या प्रसिद्ध गायकाने दारूच्या बाटलीसाठी नोकराला केली बेदम मारहाण? Rahat Fateh Ali Khan Viral Video

Rahat Fateh Ali Khan Viral Video

Rahat Fateh Ali Khan Viral Video: प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान याने बॉलीवूड मध्ये आतापर्यंत सुपरहिट गाणे गायले आहे. विशेषतः सलमान खानच्या अनेक चित्रपटांत त्याने गाणे म्हटले आहे. पण सध्या गायक राहत फतेह अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे त्याच्यावर खूप टीका होत आहे.

दारूच्या बाटलीसाठी नोकराला मारहाण

बॉलिवूड मधील चित्रपटांत अनेक सुपरहिट गाणे गाणारा पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये तो त्याच्या नोकराला चप्पलने मारताना दिसत आहेत. मारहाण करताना तो “माझी बाटली कुठे आहे” असंही त्या नोकराला विचारतांना दिसतोय. यात बहुतेक दारूच्या एका बाटलीसाठी राहत फतेह अली खानने त्याच्या नोकराला बेदम मारहाण केल्याची दिसतेय. राहत फतेह अली खानच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओखाली अनेक सोशल मिडिया युजरने त्याला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.

अनेक सोशल मिडिया युजर्सने राहत फतेह अली खानवर टीका करत राहत फतेह अली खान याने स्वतः दारू पिवून नोकराला मारहाण केल्याचे काहींनी म्हटले आहे. तसेच राहत फतेह अली खान याच्यावर बहिष्कार टाकावा असंही काहींनी म्हटलं आहे.

राहत फतेह अली खानचे स्पष्टीकरण

नोकराला मारहाण करतानाचे राहत फतेह अली खानचे व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाल्याने त्याच्या खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. यावर आता एक व्हिडीओ जारी करत राहत फतेह अली खानने त्या व्हायरल व्हिडीओ बद्दल स्पष्टीकरण दिले आहे. यात त्याने व्हायरल व्हिडिओमध्ये तो ज्याला मारहाण करताना दिसत आहे, तो त्याचा शिष्य असल्याचे राहत फतेह अली खानने म्हटले आहे. तसेच तो असंही म्हणाला आहे की गुरु आणि शिष्य यांचे नाते असे आहे की त्याच्या चांगल्या कामासाठी आपण त्यांच्यावर प्रेम करतो, आणि जेव्हा तो चूक करतो तेव्हा त्याला आपण त्याला शिक्षाही करतो.

मारहाण झालेल्या नोकराचा खुलासा

तसेच या व्हिडिओ मध्ये राहत फतेह अली खानने ज्या व्यक्तीला मारहाण केली होती तोही दिसत आहे. त्याने या व्हिडीओत म्हटले आहे की त्याच्या राहत फतेह अली खानने दारूच्या बाटलीसाठी त्याला मारहाण केली हे खोटे आहे. खरंतर त्यात पाणी होतं आणि ती पाण्याची बाटली मी कुठेतरी विसरलो होतो. त्यामुळे उस्तादांनी मला मारहाण केली पण नंतर त्यांनी माझी माफीही मागितली हा त्यांचा मोठेपणा आहे. असं त्या व्यक्तीने म्हटलं आहे. या सोबतच इतर व्हिडीओ मध्ये त्या व्यक्तीने उस्तादांनी माझी माफी मागितली आहे, त्यांच्या महानतेपुढे मला लाज वाटते असंही तो व्यक्ती म्हणत आहे.

राहत फतेह अली खानने बेदम मारहाण करून सुद्धा तो व्यक्ती फक्त राहत फतेह अली खानला घाबरून किंवा दबावाखाली खोटं बोलत असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top