कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक, आता सर्व कागदपत्र पुन्हा काढावे लागणार का? Mother’s Name Mandatory

Mother’s Name Mandatory: महाराष्ट्र सरकारच्या 1 मे 2024 पासून लागू झालेल्या नवीन कायद्यानुसार आता काही शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलंय. पण या सरकारी आदेशानंतर अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. याबद्दल अनेकजण सोशल मिडीयावर वेगवेगळे प्रश्न विचारत आहे. त्यामुळेच आज या कायद्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया.. (Mandatory to write mother’s name on the documents, now all the documents have to be drawn again?)

आईचे नाव लावण्याचा कायदा आहे तरी काय?

महाराष्ट्र सरकारने मार्च 2024 मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने चौथे महिला धोरण लागू केले. यात महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत 11 मार्चला झालेल्या बैठकीत शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलं. या निर्णयामागचं कारणही सरकारनं सांगितलं होतं, ते म्हणजे महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं सन्मानाची वागणूक मिळावी, महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण व्हावी, तर ज्या महिला एकल पालक असतात त्यांनाही समाजात ताठ मानेनं जगता यावं यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं.

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानुसार आता आधी आपलं नाव, नंतर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि पुढे आडनाव अशा स्वरुपात कागदपत्रांवर नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आलंय. या आदेशाची अंमलबजावणी 1 मे 2024 पासून सुरू झाली आहे.

Mother's Name Mandatory
Mother’s Name Mandatory

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीही लावले आईचे नाव

11 मार्च 2024 ला आईचं नाव लिहिण्याचा निर्णय बंधनकारक करताच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनातील पाट्याही बदलल्या. मुख्यमंत्री यांचे एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री यांचे अजित आशाताई अनंतराव पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांचे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशा नवीन स्वरुपात पाट्या लावण्यात आल्या.

Mother's Name Mandatory
Mother’s Name Mandatory

कोणत्या कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक? (Mother’s Name Mandatory)

ज्या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक आहे, त्याबद्दलची माहिती महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आदेशामध्ये दिली आहे. ती सर्व कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  1. जन्म दाखला
  2. शाळा प्रवेश आवेदनपत्र
  3. सर्व शैक्षणिक कागदपत्रे
  4. जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे
  5. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक
  6. सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लीपमध्ये (वेतन चिठ्ठी)
  7. शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)
  8. मृत्यु दाखला

या सर्व शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक आहे.

विवाहित महिलांनी नावे कसे लिहायचे?

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक असल्याचा निर्णय तर लागू करण्यात आला पण विवाहित महिलांनी नावे कसे लिहायचे? याबद्दल महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण सध्या अनेक महिला लग्नानंतर त्यांचे नाव, यानंतर पतीचे नाव आणि पुढे सासरचे आडनाव अशा प्रकारे नाव लावतात किंवा लिहितात. मग आता या सरकारी आदेशानुसार विवाहित महिलांनी त्यांच्या नावानंतर आईचे नाव आणि मग पतीचे नाव लावायचे का? असा प्रश्न अनेक महिला सोशल मिडीयावर विचारात आहे. तर याबद्दलही माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या या आदेशात देण्यात आली आहे.

2014 ला आलेल्या तिसऱ्या महिला धोरणा नुसार लग्नानंतर कागदोपत्री आडनाव बदलायचं की नाही, पतीचं नाव लावायचं की लग्नाआधीचं नाव कायम ठेवायचं हा सर्वस्वी निर्णय त्या महिलेचा असतो. पण, आता 2024 च्या निर्णयानुसार एखाद्या महिलेला नाव बदलायचं असेल, पतीचं नाव आणि आडनाव लावायचं असेल तर त्याचाही उल्लेख सरकारच्या या जीआरमध्ये करण्यात आलाय.

या सरकारी आदेशानुसार विवाहित महिलांच्या बाबतीत सध्या जी पद्धती आहे म्हणजेच आधी महिलेचं नाव, नंतर तिच्या पतीचं नाव, त्यानंतर आडनाव अशा स्वरुपात नाव लिहिण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. ज्या महिलांना आपल्या लग्नाआधीचं नाव प्रॉपर्टीच्या कागदपत्रांमध्ये ठेवायचं असेल तर ती मुभाही त्यांना देण्यात आलीय.

Mother's Name Mandatory
Mother’s Name Mandatory

तसेच अनाथ मुलं किंवा आणखी अपवादात्मक प्रकरणं असतील तर अशा परिस्थिती जन्म/मृत्यू दाखल्यांमध्ये अशा स्वरुपात नाव नोंदवण्यात सूट देण्यात आलीय.

आता सर्व कागदपत्रं बदलावी लागतील का?

तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न ज्यांनी अगोदरच कागदपत्रे काढली आहे त्यांनी काय करावं? सर्व कागदपत्रे पुन्हा नव्याने काढायची का? तर महाराष्ट्र सरकारच्या या आदेशानुसार शासकीय कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न करता उमेदवाराचं नाव, आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नोंदवणं बंधनकारक करण्यात येत आहे. पण, हा शासन निर्णय 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील. म्हणजेच 1 मे 2024 अगोदर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी त्यांचे कागदपत्रे बदलण्याची गरज नाही.

महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय 1 मे 2024 नंतर ज्या बालकांचा जन्म होईल त्यांना लागू असेल. त्यामुळे इतरांनी काळजी करण्याची गरज नाही.

Mother's Name Mandatory
Mother’s Name Mandatory

तर अशाच प्रकारच्या इतर आर्टिकल साठी आमच्या मराठीजन या वेबसाईटला भेट देवून नोटिफिकेशन सुरु करा तसेच आमचे वेब अॅप इन्स्टाल करा म्हणजे आमच्या सर्व अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचतील.

(maharashtra govrnment, mother’s name mandatory, name on documents, cm eknath shinde, devendra fadnavis, ajit pawar, name mandatory in government documents,)

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त