बापरे ! तब्बल 28,000mAh बॅटरी असलेला दमदार स्मार्टफोन, 3 महिने चार्जिंग करायची गरज नाही | Energizer Hard Case P28K

Energizer Hard Case P28K: आजपर्यंत आपण स्मार्टफोन मध्ये जास्तीत जास्त 5000 mAh किंवा 6000 mAh पर्यंत Battery असल्याचे ऐकले होते. पण आता एक असा फोन मार्केटमध्ये आला आहे ज्याची बॅटरी तब्बल 28,000mAh पर्यंत आहे. होय, ऐकायला हे आश्चर्यकारक वाटेल, पण हे खरे आहे. (Energizer Hard Case P28K – Full phone specifications and features)

स्पेनमधील बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) सुरू झाली आहे. जगातील याच सर्वात मोठ्या टेक फेअर मध्ये 28 हजार mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे नाव Energizer Hard Case P28K आहे, जे Avenir Telecom या कंपनीने निर्मित केले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की एकदा चार्ज केल्यानंतर हा स्मार्टफोन नियमित वापर करून सुद्धा एक आठवडा या फोनची बॅटरी टिकू शकते. तसेच या फोनचा standby time 2252 hours किंवा 94 दिवस एवढा आहे म्हणजेच 3 महिने हा फोन बिना चार्जिंग करता चालू शकतो. जे लोक लांब पल्ल्याच्या प्रवासाला जातात त्यांच्यासाठी हा फोन खूप फायदेशीर ठरू शकतो. यात त्यांना वारंवार फोन चार्ज करण्याची गरज राहणार नाही.

Energizer P28K स्पेसिफिकेशन्स

द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, P28K स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी IP69 रेटिंग मिळाली आहे. या फोनला अधिक मजबूत करण्यात आले आहे, पण मोठी बॅटरी असल्याने फोनची जाडी वाढली आहे.

Energizer Hard Case P28K या स्मार्टफोनमध्ये 28,000mAh बॅटरी सोबतच 33 वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये P28K हा फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर झाला आहे, ज्यात रॅम 8 GB आणि अंतर्गत स्टोरेज 256 GB देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामुळे यूजर्सला फोटोग्राफीचा चांगला अनुभव मिळू शकतो. या फोनच्या बॅक पॅनलवर 60 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 20 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Energizer P28K स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

P28K मध्ये 6.78-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हे नवीनतम Android 14 वर चालते. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला MediaTek Helio G99 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

एकंदरीतच Hard Case P28K हा फोन एक बेसिक स्मार्टफोन आहे, पण या फोनची जाडी 27.8mm व वजन 570g एवढे आहे. म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचे झाले तर हा अर्धा किलो वजनाचा फोन आहे. आता एवढा वजनदार फोन जवळ बाळगणे म्हणजे अवघडच आहे. पण जे लोक लांबच्या प्रवासास जातात ते बॅग मध्ये ठेवून हा फोन सोबत ठेवू शकतात. किंवा घरात आणि ऑफिसमध्ये हा फोन आपण वापरू शकतो.

Energizer P28K ची किंमत

Energizer Hard Case P28K हा स्मार्टफोन जगभरात उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. पण हा स्मार्टफोन अमेरिकेतील स्मार्टफोन मार्केट मध्ये येणार नाही. हा फोन ऑक्टोबरपासून खरेदी करता येईल. या फोनसाठी प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. हा मोबाइल सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे ज्याची किंमत 249.99 यूरो आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 22 हजार ते 23 हजार रुपयांच्या आसपास आहे. पण ही कंपनी भारतीय बाजारात सक्रिय नाही, त्यामुळे सध्यातरी Energizer P28K स्मार्टफोन भारतात सेलसाठी उपलब्ध होणार नाही.

या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील मोठी बॅटरी, 33w फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असल्याने कंपनीने दावा केलं आहे की हा फोन दीड तासात फुल चार्ज होतो, पण हे लक्षात ठेवा की या फोन मध्ये 28,000mAh ची मोठी बॅटरी असल्याने चार्ज होण्यास देखील तेवढाच जास्त वेळ लागेल. म्हणजेच माझ्या अंदाजानुसार या फोनला फुल चार्ज होण्यासाठी दीड तासापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त