Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी आणि माधवी यांची पहिली भेट, सिगारेटसाठी पैसे मागितले, कसला हा माणूस ?

Ravindra Mahajani and Madhavis first meeting

Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. खरंतर रवींद्र महाजनी यांच्याबद्दलचे हे खुलासे ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय. या पुस्तकात माधवी महाजनी यांनी त्यांच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी शेअर केल्या आहे. त्यापैकीच एक आठवण म्हणजे शाळेत असतांना रवींद्र महाजनी सोबत झालेली पहिली भेट. आणि या भेटीतच त्या कशा प्रेमात पडल्या होत्या याविषयीचा खुलासा. (Actor Ravindra Mahajani and Madhavi’s first meeting)

ही आठवण सांगत माधवी यांनी म्हटलंय की “मी दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीज गर्ल्स स्कूल (किंग जॉर्ज) शाळेत दहावीत शिकत होते. स्वप्नाळू वय. किंग जॉर्ज शाळेच्या वर्गातील खिडकीतून रस्ता दिसत असे. तेव्हा तिथून जाताना एक देखणा युवक मी पहात असे. तो कधी दिसेल म्हणून मी वर्गातल्या बाकावर बसून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसत असे. त्याचं एकदा दर्शन झालं की मी खूश! माझा दिवस अगदी छान जायचा. त्याच्या जाण्यायेण्याची वेळ आता मी लक्षात ठेवू लागले. एखाद दिवशी तो दिसला नाही की मी अगदी नाराज व्हायची. जणू तो दिवस अगदी फुकट गेला असे वाटत असे. ओळख होण्याआधीच त्याच्या अगदी प्रेमातच पडले होते मी.”

“शाळेतून घरी आलं की, दूध पिऊन आम्ही मैत्रिणी फिरायला बाहेर पडायचो. त्याच वेळी काही मुलंही फिरायला येत. आता ती आमच्या ओळखीची झाली होती. त्यातल्याच एकाबरोबर मी एकदा रवीला पाहिलं. त्याचं नाव रवींद्र असल्याचं कळलं. तोच धागा पकडून मी त्या रवीच्या मित्राला एकदा म्हटलं, ‘रवी तुमचा मित्र का ? आमची एकदा ओळख करून द्या ना त्याच्याशी.’ माझी तो कधी ओळख करून देतोय असं झालं होतं मला. मग असंच फिरायला जाताना तो मित्र रवीला एकदा घेऊन आला आणि त्यानं रवीशी माझी ओळख करून दिली. रवीनं माझ्याशी शेकहँड केला.” अशा प्रकारे माधवी यांची रवींद्र महाजनी सोबत पहिल्यांदा भेट झाली होती.

यांनतर पुढे माधवी यांनी म्हटलंय की “नाक्यावर काही तरुणतरुणी नेहमी चहाकॉफीसाठी जमत. तिथे नाक्यावरच रवी उभा असे. एक दिवस माझी जवळची मैत्रीण सुधा हिला मी म्हटलं, ‘चल, मी तुझी रवीशी ओळख करून देते.’ मी सुधाला तिथे घेऊन गेले. रवीशी मी तिची ओळख करून दिली. थोड्या वेळानं रवी तिला म्हणाला, ‘दोन रुपये देतेस? मी जरा सिगरेट घेऊन येतो.’ आम्ही दोघी अवाक्. थोडंफार बोलणं होऊन आम्ही निघालो. निघाल्याबरोबर सुधा म्हणाली, ‘कसला हा माणूस ? ओळख करून घेण्यासाठी आपण आलो, आणि पहिल्याच भेटीत मला पैसे मागतो हा… !’

मीही म्हणाले, ‘हो ना, एक वेळ मला मागितले असते तरी गोष्ट वेगळी, पण…’ बोलण्यासारखं काही उरलंच नाही. एक मात्र सुधानं मला वारंवार बजावून सांगितलं की, ‘ह्या माणसाशी तू नको संबंध ठेवूस. दूर रहा. ‘” असं माधवी यांनी त्यांच्या या पुस्तकात म्हटलं आहे.

रवींद्र महाजनी हे त्यावेळी प्रेमभंग झाल्याने व्यसन करत, जुगार खेळत, शिक्षण सोडलं, नोकरी करायचे नाही अशी त्यांची अवस्था होती. पण ते या सर्व गोष्टी माधवी यांना सांगत असल्याने माधवी यांना त्यांचा खरेपणा खूप आवडला आणि त्या अजूनच त्यांच्या प्रेमात पडत गेल्या. पुढे माधवीची आई, मैत्रिणी आणि स्वतः रवींद्र महाजनी यांच्या आई या सर्वांचा विरोध असूनही माधवी यांनी रवींद्र महाजनी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. असंही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे.

chautha anka book
1Our Pick
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top