आता इंजेक्शनला घाबरू नका, सुई विरहित सिरिंजचा शोध, वेदनारहीत इंजेक्शन | Shock Wave Syringe| Needle Less Injection

Shock Wave Syringe

Shock Wave Syringe Injection: आजारी पडल्यानंतर अनेक लोक डॉक्टरकडून इंजेक्शन घ्यायला घाबरतात, यात कमी वयाची मुळे तर खूपच घाबरतात. पण आता इंजेक्शनला घाबरणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. त्यांना आता इंजेक्शनच्या सुईमुळे ज्या वेदना होतात त्या आता होणार नाही. यासंदर्भात आयआयटी मुंबईच्या संशोधनकर्त्यांनी एक वेगळ्या प्रकारचे इंजेक्शन शोधले आहे. त्यांनी शॉकवेव आधारित सुई विरहित सिरिंज विकसित केली आहे. त्यामुळे पेशंटला वेदनारहीत सुरक्षित इंजेक्शन देता येणार आहे. सुईच्या भीतीमुळे डॉक्टरांकडे उपचार न घेणारे किंवा लस न लावणाऱ्यांसाठी हे संशोधन वरदान घेणार आहे. वारंवार इन्सुलिन घ्यावा लागणाऱ्या डायबिटीज रुग्णासाठी हे संशोधन खूपच फायद्याचे ठरणार आहे.

आयआयटी मुंबईच्या एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या टीमने ही नवीन प्रकारची शॉकवेव आधारित सिरिंज बनवली आहे. त्यामध्ये हाय एनर्जी शॉक वेवचा वापर होणार आहे. या वेव ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त वेगाने त्वचा भेदत शरीरात औषध पोहचवते.

वेदना जाणवत नाही

शोधार्थी प्रियंका हंकारे (Ms. Priyanka Hankare, research scholar and lead author of both studies) यांनी या शॉक सिरिंज इंजेक्शनचे डिझाइन तयार केले आहे. त्या म्हणतात, ही सिरींज औषध वेगाने योग्य ठिकाणी पोहचवते. ती सामान्य सिरिंजच्या तुलनेत त्वचा आणि टिश्यूंना जास्त नुकसान करत नाही. तिचे नोझल 125 मायक्रोन (एक मानवी केसापेक्षा कमी) कमी ठेवले गेले आहे. त्यामुळे वेदना जाणवत नाही.

खर्चही कमी असणार

शॉक सिरिंजचा विकास केवळ वेदनारहीत इंजेक्शनपर्यंत मर्यादीत असणार नाही. हे एक हजारापेक्षा जास्त इंजेक्शन शॉट्स देण्यास सक्षम आहे. त्याचा खर्चही कमी असणार आहे. ज्या ठिकाणी वारंवार इंजेक्शन वापरावे लागते त्या ठिकाणी हे संशोधन क्रांतीकारक ठरणार आहे.

शॉक सिरिंज सुईने साधारण सिरिंजपेक्षा समान किंवा चांगले परिणाम दिले आहेत. उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे.

Shock Wave Syringe
Shock Wave Syringe

शॉक सिरिंजचे फायदे

  • शॉक सिरिंज त्वचेला कमी नुकसान करून औषध त्वचेत खोलवर पोहोचवते.
  • इन्सुलिन इंजेक्शनमध्ये अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.
  • सुईच्या तुलनेत कमी सूज आणि जलद जखमा बरे झाल्याचे दिसून आले.
  • चिकट औषधे (जसे की अँटीफंगल्स) इंजेक्शनमध्ये सुईपेक्षा ते अधिक प्रभावी होते.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top