले जाऊ शकते किंवा या स्मार्टफोनला तळाशी वाकवून याला स्टँड म्हणून सपाट पृष्ठभागावर ठेवले जाऊ शकते.

या स्मार्टफोनचा स्क्रीन आकारमान 6.9 इंच आहे, पण सपाट पृष्ठभागावर ठेवल्यास यास 4.6 इंच डिस्प्लेसह सेल्फ-स्टँडिंग मोडवर देखील वापरता येऊ शकते. याव्यतिरिक्त, Motorola म्हणते की वापरकर्ते त्यांच्या मनगटाभोवती डिव्हाइसला स्मार्ट बँड किंवा स्मार्टवॉच सारखे गुंडाळून बाह्य डिस्प्लेचा स्मार्टफोन सारखा वापर करू शकतो.

Motorola चा Adaptive Display असलेला या स्मार्टफोनमध्ये त्याच्या लवचिक डिझाइनला पावर देण्यासाठी यात इनोवेटिव बॅटरी तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या डिव्हाइसच्या फ्रेम एलिमेंटमध्ये लहान बॅटरीच्या सीरीजला फिट करण्यात आले आहे, जे त्याची लवचिकतेला सक्षम करते अशा हिंज मैकेनिज्मशी जोडलेले आहे. पण या स्मार्टफोनची एकूण बॅटरी क्षमता किती? याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त