चोरी गेलेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक कसा करायचा? | How to Block a Stolen or Lost Phone?

How to block a stolen or lost phone?: गेल्या वर्षभरापासून भारत सरकारने ‘संचार साथी’ ही वेबसाईट सुरु केली आहे. ही वेबसाईट Central Equipment Identity Register (CEIR) या सिस्टीमने सुसज्य आहे. CEIR हा मोबाईल उपकरण ओळखकर्त्यांचा केंद्रीकृत डेटाबेस आहे (म्हणजे GSM मानकांच्या नेटवर्कसाठी IMEI). जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल तर ही वेबसाईट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या वेबसाईट द्वारे तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन ब्लॉक करू शकता. जर तुम्ही या वेबसाईट द्वारे तुमचा फोन ब्लॉक केला तर इतर कोणतीही व्यक्ती तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकणार नाही किंवा तो फोन वापरू शकणार नाही.

तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन ब्लॉक भारत सरकारच्या ‘संचार साथी’ या वेबसाईट वरून ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या या काही स्टेप्स प्रमाणे कार्यवाही करावी लागेल. यात खाली दिलेल्या स्टेप्स आणि फोटोत दाखवल्याप्रमाणे sancharsaathi या भारत सरकारच्या वेबसाईटवर भेट देवून खालील स्टेप्स प्रमाणे माहिती भरा. पण या अगोदर तुमच्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या स्मार्टफोन बद्दल तुम्ही पोलिसांत एक तक्रार करणे गरजेचे आहे. आणि या तक्रारीची एक कॉपी तुमच्या जवळ असायला हवी, कारण पुढे या वेबसाईट मध्ये तुम्हाला त्या तक्रारीची एक कॉपी उपलोड सुद्धा करावी लागेल.

स्मार्टफोन असा करा ब्लॉक

‘संचार साथी’ या वेबसाईटवर हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन असा करा ब्लॉक:

Step 1: सर्वात अगोदर गुगल सर्च मध्ये sancharsaathi असं सर्च करा. यात www.sancharsaathi.gov.in ही वेबसाईट येईल, ती ओपन करा.

How to block a stolen or lost phone?
How to block a stolen or lost phone?

Step 2: sancharsaathi या वेबसाईट पोर्टलवर Citizen Centric Services हे ऑप्शन बघा, यात BLOCK YOUR LOST/STOLEN MOBILE या ऑप्शनवर क्लिक करा.

How to block a stolen or lost phone?
How to block a stolen or lost phone?

Step 3: यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, यात Block Stolen/Lost Mobile, Un-Block Found Mobile, Check Request Status and Forgot Request ID असे 4 ऑप्शन दिसतील. यापैकी Block Stolen/Lost Mobile या ऑप्शनवर क्लिक करा.

How to block a stolen or lost phone?
How to block a stolen or lost phone?

Step 4: यानंतर आता एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या हरवलेल्या मोबाईल फोनची माहिती भरायची आहे. यात तुमचा मोबाईल नंबर, डिव्हाईसचा ब्रँड, IMEI नंबर, डिव्हाईस मॉडेल, डिव्हाईस इनव्हॉइस, फोन कधी चोरीला गेला, कुठे चोरीला गेला, जवळच्या पोलिस स्टेशनचे नाव, पोलिस तक्रार क्रमांक अशी माहिती देवून पोलिस तक्रारची एक कॉपीही अपलोड करावे लागेल.

How to block a stolen or lost phone?
How to block a stolen or lost phone?

Step 5: संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर Declaration समोरील बॉक्स मध्ये क्लिक करा आणि त्यानंतर खाली सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा. यानंतर तुमचा फॉर्म जमा होईल आणि त्यावर योग्य ती कारवाई करत तुमचा मोबाईल ब्लॉक केला जाईल.

Step 6: तुमचा मोबाईल ब्लॉक झाला की नाही याबद्दलचे स्टेटस बघण्यासाठी पुन्हा एकदा www.sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जाऊन Citizen Centric Services या ऑप्शन मध्ये BLOCK YOUR LOST/STOLEN MOBILE या ऑप्शनवर क्लिक करा.

How to block a stolen or lost phone?
How to block a stolen or lost phone?

Step 7: यानंतर पुन्हा तुमच्या समोर Block Stolen/Lost Mobile, Un-Block Found Mobile, Check Request Status and Forgot Request ID असे 4 ऑप्शन असलेले पेज ओपन होईल. त्यातील Check Request Status या ऑप्शनवर क्लिक करा.

How to block a stolen or lost phone?
How to block a stolen or lost phone?

Step 8: यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुमचा Request ID आणि Captcha Text टाकून सबमिट करा. यानंतर तुमचा फोन अजून ब्लॉक झाला आहे की नाही यासंदर्भातले स्टेट्स तुम्हाला बघायला मिळेल.

How to block a stolen or lost phone?
How to block a stolen or lost phone?

तर अशा प्रकारे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन ब्लॉक करू शकता.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त