Sukanya Samriddhi Yojana: दिवसेंदिवस महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढतेय. त्यामुळे दररोज आर्थिक नियोजन करणे हि आता काळाची गरज बनलीय. त्यात मुलांचे शिक्षण आणि लग्न यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. या भविष्यातील मोठ्या खर्चा साठी मुले लहान असतांनाच नियोजन केलेले कधीही फायदेशीर ठरते. यात जर मुलगी असेल तर तिच्या लग्न खर्चाचा विचार करून आई-वडील मोठ्या चिंतेत पडतात. यामुळे तर काही पालक आपल्या मुलींना उच्च शिक्षण सुद्धा देत नाही. कारण तिच्या उच्च शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा तिच्या लग्नासाठी पैसे जमवण्याचा अनेक पालक विचार करतात. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण भारत सरकार मुलींसाठी वरदान ठरेल अशी सुकन्या समृद्धी योजना घेऊन आले आहे. या योजनेत मुलीचा जन्म होताच पालक पैसे गुंतवू शकतात आणि मग भविष्यात मुलगी मोठी झाल्यावर पालकांना तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी लाखो रुपये मिळतील. यामुळे पालकांचे मोठे टेन्शन दूर होईल आणि त्यांची मुलगी सुद्धा मुलांप्रमाणे उच्च शिक्षण घेऊ शकेल.
सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक आर्थिक बचत योजना आहे, जी केवळ मुलींसाठी आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार कडून हि योजना सुरू करण्यात आली आहे. विशेषतः मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी ही योजना आहे. SSY-Sukanya Samriddhi Yojana/Scheme मध्ये 10 वर्षे वय असलेल्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे आई-वडील किंवा पालक या योजनेअंतर्गत आपल्या मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. या योजनेत अनेक Tax फायद्यांसह उच्च व्याज दर सुद्धा आहे. मुलीच्या जन्मापासून दरवर्षी योग्य गुंतवणूक केल्यास मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षी पालकांना 64 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.
सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
येथे सुकन्या समृद्धी योजनेचे पात्रता निकषांचे तपशील आहेत:
- ती मुलगी भारतीय नागरिक असावी, पुढे खाते सुरु असतांना जर ती मुलगी भारतीय नागरिक राहिली नाही तर खाते बंद होते.
- मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक हे खाते उघडू शकतात.
- मुलीच्या जन्मानंतर आणि मुलगी 10 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्यास खाते उघडू शकता.
- एका मुलीसाठी फक्त एकच खाते मंजूर आहे.
- एक कुटुंब फक्त 2 SSY योजना खाते उघडू शकते, म्हणजेच 2 मुलींसाठी खाते उघडू शकते.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये खाते कसे उघडावे?
सुकन्या समृद्धी योजने (SSY) चे खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा सहभागी सार्वजनिक आणि खाजगी बँकांमधून अर्ज करू शकतात. खाते उघडण्यासाठी काही कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
सुकन्या योजनेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- मुलीचा जन्म दाखला
- अर्जदाराचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक यांचा फोटो आयडी
- अर्जदाराचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक यांचा पत्ता पुरावा
- इतर केवायसी पुरावे जसे की पॅन, मतदार ओळखपत्र.
SSY साठी अर्ज करण्याची प्रक्रिया
RBI वेबसाइट, इंडियन पोस्ट वेबसाइट, सहभागी सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून SSY चा अर्ज डाउनलोड करा. मुलगी आणि आई-वडील किंवा कायदेशीर पालक यांच्या मुख्य तपशीलांसह फॉर्म भरा.
Sukanya Samriddhi Yojana या फॉर्ममध्ये भरण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य फील्ड खालीलप्रमाणे आहेत:
- प्राथमिक खातेदार- मुलीचे नाव
- संयुक्त धारक- आई-वडील किंवा कायदेशीर पालकाचे नाव
- प्रारंभिक ठेव रक्कम
- चेक/डीडी क्रमांक आणि प्रारंभिक ठेवीची तारीख
- जन्म प्रमाणपत्र तपशीलांसह मुलीची जन्मतारीख
- आई-वडील किंवा कायदेशीर पालकांची ओळख जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, आधार इ.
