Ladki Bahin Scheme in Maharashtra: महिलांना महिन्याला मिळणार 1500 रुपये – माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तसंच, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत असल्याने यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (Women between 21 and 60 years are to get ₹1,500 per month under ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin’ scheme in Maharashtra, Maharashtra’s Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar announced.)

यात महिलांसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात येत आहे. या योजनेनुसार, राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ काय आहे?

26 जानेवारी 2023 पासून मध्य प्रदेशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने ‘लाडली बहना योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1 हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चीत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना ‘मामा’ आणि ‘भैय्या’ या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळाली. शिवराजसिंह यांनी मध्यप्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली त्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. याच धर्तीवर महाराष्ट्रात युती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आणली आहे. यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी वर्षाला 2 लाख 50 हजार 500 रुपये पेक्षा कमी उत्पन्न असावे असा निकष आहे.

या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे. ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme’ या योजनेचा शासन निर्णय (GR) बघा.

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी :

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

कोण अपात्र असेल?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही, हेही सरकाराने स्पष्टपणे नमूद केलंय. ते तुम्ही खालील मुद्द्यांवरून समजून घेऊ शकता.

(1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
(2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(3) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
(4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
(6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
(8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक :

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखल
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल :

(1) पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

(2) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

(4) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

(5) अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  • स्वतःचे आधार कार्ड

या तारखेपासून अर्ज करता येतील

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख आणि सरकारकडून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्याची तारीख खालीलप्रमाणे आहे:

  • अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात – 1 जुलै, 2024
  • अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक – 15 जुलै 2024 तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक – 16 जुलै 2024
  • तात्पुरत्या यादीवरील तक्रार/ हरकती प्राप्त करण्याचा कालावधी – 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024
  • तक्रार/हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी – 21 जुलै 2024 ते 30 जुलै, 2024
  • अंतिम यादी प्रकाशन दिनांक – 01 ऑगस्ट, 2024
  • लाभार्थ्याचे बँकेमध्ये E-KYC करणे – 10 ऑगस्ट, 2024 लाभार्थी निधी हस्तांतरण – 14 ऑगस्ट, 2024
  • त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक – प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा..

आमच्या मराठीजन या वेबसाईट वरील आर्टिकल वाचण्यासोबतच आमचे विविध कोर्सेस ऑनलाईन बघण्यासाठी आमच्या मराठीजन LMS Courses या वेबसाईटला भेट द्या. जर तुम्हाला ऑफलाईन कोर्सेस शिकायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या सोबतच तुम्ही आमचे युट्युब व्हिडीओ ही बघू शकता.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त