Moto G24 Power: फक्त 9 हजारांच्या आत स्वस्तात मस्त फीचर्स असणारा फोन झाला लॉन्च, बघा Specifications आणि Price

Moto G24 Power: Motorola कंपनीने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये एक स्वस्तात मस्त फीचर्स असणारा नवीन Moto G24 Power हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. फक्त 10 हजार रुपयांच्या आत मिळणारा हा खूप चांगला फोन आहे. तर बघूया या फोनचे काही खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स, तसेच या फोनची भारतीय मार्केटमध्ये सध्याची किंमत. (Moto G24 Power: A phone with great features has been launched in just under 9 thousand, see specifications and price)

Moto G24 Power चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G24 Power या फोन मध्ये MediaTek Helio G85 SoC हे प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित My UX कस्टम स्किनवर काम करतो. तसेच यात 3 वर्षाच्या सिक्युरिटी अपडेट दिल्या जातील अशी माहिती कंपनीने दिलेली आहे.

या फोन मध्ये 6.56-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिलेला आहे, ज्यात HD+ रिझोल्यूशन (1612 x 720p), 90Hz चा रिफ्रेश रेट आणि 500 ​​nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळते.

Moto G24 Power या स्मार्टफोनमध्ये 4GB/8GB रॅम आहे, जी वर्चुअल रॅमद्वारे 8GB पर्यंत वाढवता येते. तसेच यात 128GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.

या स्मार्टफोन मध्ये 6,000mAh ची बॅटरीने दिलेली आहे, जी 30W टर्बो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto G24 Power मध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

पाणी आणि धुळीपासून संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी हा स्मार्टफोन IP52 रेटिंगसह येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये यात 3.5mm हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.0 दिलेले आहे. तसेच यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर,

Moto G24 Power ची भारतात किंमत

Moto G24 पॉवरच्या 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची भारतात किंमत 8,999 रुपये आहे, आणि 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे.

याशिवाय Motorola कंपनी सध्या एक्सचेंजवर 750 रुपयांची ऑफर देखील देत आहे. म्हणजेच हा फोन तुम्हाला फक्त ₹8,249 मध्ये खरेदी करता येईल.

Moto G24 Power हा फोन Coronte Blue आणि Saltwater Slide या दोन कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 7 फेब्रुवारी 2024 पासून Flipkart, Motorola ची अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Check Offers

g24 pb1c0000in motorola original
1Offer
MOTOROLA g24 Power 

4 GB RAM | 128 GB ROM | Expandable Upto 1 TB
16.76 cm (6.6 inch) HD+ Display
50MP + 2MP | 16MP Front Camera
6000 mAh Battery
Helio G85 Processor

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त