RTE अंतर्गत खाजगी शाळेत फ्री शिक्षण घेण्यासाठी सर्व माहिती | How to Apply for RTE Admission Free School Education in Maharashtra

RTE Admission Free School Education: अनेक पालकांचे आर्थिक उत्पन्न कमी असल्याने ते आपल्या बालकांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण नाही देऊ शकत. या कारणामुळेच 6 ते 14 वयोगटातील आर्थिक उपन्न कमी असलेल्या बालकांना मोफत शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने 2009 साली ‘शिक्षणाचा अधिकार अधिनियम’ किंवा RTE ACT म्हणजेच Right to Education हा कायदा पारित केला. या RTE कायद्याअंतर्गत बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. (How to Apply Online for RTE Admission Free School Education in Maharashtra)

देशात RTE कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी अधिसूचना काढली. आणि दोन वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारने ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यास सुरु केली.

RTE अंतर्गत 25% जागा राखीव

RTE ACT 2009 या कायद्यातील कलम 12(1) (C) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी 25% जागा वंचित आणि दुर्बल गटांतील बालकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यासाठीची रक्कम सरकारमार्फत शाळांना देण्यात येते. यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये प्रवेशासाठी कोणतेच बंधने नसल्याने इथं या RTE ACT अंतर्गत प्रवेश करण्याची गरज नाही. याशिवाय अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांनाही प्रवेशाबाबत स्वातंत्र्य असल्यामुळे तिथेही RTE ACT लागू होत नाही. त्यामुळे फक्त खासगी शाळांमध्ये ही RTE ACT ची प्रवेश प्रक्रिया लागू होते.

RTE अंतर्गत प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो?

RTE ACT 2009 या कायद्या अंतर्गत प्रवेशासाठी वंचित गट आणि दुर्बल गट असे दोन प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. या दोन गटात खालील विध्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

वंचित गट:
1) जात संवर्ग : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC).
2) दिव्यांग बालके : यात दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
3) HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके
4) कोव्हीड प्रभावित बालके (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले)
5) अनाथ बालके

ई बालकांचा वंचित गटात समावेश करण्यात आलेला आहे. पण वंचित गटातील या सर्व विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. म्हणजेच त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही.

दुर्बल गटासाठी मात्र आर्थिक उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे. 15 मार्च 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेमध्ये वरील वंचित गटात समाजगटाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व प्रवर्गांचा समावेश दुर्बल गटात होऊ शकतो असं म्हटलं गेलंय. या द्वारे प्रवेश घेण्याऱ्या गटातील विध्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावे अशी अट आहे. म्हणूनच या गटाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा सादर करावा लागेल. या गटासाठी सादर करावे लागणारे इतर कागदपात्रांबद्दल माहिती खाली दिलेली आहे.

RTE अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

RTE अंतर्गत फ्री प्रवेशासाठी आपल्या जवळच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती येथे दिलेली आहे. ही सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करायची आहे. बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE अंतर्गत फ्री प्रवेशासाठी सर्वच बालकांची सादर करणे आवश्यक आहेत.

1) बालकाचे आधार कार्ड
2) रहिवासी दाखला : अर्जामध्ये जो सध्याच्या वास्तव्याचा जो पुरावा सादर करणार आहेत तोच रहिवासाचा पुरावा असेल. यातील रहिवासी पुराव्यावरीलच पत्ता अर्जावर सुद्धा लिहावा.
3) जन्मदाखला : बालकाची जन्म दिनांकाची नोंद असलेला जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्मदाखला सादर करावा.
4) जातीचा दाखला : बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाण पत्र सादर करावे.
5) उत्पन्न दाखला : बालक आर्थिक दुर्बल संवर्गातून असेल तर प्रवेशाकरिता 1 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला सादर करावा. यात तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, salary स्लीप, कंपनीचा किंवा Employer चा दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही .
6) दिव्यांगांसाठी दाखला : दिव्यांग असल्यास 40% आणि 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
7) घटस्फोटीत महिला असल्यास : न्यायालयाचा निर्णय आणि इतर वर दिलेली कागदपत्रे.
8) विधवा महिला असल्यास : पतीचे मृत्युपत्र आणि इतर वर दिलेली कागदपत्रे.

