Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा बदल | एकाच घरातील सर्वच महिला पात्र | उत्पन्न आणि रेशनकार्ड नसेल तर आता नवीन पर्याय आला

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे, पण अजूनही या योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरतांना अनेक महिलांना अनेक अडचणी येत आहे. काही महिलांकडे कागदपत्रे नाही, काही महिला या योजनेच्या निकषात बसत नाही, काहीना अजूनही मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा याची माहिती नाही किंवा काहींना मोबाईलवर फॉर्म भरतांना सर्वर व्यस्त असल्यामुळे प्रोब्लेम येतोय. तर काहींचा फॉर्म चुकलाय. असे असंख्य महिलांचे अनेक प्रोब्लेम आहे. त्यापैकी अनेक महिलांनी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करून आपल्याला हे सर्व प्रश्न विचारलेय. तर आता यावरच आपण या व्हिडिओ मध्ये माहिती बघणार आहोत. कारण आता पुन्हा एकदा सरकारने फॉर्म भरणे अधिक सोपे केले आहे. सरकारकडून एक New GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार आता Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana च्या अटींमध्ये काही बदल करण्यात आले आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin yojana new update | new GR | How to fill form of Ladki bahin yojana and answers to some of your questions, how to edit ladaki bahin yojana form and new update,)

लाडकी बहीण या योजने संदर्भात नवीन GR

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana संदर्भात महाराष्ट्र सरकारने काढलेल्या नवीन GR नुसार या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेसाठी त्यांनी की नवीन बदल केले आहे. या GR मध्ये म्हटल्याप्रमाणे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना राबविण्याबाबत शासन निर्णय दि. २८.०६.२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेच्या दि. २८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशत: सुधारणा करुन दि.०३.०७.२०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णय दि.०५.०७. २०२४ अन्वये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीसाठी “अ+”, “अ” व “ब” वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने, या महानगरपालिका क्षेत्राकरीता “तालुकास्तरीय समिती” ऐवजी “ वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडी-अडीचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली “Empowered committee” शासन निर्णय दि.०८.०७.२०२४ अन्वये गठीत करण्यात आली आहे. सदर “Empowered committee” च्या बैठकीत सदर योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार योजनेची व्याप्ती वाढविण्याची बाब दि.११.०७.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत ठेवण्यात आली व त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार सदर योजनेची व्याप्ती वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

लाडकी बहीण या योजनेत नवीन बदल (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Update)

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलबाबींची स्पष्टता करण्यात येवून त्यास मान्यता देण्यात येत आहे. असं महाराष्ट्र सरकारने या GR मध्ये म्हटले आहे. म्हणजेच आता या योजनेच्या अटींमध्ये खालील बदल झाले आहे.

  • कुटुंबाची व्याखा :- “कुटुंब” याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले/मुली. असा कुटुंबाचा अर्थ शासनाने सांगितला असल्याने एका कुटुंबातील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहे. पण आता या नवीन बदला नुसार किंवा कुटुंबाच्या व्याखेनुसार एकाच घरात अनेक लग्न झालेल्या महिला असतील तर प्रत्येक महिलेचे स्वतंत्र कुटुंब मानले जाईल. यानुसार एकाच घरातील लग्न झालेल्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र ठरत आहे.
  • नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. असं या नवीन GR मध्ये सरकारने म्हटलंय म्हणजेच आता महिलेकडे रेशनकार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या महिलेने पतीचे नाव असलेले रेशनकार्ड लावले तरी चालेल.
  • परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (१) जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. या बदलामुळे ज्या महिलांकडे पतीसोबतचे एकत्र बँक खाते आहे पण स्वतःचे स्वतंत्र खाते नाही. अशा सर्व महिलांनी आता पोस्टात खाते उघडावे. फक्त काही मिनिटांत पोस्टात खाते बनवून मिळते.
  • योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजेच सुविधा केंद्रात ऑफलाईन फॉर्म जमा करत असाल तर आता लाईव्ह फोटो काढण्याची गरज नाही. फॉर्मला लावलेल्या पासपोर्ट फोटो वरून फोटो काढला तरी चालेल.
  • सदर योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.
  • केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS-DBT प्रणालीव्दारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र/राज्य शासनाच्या विविध योजनांमधील (उदा. PM- KISAN, POSHAN, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना) जे लाभार्थी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील, त्यांचा DATA माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व Aadhaar Authentication यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्याना केवळ ऑफलाईन अर्ज भरुन घेवून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र, हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरुन घेण्यात यावा.
  • गावपातळीवर ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची “ग्रामस्तरीय समिती” स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करुन त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप/पोर्टलवर भरण्यात यावेत.
  • ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात यावी. सदर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच व्दिरुक्ती (Duplication) टाळण्यात यावी.
  • शासन निर्णय दि.०५.०७.२०२४ अन्वये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीसाठी “अ+”, “अ” व “ब” वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने, या महानगरपालिका क्षेत्राकरीता “तालुकास्तरीय समिती” ऐवजी “वार्ड स्तरीय समिती” गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता “अ+”, “अ” व “ब” वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादीत न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी.
  • तालुका/वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करुन लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे.
  • नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु. ५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे.
  • सदर शासन निर्णय दि.११.०७.२०२४ रोजीच्या मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
  • सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०७१२१४०१५९४२३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
    महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New GR
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New GR
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New GR
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New GR
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New GR