- सध्याचा आणि कायमचा पत्ता (आई-वडील किंवा कायदेशीर पालकाच्या आयडी दस्तऐवजानुसार)
- इतर केवायसी पुराव्यांचे तपशील जसे की पॅन, मतदार ओळखपत्र इ.
योजना ऑफलाइन कशी उघडायची?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते कोणत्याही सहभागी बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत उघडले जाऊ शकते. खाते उघडण्यासाठी, खाली वर्णन केलेल्या स्टेप पूर्ण करा:
- तुम्हाला जिथे खाते उघडायचे आहे त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा.
- पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडत असाल तर अगोदर आई-वडिलांच्या नावे मुख्य खाते उघडावे लागेल, त्यानंतर मुलीच्या नावे SSY मध्ये खाते उघडा.
- आवश्यक माहितीसह अर्ज भरा आणि कोणतेही सहाय्यक कागदपत्रे संलग्न करा.
- प्रथम ठेव रोख, धनादेश किंवा मागणी मसुद्यात भरा. पेमेंट रु.250 ते रु.1.5 लाख दरम्यान असू शकते.
- तुमचा अर्ज आणि पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे प्रक्रिया केली जाईल.
- प्रक्रिया केल्यानंतर, तुमचे SSY खाते सक्रिय केले जाईल. खाते उघडल्यावर या खात्यासाठी बँकेकडून पासबुक दिले जाईल.
- या पासबुकच्या माध्यमातून बँकेत जाऊन दर महिन्याला किंवा तुम्हाला हवे तसे पैसे मुलीच्या SSY खात्यात जमा करू शकता.
- फक्त वर्षातून कमीत कमी रु.250 मुलीच्या SSY खात्यात जमा करू शकतात.
- एका वर्षात तुम्ही मुलीच्या SSY खात्यात जास्तीत जास्त रु.1.5 लाख जमा करू शकतात.
- खाते भारतात कुठेही एका पोस्ट ऑफिस/बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.
SSY मध्ये घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे जमा करायचे?
तुमच्या मुलीच्या SSY खात्यात ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी अगोदर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये पोस्टाचे Mobile Banking App ‘IPPB‘ (India Post Payments Bank) हे अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही खालील स्टेप प्रमाणे सर्व गोष्टी करा:
- पोस्टात SSY खाते उघडल्यानंतर ऑनलाईन पैसे जमा करण्यासाठी तुम्ही तेथील पोस्टातून IPPB अॅप बद्दल सर्व माहिती घेऊन हे त्यांच्याकडूनच सुरु करून घेऊ शकता.
- यानंतर तुम्ही दर महिन्याला किंवा तुम्हाला हवे तसे SSY मध्ये घरबसल्या ऑनलाईन पैसे जमा करू शकता.
- यासाठी स्मार्टफोनमध्ये IPPB अॅप डाउनलोड करा
- पोस्टात आई-वडिलांनी त्यांच्या नावाने खाते उघडल्यावर त्यांना IPPB अॅप साठी लॉगीन आईडी आणि अकाऊंट नंबर दिला जाईल.
- IPPB अॅप मोबाईल मध्ये ओपन केल्यानंतर खाते उघडतांना पोस्टात जो मोबाईल नंबर दिला आहे त्याद्वारे अकाऊंट रजिस्टर करा.
- अकाऊंट रजिस्टर करतांना लॉगीन आईडी आणि अकाऊंट नंबर टाका आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यावर सबमिट करा.
- यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP येईल, तो सबमिट करा.
- यानंतर M-Pin क्रमांक तयार करा, जेणेकरून प्रत्येक वेळी अकाऊंट रजिस्टर करायची गरज राहणार नाही. पुढच्या वेळी तुम्ही M-Pin टाकला तरी लॉगीन व्हाल.
- M-Pin टाकून लॉगीन झाल्यानंतर अगोदर UPI Services मध्ये जाऊन Request Money द्वारे अगोदर SSY मध्ये जेवढे पैसे तुम्हाला जमा करायचे आहे तेवढे पोस्ट बँकेच्या अकाऊंट मध्ये जमा करा.
