Best Smartphone Under 25000: हे आहे 25 हजार रुपयांच्या आत मिळणारे सर्वोत्तम 10 स्मार्टफोन

Best Smartphone Under 25000 rupees

Best Smartphone Under 25000: गेल्या काही वर्षापासून स्मार्टफोन टेक्नोलॉजी मध्ये कमालीचे बदल होत आहे. त्यामुळे अत्यंत महागडे वाटणारे स्मार्टफोन सुद्धा आता अत्यंत स्वस्तात मिळतात. विशेषतः 25000 रुपयांच्या आत आता अत्यंत दमदार स्मार्टफोन बघायला मिळतात. यापैकी आम्ही जानेवारी 2024 मध्ये आम्ही खूप रिसर्च करून आणि विविध स्मार्टफोन ची तुलना करून 25000 रुपयांच्या आताचे सर्वांत बेस्ट स्मार्टफोन कोणते याबाबत मिळवलेली माहिती खाली दिलेली आहे. जर तुमचे बजेट 20000 ते 25000 रुपयांपर्यंत असेल तर ही सर्व माहिती तुमच्या फायद्याची ठरेल. (Best Smartphone Under 25000 Rupees in India in Marathi)

जानेवारी 2024 पर्यंत भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये आलेल्या 25000 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या काही सर्वोत्तम स्मार्टफोन मध्ये दमदार परफॉर्मेंस देणारे प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टीम, चांगला आणि लेटेस्ट डिस्प्ले, चांगल्या क्वालिटीचे फोटो आणि व्हिडीओ काढणारा कॅमेरा, जास्तीत जास्त वेळ टिकणारी आणि वेगवान चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी या काही खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशनचे निरीक्षण आणि तुलना यात आम्ही केलेली आहे. यात माहिती सर्वोत्तम 10 फोनची असली तरी काही नवीन फोन मार्केट मध्ये आल्याने आम्ही सर्वोत्तम 11 फोनची माहिती दिली आहे. यात आमचा अनुभव आणि निरीक्षण यातून आम्हाला जे 11 सर्वोत्तम स्मार्टफोन वाटले त्यांच्याबद्दल आम्ही येथे माहिती दिलेली आहे. यापैकी तुमच्या आवडीचे फीचर्स बघून तुम्ही या top 11 पैकी एखादा स्मार्टफोन निवडू शकता.

जानेवारी 2024 पर्यंत 25000 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या सर्वोत्तम स्मार्टफोन पैकी top 11 स्मार्टफोन खाली दिले आहे. यात 11 ते 1 असे उलट नंबर दिलेले आहे. म्हणजेच आमच्या मतानुसार या रेंज मधील सर्वांत बेस्ट स्मार्टफोन सर्वात खाली पहिल्या क्रमांकावर आहे.

25000 रुपयांपर्यंत मिळणारे सर्वोत्तम स्मार्टफोन (Best Smartphone Under 25000):

11) वीवो टी2 प्रो (Vivo T2 Pro)

Vivo T2 Pro 5G ला डिझाईनद्वारे एकदम प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.78 इंच कर्व्‍ड AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये फुल HD+ रिझोल्यूशन आहे. डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 1300 nits पर्यंत आहे. हा फोन Android 13 OS वर चालतो, ज्यावर FuntouchOS 13 चा लेयर आहे.

Vivo T2 Pro
Vivo T2 Pro

Vivo T2 Pro 5G मध्ये MediaTek चा डायमेंशन 7200 प्रोसेसर आहे. याला 8GB LPDDR4X RAM चा सपोर्ट आहे आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. Vivo T2 Pro 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, वायफाय 6 सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Vivo T2 Pro 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64-मेगापिक्सलचा मुख्य प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
Vivo T2 Pro मध्ये 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo T2 Pro या फोनची सध्या भारतात किमत ₹23,999 रुपयांपासून सुरु होते.

