Animal Trailer Review: अरे बापरे हे काय बघितलं मी – सनकी, हिंसा, मारधाड, रक्तपात

Animal Trailer Review 2

Animal Trailer Review: अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आणि हा ट्रेलर बघितल्यानंतर ‘अरे बापरे हे काय बघितलं मी’ ‘खतरनाक’ ‘सुपरहिट’ ‘जबरदस्त’ अशेच शब्द तोंडातून निघतात. (Director Sandeep Reddy Vanga and Actor Ranbir Kapoors Animal Movie Trailer Review)

सुपरहिट कबीर सिंग या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि आता ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितल्याप्रमाणेच या ट्रेलरमध्ये रणबीरचे हिंस्त्र आणि सनकी रूप, हिंसा, मारधाड, रक्तपात असं सर्वकाही या चित्रपटात आहे. त्यामुळे अ‍ॅनिमल हा चित्रपट लहान मुलांसाठी नाही. तर 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी आहे. म्हणूनच या चित्रपटाला सेन्सॉरकडून ‘ए’ सर्टिफिकेट मिळालंय.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच रणबीर कपूर व अनिल कपूर या वडील-मुलामधील एका वेगळ्याच अन् विचित्र नात्याची आपल्याला झलक पाहायला मिळत आहे. यात आपल्या वडिलांनाच आपला आदर्श मानणारा, वडिलांवर भरपूर प्रेम करणारा आणि त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाणारा एका क्रिमिनल मुलांचं रूप रणबीरने अतिशय उत्तमरीत्या साकारलय. बाप अनिल कपूर त्याच्या व्यस्ततेमुळे आपला मुलगा लहान असल्यापासून त्याला वेळ देऊ शकला नाही. पण तरीही मुलाचं बापावर खूप प्रेम असतं. “अब एक और खरोच आयी तो दुनिया जला दुंगा” असं रणबीर त्याच्या बापाबद्दल या ट्रेलर मध्ये म्हणताना दिसतोय. यात तो बापावर असलेल्या प्रेमापोटी अगदी हिंसक आणि सनकी बनल्याचाही दिसतोय. म्हणूच चित्रपटाचे ‘अ‍ॅनिमल’ असं आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अजून एक सरप्राईज करणारी गोष्ट म्हणजे बॉबी देओलचे पात्र. बॉबी देओल हा या चित्रपटात व्हिलन चे पात्र साकारतोय. चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटी त्याचे फक्त 3 सीन दाखवलेय. पण काय कमाल सीन आहे हे. एक हि डायलॉग न बोलता बॉबी देओल हा हिरो वर भारी पडल्याचे दिसतोय. शेवटचा सीन कर एकदम जबरदस्त आहे. यात बॉबी देओल हा रणबीरच्या पाठीवर पाठ ठेवून झोपलाय आणि सिगारेट पितोय. कमाल सीन आहे हा. एकदरीच अ‍ॅनिमल चित्रपटात व्हिलन हा हिरो पेक्षा खूप खतरनाक आहे. आणि यामुळेच हा चित्रपट सुपरहिट होणार असं दिसतंय. कारण ज्या चित्रपटात व्हिलन हा हिरो ला वरचड ठरतो तो चित्रपट बॉक्स ऑफिस वर तुफान चालतो असं आजपर्यंत आपण बघितलं आहे. या चित्रपटात बॉबी देओलचे व्हिलनचे पात्र मुकं असणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे व्हिलनच्या बाबतीत केलेला हा नवीन प्रयोग बघण्याची नक्कीच फार उत्सुकता आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच फार हिंसक असणार हे या ट्रेलरवरुन स्पष्ट होतय. या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये बाप-मुलाच्या नात्याबरोबरच जबरदस्त अॅक्शन, प्रचंड हाणामारी आणि हिंसा पाहायला मिळतेय. तसेच यात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना याची लव्ह स्टोरीची झलक सुद्धा पाहायला मिळतेय. हि लव्ह स्टोरी कबीर सिंग चित्रपटासारखा फील देते. सनकी हिरो आणि त्याच्या प्रेम करणारी सुंदर प्रेमिका अशी लव्ह स्टोरी वाटतेय. त्यात काही ठिकाणी तर संजू चित्रपटाचा फील येतो कारण रणबीरचा लुक हा त्याठिकाणी एकदम संजू बाबा सारखाच वाटतोय. तर एक्शन मध्ये हा चित्रपट KGF सारख्या चित्रपटाचा फील देतो.

तर असा या चित्रपटाचा ट्रेलर आहे. हा अप्रतिम ट्रेलर बघितल्यानंतर चित्रपट बघण्याची खूप उत्सुकता निर्माण होते. हा चित्रपट 3 तास 21 मिनिटांचा असेल. चित्रपट मोठा असला तरी यातील कहाणी आणि एक्शन बघता प्रेक्षकांना अजिबातही बोअर होणार नाही असं ट्रेलर वरून वाटतंय.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबरला हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top