- यानंतर My Services मध्ये जाउन Post Office Services वर क्लिक करा.
- यानंतर Sukanya Samriddhi Account वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या मुलीच्या नावाने असलेल्या SSY चे अकाऊंट नंबर आणि कस्टमर नंबर हे अनुक्रमे SSA आणि DOP मध्ये टाका.
- यानंतर तुमच्या मुलीचे SSY अकाऊंट ओपन होईल. येथे तुम्हाला मुलीचे संपूर्ण नाव दिसेल.
- येथे Deposit Amount मध्ये जेवढी रक्कम जमा करायची आहे ती टाका आणि Pay वर क्लिक करा.
- यानंतर पुन्हा OTP येईल तो टाका. त्मच्या पोस्टाच्या अकाऊंट मध्ये जेवढी रक्कम अगोदर तुम्ही जमा केली होती त्यातून SSY साठी आता तुम्ही टाकलेली ही रक्कम कट होईल आणि मुलीच्या SSY मध्ये जमा होईल.
- यानंतर SSY मध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल.
सुकन्या योजनेचे व्याजदर किती?
सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर सरकारद्वारे निश्चित केला जातो आणि प्रत्येक तिमाहीत त्याचा आढावा घेतला जातो. ही योजना सुरु झाली तेव्हा व्याजदर 9.1 ते 9.2% होते. पण सध्या हे व्याजदर 7.6% ते 8% दरम्यान असते. सध्या 2023 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8% आहे. जो इतर योजनांच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे.
- SSY चे व्याज दर – 8% P.A. (आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी)
SSY मधील रक्कम कधी परिपक्व (मॅच्युरिटी) होते?
- जमा करण्याची रक्कम मर्यादा – दर महिन्याला जास्तीत जास्त 12,500 रुपये खात्यात जमा करता येतील. आणि दरवर्षी किमान रु.250 ते कमाल रु. 1.5 लाख जमा करता येतील.
- रक्कम जमा करण्याचा कालावधी – मुलीच्या जन्मापासून तर तिचे वय 15 वर्षाचे होईपर्यंत पालकांना यात दरवर्षी गुंतवणूक करायची असते.
- परिपक्वता/मॅच्युरिटी रक्कम – हे गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून असते. पण एकूण 22,50,000 रुपये जर तुम्ही जमा केले असेल तर तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम 63 लाख 79 हजार 634 रुपये एवढी मिळेल.
- परिपक्वता/मॅच्युरिटी कालावधी – 21 वर्षे. पण मुलगी 18 वर्ष वयाची झाल्यावर मॅच्युरिटीच्या 50% रक्कम काढता येते. उर्वरित रक्कम मुलगी 21 वर्ष वयाची झाल्यावर काढता येते.
सुकन्या समृद्धी योजना योजनेचे लाभ काय?
सुकन्या समृद्धी योजनेचे हे आहेत काही प्राथमिक फायदे:
- आर्थिक: तुमच्या मुलीसाठी पैसे वाचवण्याच्या बाबतीत SSY हा एक परवडणारा पर्याय आहे. SSY खाते सुरु ठेवण्यासाठी प्रति आर्थिक वर्ष कमीत कमी फक्त 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे.
- कमी गुंतवणूक जास्त फायदा: तुम्हाला मुलीचे वय 15 वर्षांचे होईपर्यंतच पैसे जमा करायचे आहे. त्यामुळे या योजनेत कमी गुंतवणुकीत जास्त फायदा आहे.
- चांगले व्याज दर: ही योजना सरकारद्वारे ऑफर केलेल्या इतर योजनांच्या तुलनेत उच्च-व्याज दर देते.
- Tax लाभ: कलम 80C अंतर्गत रु. 1,50,000 पर्यंत कोणीही कर कपातीचा दावा करू शकतो. तसेच, SSY वर जमा झालेले व्याज आणि मॅच्युरिटी/विड्रॉवलवर मिळालेले पैसे करमुक्त आहेत.