Vivo T2 Pro Features and Specifications:

  • 6.78″ FHD+ curved AMOLED display, 120Hz refresh rate, 1300nits peak brightness
  • MediaTek dimensity 7200 SoC
  • LPDDR4x RAM and UFS 2.2 storage
  • Android 13 (2 Android update+ 3 year security patches update)
  • 64MP OIS+2MP rear camera
  • 16MP front camera
  • 4600mAh battery
  • 66 watt wired charging
  • 7.36mm thickness
  • 176 gram weight
  • WiFi 5
  • Bluetooth version 5.3
  • In-display fingerprint scanner
  • single speaker
  • IP52
  • glass back
vivo t2 pro
1Offer
vivo T2 Pro 5G

8 GB RAM | 128 GB ROM
17.22 cm (6.78 inch) Full HD+ Display
64MP + 2MP | 16MP Front Camera
4600 mAh Battery
Dimensity 7200 Processor

10) इंफिनिक्स जीरो 30 (Infinix Zero 30 5G)

Infinix Zero 30 5G स्मार्टफोन सप्टेंबर 2023 मध्ये लाँच झाला होता. हा फोन octa-core MediaTek Dimensity 8020 या पावरफुल प्रोसेसरसह येतो. Infinix Zero 30 5G मध्ये 50MP फ्रंट आणि 108MP बॅक कॅमेरासह पंच होल कॅमेरा डिझाइन आहे. तसेच, फोनमध्ये 6.78 इंच curved AMOLED डिस्प्ले दिलेला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंगला सपोर्ट करतो. डिस्प्ले संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन दिलेले आहे. याशिवाय, यात 2160 PWM डिमिंग फीचर देखील आहे.

फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह ड्युअल स्पीकर DTS HiRes ऑडिओ हे फीचर देखील आहे. फोनच्या बॅक पॅनलला व्हेगन लेदर फिनिशिंगसह बॅक पॅनल देण्यात आला आहे आणि फोनची जाडी 7.9mm ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Golden Hour आणि Rome Green या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Infinix Zero 30 5G
Infinix Zero 30 5G

Infinix Zero 30 5G मध्ये 256 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. तसेच 12GB रॅम स्टोरेज यात आहे जी 21GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोन मध्ये 5000mAh बॅटरी दिलेली आहे आणि हा फोन 68W USB टाइप C फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीचा असा दावा आहे की या फोनची बॅटरी 30 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते. हा फोन 1080×2400 पिक्सेल (FHD+) रिझोल्यूशनसह 144 Hz रिफ्रेश रेट आणि 6.78 इंच टचस्क्रीन डिस्प्लेसह येतो. यात धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP53 रेटिंग आहे.

Infinix Zero 30 या फोनची सध्या भारतात किमत ₹22,999 रुपयांपासून सुरु होते. यात काही ऑफर वापरल्या तर 20 हजार रुपयांपर्यंत हा स्मार्टफोन मिळतो.

Infinix Zero 30 Features and Specifications:

  • 6.78-inch, 144Hz Curved AMOLED Display
  • MediaTek Dimensity 8020 SoC
  • 108MP Primary Camera with OIS (Triple Rear Camera Setup)
  • 50MP Selfie Camera
  • 5000mAh Battery
  • 68W Fast Charging
Infinix Zero 30 5G
1Offer
Infinix Zero 30 5G

8 GB RAM | 256 GB ROM
17.22 cm (6.78 inch) Full HD+ Display
108MP (OIS) + 13MP + 2MP | 50MP Front Camera
5000 mAh Lithium-ion Polymer Battery
Dimensity 8020 Processor

9) रियलमी 11 प्रो (Realme 11 Pro)

Realme 11 Pro मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हे 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी+ रिझोल्यूशन देते. Realme ने या फोनला MediaTek च्या Dimension 7050 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे. Realme 11 Pro फोन हा Android 13 OS वर चालतो, ज्यावर Realme UI 4.0 चा लेअर आहे.

Realme 11 Pro
Realme 11 Pro

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य सेन्सर 108MP आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह येतो. याशिवाय 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. समोर 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 5 हजार mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme 11 Pro ची भारतात किंमत ₹21,999 रुपयांपासून सुरू होते.

Realme 11 Pro Features and Specifications:

  • 6.7 inches, 1080 x 2412 px, 120 Hz Curved Display with Punch Hole
  • Dimensity 7050, Octa Core, 2.6 GHz Processor
  • 5000 mAh Battery with 67W Fast Charging
  • 8/12 GB RAM, 128 GB inbuilt
  • 100 MP + 2 MP Dual Rear & 16 MP Front Camera
  • 185g weight
Realme 11 Pro
1Offer
realme 11 Pro 5G

8 GB RAM | 128 GB ROM
17.02 cm (6.7 inch) Full HD+ Display
100MP (OIS) + 2MP | 16MP Front Camera
5000 mAh Battery
Dimensity 7050 Processor

8) रियलमी नार्जो 60 प्रो (Realme Narzo 60 Pro)

Realme च्या या नवीन फोनमध्ये 6.7 इंच फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशन, 61-डिग्री वक्र रिफ्रेश रेट, 260Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2160Hz उच्च वारंवारता PWM डिमिंगसह येतो. या फोनमध्ये Android 13 वर आधारित Realme UI 4.0 मिळत आहे.