तर असे काही नवीन बदल Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana च्या अटींमध्ये करण्यात आले आहे. तसेच ज्यांचा फॉर्म चुकला असेल त्यांना १६ तारखेनंतर त्यात बदल करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी १६ जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशित झाल्यानंतर ज्यांचे फॉर्म भरतांना चुका झाल्या आहे त्यांना त्या सुधारण्यासाठी १६ जुलै ते २० जुलै पर्यंतचा वेळ दिला जाणार आहे. यानंतर ०१ ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रकाशित होईल.

मोबाईल द्वारे फॉर्म भरत असाल तर कागदपत्रे PDF किंवा फोटो स्वरुपात अपलोड करायचे आहे. पण त्या कागदपत्रांची साईज (Size) १ mb पेक्षा कमी ठेवा म्हणजे अपलोड करतांना काही प्रोब्लेम येणार नाही.

How to fill form online for Ladaki bahin yojana on Narishakti Doot app – https://youtu.be/yhi6DzIRWZs?si=qp4EAHuBmRPtf-Bg

Mukhyamantri Majhi Ladki Bahin yojana full detail – https://marathijan.com/schemes/mukhyamantri-majhi-ladki-bahin-scheme-in-maharashtra/

Narishakti Doot App link – https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

यासोबतच “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या आर्टिकल खाली कमेंट करून विचारू शकता किंवा मराठीजन वेबसाईट वरून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. किंवा आमच्या मराठीजन या युट्युब चैनेल वरील खालील व्हिडिओ खाली देखील कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता.

लाडकी बहीण या योजनेसाठी पात्रता आणि अपात्रता | अनेक फॉर्म अपात्र | लाडकी बहीण या योजनेसाठी कागदपत्रे | लाडकी बहिण योजना नवीन बदल | नवीन सूचना | फॉर्म चुकला तर असा दुरुस्त करा | फॉर्म दुरुस्त करण्याची तारीख | राशन कार्ड गरज नाही | रेशन कार्ड कोणाचे लागणार | पतीचे रेशनकार्ड | उत्पन्नाचा दाखला नाही | अधिवास प्रमाणपत्र नाही | फॉर्म कुठे भरायचा | स्व घोषणापत्र | हमीपत्र डाउनलोड करा | मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा | नारीशक्ती दूत |
ladki bahin yojana, narishakti doot app, ladki bahin yojana form, ladki bahin yojana new form, ladki bahin yojana detail, ladki bahin yojana smartphone, ladki bahin yojana mobile, ladki bahin yojana online, how to online ladki bahin yojana, majhi ladki bahin yojana full detail, ladki bahin full detail, ladki bahin new, yojana, mukhyamantri majhi ladki bahin, mukhyamantri mazi ladki bahin, ration card not required, income certificate not required, ladki bahin yojana update, ladki bahin yojana new gr, ladki bahin yojana new update,

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top