2000 रुपयांच्या आत बेस्ट TWS Earbuds | Boat Airdopes 800

Boat Airdopes 800: boAt कंपनी ने नवीन Earbuds Boat Airdopes 800 TWS लाँच केले आहेत. कंपनीने म्हटल्यानुसार हे Earbuds सिंगल चार्ज केल्यानंतर 40 तास चालू शकते. तसेच यात 10mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये बोटचे सिग्नेचर ट्युनिंग उपलब्ध आहे. यामध्ये Quad mic ENx तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे कॉलिंग करताना आवाज स्पष्ट येतो, म्हणजेच आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही. ध्वनीच्या गुणवत्तेसाठी यात Dolby Audio सपोर्ट देखील देण्यात आला आहे. तर या Earbuds चे काही खास फीचर्स आणि भारतात याची किंमत किती ते बघूया. (Best TWS Earbuds under Rs 2000 | Boat Airdopes 800)

Boat Airdopes 800 Specifications

Boat Airdopes 800 हे 10mm टायटॅनियम ड्रायव्हर्ससह येते. यातून वियरेबल बोट चा सिग्नेचर साउंड डिलीवर होतो. यात क्वाड मायक्रोफोन्स आहेत ज्यामध्ये ENx Technology वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ते अतिशय स्पष्ट व्हॉईस कॉलिंग प्रदान करू शकते. यात इन-ईयर डिटेक्शन फीचर सुद्धा देण्यात आले आहे. साउंड क्वालिटीसाठी यात डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Best TWS Earbuds under Rs 2000
Best TWS Earbuds under Rs 2000

Airdopes 800 मध्ये ASAP चार्ज टेक्नोलॉजी (Charge Technology) देण्यात आली आहे. त्यामुळे हे जलद चार्ज होऊ शकते. तसेच यात चार्जिंगसाठी टाइप सी पोर्ट देण्यात आले आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे हे Earbuds केवळ 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 100 मिनिटे प्लेबॅक देवू शकते आणि सिंगल चार्ज मध्ये हे 40 तासांचे प्लेटाइम देवू शकते. याशिवाय, यामध्ये 50ms लो-लेटन्सी मोड देण्यात आलं आहे. व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील उपलब्ध आहे. यामध्ये ॲडॉप्टिव्ह EQ मोड देण्यात आले आहेत, जेणेकरून ते उत्तम म्यूजिकचा अनुभव मिळेल.

Boat Airdopes 800 price in India

Boat Airdopes 800 ची भारतात किंमत 1799 रुपये आहे. याला तुम्ही Amazon च्या वेबसाईटवरून किंवा Boat कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर हे Earbuds Interstellar Blue, Interstellar White, Interstellar Green, आणि Interstellar Black या कलरमध्ये विकत घेता येईल.

इतर अशाच प्रकारचे आर्टिकल वाचण्यासाठी किंवा आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमच्या मराठीजन वेबसाईटला किंवा युट्युब चैनेलला भेट द्या.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त