Realme Narzo 60 Pro
Realme Narzo 60 Pro

फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 5G प्रोसेसरसह 24 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेजसाठी सपोर्ट आहे. Realme Narzo 60 Pro 5G 12GB भौतिक रॅमसह येतो, परंतु ते 12GB डायनॅमिक रॅम देखील देते. या फोनच्या सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे यात 1 TB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे, जे या 25000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या फोन मध्ये पहिल्यांदाच मिळतेय.

या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 100-मेगापिक्सलचा प्राइमरी रिअर कॅमेरा सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर आहे. कॅमेरा युनिटमध्ये ऑटो झूम फीचर देखील आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सेल सेन्सरसह येतो.

फोनमध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

Realme Narzo 60 Pro ची भारतात किंमत ₹21,999 रुपयांपासून सुरू होते.

Realme Narzo 60 Pro Features and Specifications:

  • Dimensity 7050, Octa Core, 2.6 GHz Processor
  • 6.7 inches, 1080 x 2412 px, 120 Hz Display with Punch Hole
  • 5000 mAh Battery with 67W Fast Charging
  • 8/12 GB RAM, 128 GB inbuilt
  • 100 MP + 2 MP Dual Rear & 16 MP Front Camera
realme narzo 60 Pro
1Offer
realme narzo 60 Pro

8 GB RAM | 128 GB ROM
17.02 cm (6.7 inch) Full HD+ E3 Super AMOLED Display
100MP Rear Camera
5000 mAh Battery
Mrdiatek Processor

7) वनप्लस नॉर्ड सीई 3 (OnePlus Nord CE 3)

OnePlus Nord CE 3 5G हा फोन 5 जुलै 2023 मध्ये लाँच झाला होता. हा फोन 120 Hz रिफ्रेश रेट आणि 6.70-इंच टचस्क्रीन डिस्प्लेसह 1080×2412 पिक्सेल (FHD+) रिझोल्यूशनसह येतो.
OnePlus Nord CE 3 मध्ये Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर आणि 12 GB LPDDR5X रॅमसह 256 GB UFS3.1 अंतर्गत स्टोरेज आहे.

OnePlus Nord CE 3
OnePlus Nord CE 3

OnePlus Nord CE 3 5G मध्ये ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे, जो Sony IMX 890 सेन्सरसह येतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरचा दुय्यम कॅमेरा आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

OnePlus Nord CE 3 च्या बॅटरी क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 80W सुपर VOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

OnePlus Nord CE 3 5G ची भारतात किंमत ₹24,950 रुपयांपासून सुरू होते.

OnePlus Nord CE 3 Features and Specifications:

  • Snapdragon 782G, Octa Core, 2.7 GHz Processor
  • 8/12 GB RAM, 128 GB inbuilt
  • 5000 mAh Battery with 80W Fast Charging
  • 6.7 inches, 1080 x 2412 px, 120 Hz Display with Punch Hole
  • 50 MP + 8 MP + 2 MP Triple Rear & 16 MP Front Camera
  • IR Blaster
OnePlus Nord CE 3 5G
1Offer
OnePlus Nord CE 3 5G

8 GB RAM | 128 GB ROM
17.02 cm (6.7 inch) Display
50MP Rear Camera | 50MP Front Camera
5000 mAh Battery

6) आईक्यू जेड 7 प्रो (iQOO Z7 Pro)

iQOO Z7 Pro 5G मध्ये 6.78 इंच HD Plus Curved AMOLED डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट, 2400 × 1080 चे पिक्सेल रिझोल्यूशन, 1300 nits पीक ब्राइटनेस, 93.3% स्क्रीन ते बॉडी रेशो आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेट देण्यात आलेला आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचं झालं तर iQOO Z7 Pro 5G हा फोन Android 13 वर आधारित Fun Touch OS 13 वर चालतो. या डिवाइस मध्ये octa core MediaTek Dimensity 7200 चिपसेट देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 4 नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित आहे. यासोबतच ग्राफिक्ससाठी Mali G610 GPU आहे.

