फक्त 17 हजार रुपयांना कर्व्ह अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि 32mp चा सेल्फी कॅमेरा | Lava Blaze Curve 5G Specifications

Lava Blaze Curve 5g: भारतीय स्मार्टफोन निर्माता Lava ने Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन 5 मार्च 2024 रोजी भारतात लाँच केला आहे. या फोनची खास वैशिष्टे म्हणजे यात 18 हजार रुपयांच्या आत मिळणाऱ्या या फोन मध्ये कर्व्ह डिस्प्ले तसेच फोनच्या बॅक साईडला 64mp चा मुख्य कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सेल्फिसाठी चक्क 32mp चा कॅमेरा दिलेला आहे. म्हणूनच डिस्प्ले आणि कॅमेरा सेटअपच्या बाबतीत या बजेट रेंज मध्ये हा फोन खूप खास ठरतो. तर आता चला जाणून घेऊया Lava Blaze Curve या फोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि भारतात त्याची किंमत याबद्दल माहिती.

Lava Blaze Curve 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स (Specifications and Features)

Lava Blaze Curve मध्ये कर्व्ह अ‍ॅमोलेड डिस्प्ले (Curved AMOLED display) देण्यात आला आहे. हा फोन 120 Hz रिफ्रेश रेट 6.67-इंच टचस्क्रीन डिस्प्लेसह येतो, जो 1080×2400 पिक्सेल (FHD+) रिझोल्यूशन 394 पिक्सेल प्रति इंच (ppi) च्या पिक्सेल घनतेवर आधारित आहे. या फोनमध्ये octa-core MediaTek Dimensity 7050 चिपसेट (processor) ची पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच यात वर्चुअली 8GB रॅम अतिरिक्त वाढवता येईल.

Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन Android 13 वर चालतो. कंपनीनं यात नियमित अँड्रॉइड अपडेट देण्याची घोषणा केली आहे. हा फोन Android 14 आणि 15 वर देखील अपडेट होईल. तसेच दर तीन महिन्यांनी यात सिक्योरिटी अपडेट दिले जातील असंही कंपनीने सांगितले आहे. Lava Blaze Curve 5G हा ड्युअल-सिम (GSM आणि GSM) मोबाइल आहे जो नॅनो-सिम आणि नॅनो-सिम कार्ड स्वीकारतो.

लावा ब्लेज कर्व्ह 5G या फोन मध्ये बॅक साईडला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा EIS सपोर्ट असलेला 64MP चा मुख्य कॅमेरा आहे. सोबत 8MP चा Ultra wide कॅमेरा मिळतो तर 2MP चा Macro sensor देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Lava Blaze Curve 5G फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या नवीन लावा मोबाइलमध्ये Stereo speakers चा वापर करण्यात आला आहे. Lava Blaze Curve 5G वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, GPS, Bluetooth v5.20, USB OTG, USB Type-C, FM रेडिओ, 3G, 4G (भारतातील काही LTE नेटवर्कद्वारे वापरल्या जाणाऱ्या 40 Band च्या सपोर्टसह), आणि दोन्ही सिम कार्डांवर सक्रिय 4G सह 5G. फोनवरील सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, ॲम्बियंट लाइट सेन्सर, कंपास/मॅग्नेटोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि फिंगरप्रिंट सेन्सर यांचा समावेश आहे. Lava Blaze Curve 5G फेस अनलॉकला सपोर्ट करते.

Lava Blaze Curve 5G ची भारतात किंमत (Price in India)

Lava Blaze Curve 5G ची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होते, ही फोनच्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. टॉप मॉडेलमध्ये 256GB स्टोरेज मिळते ज्यासाठी 18,999 रुपये खर्च करावे लागतील. हा हँडसेट अ‍ॅमेझॉन, लावा ई स्टोर आणि रिटेल स्टोर्सवर 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होईल. फोन Iron Glass आणि Viridian Glass या कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.

अ‍ॅमेझॉनवर हा फोन काही ऑफर्ससह उपलब्ध होण्याची शक्यता आहे, त्यामुळे Lava Blaze Curve 5G ची किंमत आणखीच कमी होऊ शकते. म्हणूनच हा फोन 17 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळू शकतो. या बजेट मध्ये मिळणारा हा डिस्प्ले आणि कॅमेरा सेटअपच्या बाबतीत हा एक बजेट फ्रेंडली उत्कृष्ट फोन असेल.

ImageProductFeaturesPrice
Our Pick1
Lava Blaze Curve 5G
5
Lava Blaze Curve 5G

120Hz Curved Amoled Display |2.6GHz Dimensity 7050 6nm Processor | 64MP Primary Rear Camera with Sony Sensor, 32MP selfie camera

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त