हनुमान AI आहे तरी काय? याचा वापर कसा करायचा? | How to use Hanooman AI?

Hanooman AI: AI चॅटबॉटच्या जगात अजून एका भारतीय AI ची एन्ट्री झाली आहे. 3AI होल्डिंग आणि सीता महालक्ष्मी हेल्थकेअर (SML) या कंपन्याद्वारे हनुमान AI लाँच करण्यात आले आहे. 21 फेब्रुवारी रोजी इंडियन लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) वर आधारित असलेले हे AI टूल मुंबईतील एका कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले होते. या AI मॉडेलची रचना भारतीय वापरकर्त्यांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. हे 12 भारतीय भाषा आणि एकूण 98 जागतिक भाषांना सपोर्ट करते आणि मजकूर अनुवादित देखील करू शकते. हनुमान एआय प्लॅटफॉर्म सध्या सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. परंतु कंपनी भविष्यात याची सशुल्क सबस्क्रिप्शनसह प्रीमियम आवृत्ती जारी करणार आहे. या पेड आवृत्ती मध्ये तुम्हाला इतरही अधिक फीचर्स मिळतील. (How to use Hanooman AI?)

कंपनीने आपला हनुमान AI चॅटबॉट हा वेब क्लायंट तसेच अँड्रॉइड ॲपद्वारे उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच तुम्ही ChatGPT सारखेच हनुमान AI चे अॅप वापरू शकतात. कंपनीच्या म्हणण्यांनुसार हनुमान AI (Hanooman AI) हे भाषेतील समस्या दूर करणारे भारताचे पहिले स्वतःचे जनरेटिव्ह एआय आहे. हनुमान AI ला तुम्ही तुमच्या आवडत्या भाषेत प्रश्न विचारू शकतात, आणि तुम्हाला उत्तरही त्याच भाषेत मिळेल. यात 12 भारतीय भाषा समाविष्ट आहे. तर एकूण 98 जागतिक भाषांना हे AI टूल सपोर्ट करते.

How to use Hanooman AI?
How to use Hanooman AI?

हनुमान AI ची वैशिष्ट्ये

कंपनीच्या म्हणण्यांनुसार हनुमान AI या चॅटबॉटची रचना आरोग्य सेवा, प्रशासन, वित्तीय सेवा आणि शिक्षण यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी केली गेली आहे. OpenAI चे ChatGPT किंवा Google चे जेमिनी जे करू शकतात त्या सर्व गोष्टी हनुमान AI करते. तथापि, कंपनीने असेही नमूद केले आहे की, “हनुमान AI एका इंटिग्रेशन मॅट्रिक्ससह स्पेशलाइज्ड LLM समाकलित करतो जे स्पष्ट, अनुकूली अंतर्दृष्टी आणि कृती करण्यायोग्य बुद्धिमत्तेमध्ये निर्बाध डेटाचे रूपांतर सुलभ करते.”

Hanooman AI launched
Hanooman AI launched

हनुमान AI चा रिव्यू (Hanooman AI Review)

आम्ही Hanooman AI चा वापर केला असता जो अनुभव आला तो आम्ही यात सांगत आहे. हनुमान AI द्वारे तुम्ही तुमच्या भाषेत प्रश्न विचारू शकता, हे एक चांगले फिचर यात देण्यात आले आहे. पण हे AI टूल फक्त इंग्रजी मध्ये चांगले उत्तरे देवू शकते. इतर भारतीय भाषणामध्ये उत्तरे देण्यास यात मर्यादा येतात. म्हणजेच इंग्रजी वगळता इतर भारतीय भाषांमध्ये हे तितके प्रभावी कार्य करत नाही. उदा. मराठी भाषेत हनुमान AI ला प्रश्न विचारले असता, ते अत्यंत मर्यादित उत्तर देते.

यासोबतच हे मल्टीमॉडल नाही, याचा अर्थ ते इनपुट म्हणून फोटो घेऊ शकत नाही किंवा ते जनरेट करू शकत नाही आणि हनुमान AI मध्ये रिअल-टाइम माहिती सुद्धा मिळत नाही. म्हणजेच याला अजून चांगले विकसित करण्याची गरज आहे.

इतर अशाच प्रकारचे आर्टिकल वाचण्यासाठी किंवा आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमच्या मराठीजन वेबसाईटला किंवा युट्युब चैनेलला भेट द्या.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त