iQOO Z7 Pro
iQOO Z7 Pro

iQOO Z7 Pro मध्ये 8 GB LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज आहे. यासोबतच 8 GB एक्स्ट्रा रॅम सपोर्ट देखील आहे. कॅमेरा फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिलेला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. या लेन्सला 2 मेगापिक्सेलच्या दुय्यम कॅमेरा लेन्सचा सपोर्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा लेन्स उपलब्ध आहे.

बॅटरीच्या बाबतीत, डिव्हाइसमध्ये 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4600mAh बॅटरी आहे. वायफाय 6, ब्लूटूथ 5.3, डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5G, 4G अशी अनेक वैशिष्ट्ये या मोबाइलमध्ये उपलब्ध आहेत.

iQOO Z7 Pro 5G ची भारतात किंमत ₹23,999 रुपयांपासून सुरू होते.

iQOO Z7 Pro Features and Specifications:

  • Dimensity 7200, Octa Core, 2.8 GHz Processor
  • 8/12 GB RAM, 128 GB inbuilt
  • 4600 mAh Battery with 66W Fast Charging
  • 6.78 inches, 1080 x 2400 px, 120 Hz Curved Display with Punch Hole
  • 64 MP + 2 MP Dual Rear & 16 MP Front Camera
iQOO Z7 Pro
1Offer
IQOO Z7 Pro 5G

8 GB RAM | 128 GB ROM
17.22 cm (6.78 inch) Display
64MP Rear Camera
4600 mAh Battery

5) मोटोरोला ऐज 40 (Motorola Edge 40)

Motorola Edge 40 मध्ये 6.55 इंच P-OLED कर्व्ड एज डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन FHD+ आहे आणि रिफ्रेश रेट 144Hz आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर एज 40 मध्ये डायमेंसिटी 8020 प्रोसेसर आहे.

Motorola Edge 40
Motorola Edge 40

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील बाजूस, OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे.

सुरक्षेसाठी यात अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 13 वर काम करतो. या फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी यात IP68 रेटिंग दिलेली आहे.

स्टोरेजसाठी, फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4,400mAh बॅटरी आहे जी 68W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Motorola Edge 40 या फोनची सध्या भारतात काही ऑफर मध्ये किमत ₹24,999 रुपयांपासून सुरू होते.

Motorola Edge 40 Features and Specifications:

  • Dimensity 8020, Octa Core, 2.6 GHz Processor
  • 8/12 GB RAM, 256 GB inbuilt
  • 4400 mAh Battery with 68W Fast Charging
  • 6.55 inches, 1080 x 2400 px, 144 Hz Display
  • 50 MP + 13 MP Dual Rear & 32 MP Front Camera
Motorola Edge 40 5G
1Offer
Motorola Edge 40 

8 GB RAM | 256 GB ROM
16.51 cm (6.5 inch) Full HD+ Display
50MP + 13MP | 32MP Front Camera
4400 mAh Battery
Dimensity 8020 Processor

4) आईक्यू नियो 7 (iQoo Neo 7)

iQoo Neo 7 मध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर उपलब्ध आहे, जो 4nm प्रोसेसर आहे. चिपसेटचा कमाल क्लॉक स्पीड 3.1GHz आहे आणि तो Mali G610 GPU सह येतो. फोन 12 GB LPDDR5 RAM आणि 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. गेमिंगसाठी फोनमध्ये ग्रेफाइट 3D कुलिंग सिस्टम देण्यात आली आहे. म्हणजे फोन गेमिंगसाठी एक उत्तम फोन आहे.

iQoo Neo 7
iQoo Neo 7

फोनच्या सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर, Android 13 वर आधारित Funtouch OS 13 त्याच्यासोबत उपलब्ध आहे. कंपनी फोनसोबत तीन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स आणि दोन वर्षांसाठी मोठे अँड्रॉइड अपडेट्सही देणार आहे. म्हणजेच फोनमध्ये Android 14 आणि Android 15 देखील उपलब्ध असतील. फोनमध्ये काही प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स देखील उपलब्ध आहेत, जे तुम्ही काढू शकता.

