ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana: तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही ? आताच येथे बघा | नवीन वेबसाईट सुरु

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची (Ladki Bahin Yojana) घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच वर्षाचे 18000 रुपये मिळणार आहेत. यात सुरुवातीला महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा सरकारकडून देण्यात आली आहे. ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ या App द्वारे पात्र महिला अर्ज करू शकतात. यात आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत वेबसाईट पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्ही वेबसाईटवरूनही ऑनलाइन फॉर्म भरू शकता. अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा वेबसाईटवर फॉर्म भरायची गरज नाही. पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, त्यांनी आता वेबसाईटवरून फॉर्म भरावा लागेल.

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण Ladaki Bahin Yojana’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी काही महिलांनी मराठीमध्ये (Ladaki Bahin Yojana Marathi Form Update) अर्ज केले आहेत. सुरुवातीला हे मराठी भाषेत केलेले अनेक अर्ज रिजेक्ट झाले यामुळे सरकारवर खूप टीका झाली, त्यामुळे आता सरकारने निर्णय घेत पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील, मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

माझी लाडकी बहिन योजना साठी या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करा

  • सर्वप्रथम अर्जदार महिलेला माझी लाडकी बहिण या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.(अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा)
  • आता मेनूमध्ये तुम्हाला “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करावे लागेल .
  • येथे तुम्हाला “Doesn’t have account – Create Account” पर्यायावर क्लिक करावे लागेल . आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर दिलेले नाव, पत्ता, जिल्हा, तालुका किंवा महानगरपालिका, पासवर्ड इत्यादी टाकावे लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि साइनअप पर्यायावर क्लिक करा. यांनतर तुमची प्रोफाईल तयार होईल.
  • नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला पुन्हा अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि मेनूबारमधील मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिन योजना लिंकवर क्लिक करावे लागेल .
  • तुमच्या पेजवर तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मिळालेला OTP एंटर करा आणि Verify OTP बटणावर क्लिक करा .
  • आता तुम्हाला आधीच एंटर केलेली माहिती तपासून पुढे त्यात बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC क्रमांक इत्यादी टाकावे लागतील. (बँक खाते आधार कार्डला लिंक असावे)
  • यानंतर तुम्हाला तुमची आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. (आवश्यक कागदपत्रे खाली दिलेली आहे)
  • त्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करा आणि यानंतर Disclaimer हे Accept करून फॉर्म सबमिट करा .

अशा प्रकारे तुम्ही अधिकृत वेबसाइटद्वारे महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज मंजूर झाला आहे का? हे कसे पाहायचे?

जमा केलेल्या अर्जाची स्थिती (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) काय आहे हे कसे चेक करायचे किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे का? हे कसे पाहायचे? याबद्दल थोडक्यात माहिती बघूया..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करा किंवा Narishakti Doot ॲप अगोदरच मोबाईल मध्ये असेल तर ते अपडेट करा.

  • Narishakti Doot ॲप मध्ये मोबाईल नंबर आणि नंतर OTP टाकून लॉगीन करा
  • लॉगिन केल्यानंतर होम पेज वर “यापूर्वी केलेले अर्ज” या पर्यायावर क्लिक करा
  • तुमच्या समोर तुम्ही एकाच मोबाईल वरून किंवा प्रोफाईल वरून केलेले सर्व अर्ज दिसतील.
  • तुम्हाला ज्या महिलेच्या अर्जाचे Status बघायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा.
  • अर्ज ओपन झाल्यावर वरती आपल्याला 4 पर्याय दिसतील त्यामध्ये sms verification done, आणि त्याच्या पुढे सर्कल मध्ये (i) असा आयकॉनचा सिम्बॉल दिसेल,
  • (i) या आयकॉन वर क्लिक करून तुम्ही Status नुसार फॉर्म वर काय कारवाई करायची त्याबद्दल माहिती बघू शकता
  • त्यानंतर खाली तुम्हाला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – In Pending to submitted किंवा In Review, Rejected, Approved, Disapproved या पर्यायांपैकी एक पर्याय Status ला दिलेला असेल.
  • त्यानंतर खाली Edit Form असाही पर्याय दिसेल.
  • जर In Review असे Status असेल तर तुमचा फॉर्म वर अजून कारवाई झालेली नाही
  • जर Approved असे Status असेल तर तुमचा फॉर्म स्वीकारण्यात आला आहे, आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही.
  • जर Rejected किवा Disapproved असे Status असेल तर तुमचा फॉर्म अपात्र ठरला आहे, त्यामागचे कारणही View Reasons या पर्यायमध्ये दिसेल.
  • त्यानंतर खाली Edit Form चा पर्याय ओपन करून फॉर्म अपात्र झाल्याचे कारण जे दिले असेल ते दुरुस्त करून योग्य ती माहिती भरून पुन्हा फॉर्म सबमिट करा.
  • लक्षात ठेवा हे Edit Form चे ऑप्शन एकदाच मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा. यानंतर दिलेली माहिती योग्य असेल तर तुमचा फॉर्म Approved होईल.

ऑनलाईन अर्ज (Apply Online CM Majhi Ladki Bahin Yojana): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) पात्रता?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी :

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित व अविवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
  • सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) अपात्रता?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही, हेही सरकाराने स्पष्टपणे नमूद केलंय. ते तुम्ही खालील मुद्द्यांवरून समजून घेऊ शकता.

(1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
(2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(3) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
(4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
(6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. (नवीन अपडेट नुसार ही अट वगळण्यात आली आहे.)
(8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

लाडकी बहीण योजना कागदपत्रे (Ladki Bahin Yojana documents)

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक :

  • Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana च्या लाभासाठी अर्ज
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षांपूर्वीचे 1) रेशनकार्ड, 2) मतदार ओळखपत्र, 3) शाळा सोडल्याचे ओळखपत्र, 4) महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे व केसरी रेशनकार्ड
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1) जन्म दाखला 2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3) आधिवास प्रमाणपत्र, हे ग्राहय धरण्यात येईल.
  • सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

आमच्या मराठीजन या वेबसाईट वरील आर्टिकल वाचण्यासोबतच आमचे विविध कोर्सेस ऑनलाईन बघण्यासाठी आमच्या मराठीजन LMS Courses या वेबसाईटला भेट द्या. जर तुम्हाला ऑफलाईन कोर्सेस शिकायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या सोबतच तुम्ही आमचे युट्युब व्हिडीओ ही बघू शकता.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top