RTE अंतर्गत फ्री प्रवेशासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती https://student.maharashtra.gov.in/adm_portal/app/webroot/uploads/REQUIRED_DOCUMENTS_2023.pdf या सरकारच्या ऑनलाईन PDF फाईल मध्ये मिळेल.

RTE अंतर्गत कोणत्या शाळेत प्रवेश घेऊ शकतो?

सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सी.बी.एस.ई.(CBSE), आय.सी.एस.ई.(ICSE) व आय.बी.(IB) ई.) सह विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील शाळा आहे. (मदरसा, क्लब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक ई शाळा वगळून). यात तुम्ही राहत असलेल्या परिसरातील RTE अंतर्गत येणाऱ्या शाळांची लिस्ट खाली दिलेल्या सरकारी वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

RTE साठी अर्ज केव्हा करता येईल?

शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधी मध्येच अर्ज करता येईल. साधारणतः ही प्रवेश प्रक्रिया दरवर्षी मार्च महिन्यापासून सुरू होते. यासाठी मागील वर्षाची प्रक्रिया बघता RTE अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात होऊ शकते. याबद्दल ऑफिशियल वेबसाईटवर सर्व माहिती मिळेल. त्यासाठी वेबसाईटवर एक नोटीफीकेशन जारी करण्यात येते.

RTE साठी अर्ज कसा करावा?

RTE ACT अंतर्गत 25% राखीव जागांत मोफत प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा. त्याठिकाणी ऑनलाईन अॅप्लीकेशन (Online Application) नावाच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक अर्ज समोर येईल. यात मागितलेली सर्व माहिती भरून तुम्ही RTE प्रवेशासाठी अर्ज करता येऊ शकता. अर्ज भरण्यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर या वेबसाईटच्या होमपेजवर आरटीई प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक व्हिडिओ दिलेला आहे. तसंच येथे मार्गदर्गक पत्रिका (User Manual) मध्ये पालकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाही दिलेल्या आहेत.

ऑनलाईन अर्ज आपण घरी आपल्या कॉम्पुटरवरून किंवा लॅपटॉपवरून भरू शकतात. किंवा बाहेर अनेक सायबर कॅफे मध्येही RTE साठी अर्ज करण्यासाठी सुविधा आणि मदत उपलब्ध करून दिली जाते. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण येत असल्यास प्रशासनाने RTE प्रवेशासाठी अर्ज करण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्रही निश्चित केले आहेत. याठिकाणी जाऊनही आपल्याला अर्ज भरता येऊ शकतो.

RTE साठी अर्जांची निवड कशी होते?

RTE अंतर्गत प्रवेशासाठी आलेल्या सर्व अर्जांपैकी काही अर्जांची निवड ऑनलाईन स्वरुपातच लॉटरीच्या माध्यमातून होते. तुम्ही ज्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करताय त्या शाळेपासून तुम्ही जितके जवळ राहत असाल तितकी तुमच्या अर्जाची निवड होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच त्या विशिष्ट शाळेपासून पहिल्या 1 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा आरक्षित जागांसाठी प्राधान्याने विचार केला जातो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्या शाळेपासून 1 ते 3 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार केला जातो. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात त्या शाळेपासून 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार केला जातो.

यातून हे स्पष्ट आहे की सर्वांत अगोदर त्या विशिष्ट शाळेपासून 1 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या अर्ज स्वीकारला जातो. त्यानंतरही जर त्या शाळेतील आरक्षित जागा शिल्लक असेल तर मग 1 किलोमीटर पेक्षा दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार केला जातो. म्हणूनच तुम्ही जेथे राहताय तेथून जवळच असलेल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी तुम्ही RTE अंतर्गत अर्ज करायला हवा.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त