iQoo Neo 7 मध्ये 6.78 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 1,300 आहे. फोनमध्ये खूप कमी बेझल दिसत आहेत. iQOO Neo 7 5G मध्ये 93.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो असलेला डिस्प्ले आहे. डिस्प्ले HDR 10 Plus ला सपोर्ट करतो आणि यात तुम्हाला Widevine L1 साठी देखील सपोर्ट मिळेल. या डिस्प्लेमुळे चांगले रंग दिसतात आणि डिस्प्लेचा व्ह्यूइंग अँगल देखील अगदी योग्य आहे. फोनमध्ये मोठ्या डिस्प्लेसह ड्युअल स्पीकर्स सपोर्ट आहे. त्यामुळे हा फोन चांगला मल्टीमीडिया अनुभव देतो.

iQOO Neo 7 5G च्या बटणे आणि पोर्टबद्दल बोलायचे तर, पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर एका बाजूला उपलब्ध आहेत. फोनच्या तळाशी ड्युअल सिम स्लॉट, प्राथमिक मायक्रोफोन, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल देण्यात आलेले आहेत. सेकेंडरी मायक्रोफोन आणि IR ब्लास्टर टॉपला दिलेले आहे. फोनचे वजन 193 ग्रॅम आहे.

Qoo Neo 7 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेलची आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) देखील आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ स्टेबलाइजेशन खूप चांगले आहे. V-Log सह अनेक वैशिष्ट्ये रियर कॅमेऱ्यात उपलब्ध आहेत. यात रियर कॅमेर्‍याने तुम्ही 4K पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

iQoo Neo 7 मध्ये फ्रंटला 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यासह, चांगला डिटेल आणि डायनामिक रेंज ‘फोटो’ आणि ‘पोर्ट्रेट’ या दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे.

iQoo Neo 7 5G मध्ये 120W फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. कंपनीने असा दावा केला आहे की या फोनची बॅटरी 10 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

iQoo Neo 7 ची भारतात किंमत ₹24,999 रुपयांपासून सुरू होते.

iQoo Neo 7 Features and Specifications:

  • Dimensity 8200, Octa Core, 3.1 GHz Processor
  • 8/12 GB RAM, 128 GB inbuilt
  • 5000 mAh Battery with 120W Fast Charging
  • 6.78 inches, 1080 x 2400 px, 120 Hz Display with Punch Hole
  • 64 MP + 2 MP + 2 MP Triple Rear & 16 MP Front Camera
  • IR Blaster
iQOO Neo 7 5G
1Offer
iQOO Neo 7 5G

8 GB RAM | 128 GB ROM
17.22 cm (6.78 inch) Display
64MP Rear Camera
5000 mAh Battery

3) मोटोरोला एज 40 नियो (Motorola Edge 40 Neo)

Motorola Edge 40 Neo या स्मार्टफोनमध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.55 इंचचा FHD+ (1,080×2,400 पिक्सेल) poLED कर्व्ड डिस्प्ले आहे. कंपनीने त्याच्यासोबत दोन वर्षांसाठी ओएस अपडेटही दिले आहेत. प्रोसेसर म्हणून, यात 12 GB LPDDR4X रॅम आणि 256 GB UFS 2.2 स्टोरेजसह octacore 6nm MediaTek Dimensity 7030 SoC प्रोसेसर दिलेला आहे.

Motorola Edge 40 Neo
Motorola Edge 40 Neo

Motorola Edge 40 Neo च्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय, 13 मेगापिक्सेल सेंसर f/1.8 अपर्चरसह आणि 13 मेगापिक्सेल सेंसर अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह देण्यात आलेला आहे. या फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी या फोन मध्ये Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, A-GPS, GLONASS, Galileo, 3.5 mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट दिले आहेत. Motorola Edge 40 Neo मध्ये एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, गायरोस्कोप आणि SAR सेन्सर देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिलेले आहे. कंपनीने यात डॉल्बी अॅटमॉस तंत्रज्ञानासह ड्युअल स्टीरिओ स्पीकर दिले आहेत.

Motorola Edge 40 Neo मध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी यात IP68 रेटिंग दिलेली आहे.

हा स्मार्टफोन Black Beauty, Caneel Bay आणि Soothing Sea या कलर्स मध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 68W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, तुम्हाला 36 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळेल.