- परताव्याची हमी: सरकारी योजना असल्याने परिपक्वता झाल्यावर खात्रीशीर परतावा मिळू शकतो.
सुकन्या समृद्धी योजनेचे Tax लाभ
SSY ही योजना EEE दर्जासह येते त्यामुळे 3 ठिकाणी कर सवलत मिळते. जमा केलेली मूळ रक्कम, संपूर्ण कार्यकाळात मिळालेले व्याज आणि परिपक्वता (मॅच्युरिटी) लाभ करमुक्त आहेत. I.T.Act च्या कलम 80-C अंतर्गत ठेव वजावटीसाठी पात्र आहे. म्हणजेच दर आर्थिक वर्षी जमा केलेली मूळ रक्कम कलम 80C अंतर्गत रु. 1.5 लाखांपर्यंत वजा केली जाते. SSY खात्यात मिळालेले व्याज आयटी कायद्याच्या कलम -10 अंतर्गत प्राप्तिकरापासून मुक्त आहे.
सुकन्या समृद्धी योजना पैसे काढण्याचे नियम
SSY मधून पैसे काढण्याचे नियम खालीलप्रमाणे आहेत:
- SSY खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, मुलीकडून संपूर्ण रक्कम व्याजासह काढता येईल.
- सुकन्या समृद्धी योजना खाते काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत-
• रक्कम काढण्यासाठी अर्जाचा नमुना.
• ओळखपत्र आणि पत्ता पुरावा.
• नागरिकत्व दस्तऐवज.
• प्रवेश घेताना सबमिशनसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे/शुल्काची पावती पैसे काढण्यासाठी आवश्यक असेल.
• जर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल आणि तिने 10वी पूर्ण केली असेल तर उच्च शिक्षणाच्या उद्देशाने पैसे काढण्याची परवानगी आहे. लक्षात घ्या की SSY मधून काढलेले हे पैसे प्रवेशादरम्यान आकारलेली फी भरण्यासाठी वापरले जावे.
• पैसे काढण्यासाठी उपलब्ध असलेली कमाल रक्कम मागील वर्षी उपलब्ध असलेल्या रकमेच्या 50% असावी. लक्षात ठेवा ही रक्कम 5 हप्त्यांमध्ये किंवा अगदी एकरकमी काढण्यासाठी उपलब्ध असावी.
SSY खात्यातून मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम
खाते वेळेपूर्वी बंद करण्यासाठी लागू असलेले नियम खालीलप्रमाणे आहेत:
- जेव्हा मुलगी 18 वर्षांची होते आणि तिचे लग्न होणार आहे, तेव्हा SSY मधून मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे. तथापि, लाभ मिळविण्यासाठी लग्नाच्या किमान 1 महिना अगोदर आणि लग्नानंतर 3 महिन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
- जर मुलगी अनिवासी/अनागरिक झाली तर SSY खाते बंद मानले जाईल. लक्षात ठेवा, अशा स्थितीत कोणताही बदल झाल्यास, पालक किंवा मुलीला स्थिती बदलल्यापासून एक महिन्याच्या आत कळवावे लागेल.
- दुर्दैवाने, मुलीचे निधन झाल्यास, SSY खात्यात उपलब्ध असलेली शिल्लक मृत्यू प्रमाणपत्र सादर करून पालक काढू शकतात.
- एखाद्याला इतर कारणांसाठी देखील खाते बंद करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
तर अशा प्रकारे सुकन्या समृद्धी योजनेत आताच पैसे गुंतवून तुम्ही भविष्यात मुलीचे शिक्षण आणि लग्नासाठी एक चांगली बचत करू शकता. ही योजना इतर योजनांच्या तुलनेत नक्कीच खूप चांगली आहे.
(Sukanya Samriddhi Yojana – Eligibility Criteria, How to Invest in Sukanya Samriddhi Scheme, Process of Application, How to Open Offline Account,How to Open Online Account, Sukanya Yojana Interest Rates, Benefits of Sukanya Samriddhi Yojana Scheme, SSY Tax Benefits, Rules for Premature Withdrawal from SSY Account, Sukanya Samriddhi Yojana Withdrawal Rules,)