Precautions To Avoid Heatstroke: उन्हाळा आला आहे आणि कडक उष्णता आहे! या लेखात उष्माघात टाळण्यासाठी ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, नाशिक’ यांनी सर्व नागरिकांना ‘काय करावे ? आणि काय करु नये ?’ याविषयी आवश्यक टिप्स दिल्या आहे. हायड्रेटेड कसे राहायचे, हवामानासाठी कपडे कसे घालायचे आणि सर्वात उष्ण महिन्यांत स्वतःला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या बाह्य क्रियाकलापांची योजना करा आणि खाली दिलेल्या प्रक्रियांचे पालन करत उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करा: (Precautions to be taken by citizens to avoid heatstroke in summer)
उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता (Precautions To Avoid Heatstroke):
काय करावे ?
१. पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
२. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
३. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
४. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
५. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
६. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
७. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
८. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
९. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित कराया.
१०. अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
११. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
१२. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
१३. पंखे. ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे
१४. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
१५. सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
१६. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
१७. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
काय करु नये ?
१. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.
२. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
३. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
४. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
५. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
६. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
७. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
८. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, नाशिक यांचेकडून ह्या काही टिप्स नागरिकांना देण्यात आल्या आहेत. तरी आपण या उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी वरील टिप्स फॉलो कराव्यात आणि स्वतःचा तसेच आपल्या परिवाराचा या कडक उष्णतेपासून बचाव करावा.
Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच हा आर्टिकल लिहिण्यामागचा आमचा उद्देश आहे.