Motorola Edge 40 Neo या फोनची सध्या भारतात किमत ₹22,999 रुपयांपासून सुरू होते.

Motorola Edge 40 Neo Features and Specifications:

  • Dimensity 7030, Octa Core, 2.5 GHz Processor
  • 8/12 GB RAM, 128 GB inbuilt
  • 5000 mAh Battery with 68W Fast Charging
  • 6.55 inches, 1080 x 2400 px, 144 Hz Display with Punch Hole
  • 50 MP + 13 MP Dual Rear & 32 MP Front Camera
Motorola Edge 40 Neo
1Offer
Motorola Edge 40 Neo

8 GB RAM | 128 GB ROM
16.64 cm (6.55 inch) Full HD+ Display
50MP + 13MP | 32MP Front Camera
5000 mAh Battery
Dimensity 7030 Processor

2) शाओमी रेडमी नोट 13 प्रो (Redmi Note 13 Pro)

Redmi Note 13 Pro 5G हा स्मार्टफोन नुकतंच 4 जानेवारी 2024 मध्ये लाँच झाला आहे. हा फोन 6.67-इंचाच्या कर्व्ड AMOLED टचस्क्रीन डिस्प्लेसह येतो, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. आणि आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. याला Corning Gorilla Glass Victus चे प्रोटेक्शन आहे.

Redmi Note 13 Pro
Redmi Note 13 Pro

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह येतो.

Redmi Note 13 Pro 5G या फोन मध्ये 5100 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W टर्बो चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 13 Pro फोनमध्ये 200MP प्राथमिक कॅमेरा आहे, जो मागील एलईडी फ्लॅश लाईट सह येतो. हा कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरला सपोर्ट करतो. याशिवाय, फोनमध्ये 8MP अल्ट्रा वाईड आणि 2MP कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देखील असेल.

Redmi Note 13 Pro 5G या फोन मध्ये 12GB LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज पर्यंत सपोर्ट आहे. Redmi Note 13 Pro 5G हा फोन coral purple, Arctic white आणि midnight black या कलर पर्यायांसह लॉन्च करण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, Redmi Note 13 Pro 5G मध्ये Wi-Fi, GPS, NFC, USB Type C, 3G, आणि 4G (भारतातील काही LTE नेटवर्कद्वारे वापरल्या जाणार्‍या बँड 40 च्या सपोर्टसह) आहेत. फोनमधील सेन्सर्सबद्दल बोलायचे झाले तर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, एक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

यात धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP54 रेटिंग आहे.

Redmi Note 13 Pro या फोनची सध्या भारतात किमत ₹23,999 रुपयांपासून सुरु होते. आणि आता 10 जानेवारी 2024 पासून या फोनचा सेल सुरु होतोय.

Redmi Note 13 Pro Features and Specifications:

  • Snapdragon 7s Gen 2 – 4nm Samsung process
  • CPU – 4 × 2.2GHz Cortex A78
  • 4 × 1.95GHz Cortex A55
  • Adreno 710 GPU
  • Android 13 (3 Android+4 security patches updates)
  • 6.67″ 1.5K OLED TCL C7 12bit display, 120Hz refresh rate, 1800nits peak brightness, 1920Hz PWM,
  • Gorilla glass victus
  • LPDDR4x RAM and UFS 2.2 storage
  • 200MP OIS Samsung HP3+8MP+2MP rear
  • 16MP front camera
  • 5100mAh battery
  • 67 watt charging
  • X-axis linear motor
  • Dual stereo speakers
  • WiFi 5
  • Bluetooth version 5.2
  • IP54
  • 3.5mm audio jack
  • In-display fingerprint scanner
Redmi Note 13 Pro
1Offer
Redmi Note 13 Pro

8 GB RAM | 128 GB ROM
16.94 cm (6.67 inch) Display
200MP (OIS) + 8MP + 2MP | 16MP Front Camera
5100 mAh Battery
7s Gen 2 Mobile Platform 5G Processor

1) पोको एक्स 6 प्रो (Poco X6 Pro)

स्मार्टफोन कंपनी Poco ने नुकतंच त्यांची नवीन X6 सीरीज भारतात लॉन्च केली आहे. यात Poco X6 आणि Poco X6 Pro या दोन सिरीजच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. Poco X6 या सिरीज ची किंमत ₹ 19,999 पासून सुरु होते. पण आपण 25 हजार रुपयांच्या आत बेस्ट स्मार्टफोन बघतोय. त्यानुसार याचा POCO X6 Pro 5G हा फोन तुम्हाला 25 हजार रुपयांच्या आत मिळेल. या फोन मधील दमदार फीचर्स आणि याची किंमत बघता आम्ही या फोनला पहिल्या क्रमाकावर ठेवत आहे.

Poco X6 Pro
Poco X6 Pro

प्रोसेसर चा विचार केल्यास X6 Pro मध्ये MediaTek Dimensity 8300-Ultra SoC देण्यात आला आहे. तसेच यात Android 14 वर आधारित HyperOS आउट-ऑफ-द-बॉक्स देण्यात आला आहे. यात कंपनीने 3 वर्ष Android OS अपग्रेड आणि चार वर्षांच्या सुरक्षा अपडेट देण्याचे वचन दिले आहे.

यात 120 Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.67-इंच 1.5K (1,220×2,712 पिक्सेल) रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले आहे आणि 1,800 nits ची पीक ब्राइटनेस लेवल आहे. सोबतच या फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-एंगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

POCO X6 Pro मध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, 5G, ब्लूटूथ, NFC, GPS आणि USB Type-C पोर्टचा देण्यात आले आहे. धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी याला IP54 ची रेटिंग देण्यात आली आहे.

POCO X6 Pro या फोनची सध्या मूळ किंमत ₹26,999 पासून सुरु होतेय. पण सध्या लॉन्च ऑफर सुरु आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला 2 हजार रुपयांच्या डिस्काऊंट मध्ये मिळेल. यात तुम्हाला काही क्रेडीट आणि डेबिट कार्डवर 2 हजार रुपयांची सूट मिळतेय. या ऑफरचा लाभ घेतल्यास POCO X6 Pro हा फोन तुम्हाला ₹24,999 पासून मिळेल.

Poco X6 Pro Features and Specifications:

  • 6.67″ 1.5K OLED 12bit AMOLED display, 120Hz refresh rate, 1920Hz PWM dimming, 1800nit peak brightness,
  • Corning Gorilla glass victus
  • MediaTek Dimensity 8300 Ultra
  • Mali G615 MC6 GPU
  • LPDDR5x RAM and UFS 4.0 storage
  • Android 14 – HyperOS (3-yr Android OS upgrade and 4-year security updates)
  • 64MP OV64B+ 8MP ultrawide+ 2MP macro rear
  • 16MP front camera
  • 5000mAh battery
  • 67 watt charging
  • WiFi 6, 5
  • Bluetooth version 5.4
  • Plastic frame
  • In-display fingerprint scanner
  • Dual stereo speakers
  • X-axis linear motor for haptics
  • IR blaster for remote control
  • 8.05mm thickness
  • 190 gram weight
poco x6 pro
1Offer
POCO X6 Pro 5G

8 GB RAM | 256 GB ROM
16.94 cm (6.67 inch) Display
64MP + 8MP + 2MP | 16MP Front Camera
5000 mAh Battery
Dimensity D8300 Ultra Processor

तर असे हे सध्याचे top 11 Smartphone Under 25000 या प्रकारात आम्ही आमच्या अनुभव आणि निरीक्षणातून शोधलेले काही फोन आहे. आम्ही 1 ते 11 क्रमाकापर्यंत दिलेल्या नंबर वर तुम्ही असहमत असू शकतात. करत प्रत्येकाची आवड वेगळी असते. काहींना चांगला कॅमेरा हवा असतो तर काहींना चांगला डिस्प्ले किंवा प्रोसेसर हवा असतो. त्यामुळे वर दिलेल्या फोन पैकी ज्या फीचर्सची तुम्हाला आवड आहे त्या फोनची तुम्ही निवड करून विकत घेऊ शकता. हे सर्व फोन त्या त्या त्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट तसेच फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्द आहे.

Share this Post:

1 thought on “Best Smartphone Under 25000: हे आहे 25 हजार रुपयांच्या आत मिळणारे सर्वोत्तम 10 स्मार्टफोन”

  1. Hi there! Just wanted to let you know how much I enjoyed reading this post. Your approach to the subject was unique and informative. It’s clear that you put a lot of effort into your writing. Keep up the great work, and I can’t wait to see what else you have in store.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top