OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात झाले लॉन्च, बघा किंमत आणि Specifications

OnePlus 12 and OnePlus 12R

स्मार्टफोन कंपनी वनप्लसने 23 जानेवारी रोजी भारतात OnePlus 12 आणि OnePlus 12R हे स्मार्टफोन लॉन्च केले आहे. यातील OnePlus 12 हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर सह लॉन्च होणारा हा कंपनीचा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. यात Sony LYT-808 सेन्सरसह 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. तसेच यात 3x ऑप्टिकल झूमसह 64 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे.

OnePlus 12R हा स्मार्टफोन OnePlus Ace 3 चा रिब्रांडेड वर्जन आहे. यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. यात 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे 100 W SuperVOOC वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

या दोन्हीही फोनची विक्रीसाठी पहिला सेल 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता OnePlus ची ऑफिशियल वेबसाईट आणि Amazon या वेबसाईट द्वारे सुरु होईल. तसेच ऑफलाइन स्टोअरद्वारे सुद्धा हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. तर बघूया या दोन्हीही फोनचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस तसेच या फोनची भारतात किंमत काय? याविषयीची माहिती.

OnePlus 12 चे फीचर्स

OnePlus 12 हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित OxygenOS 14 वर चालतो. यात Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिलेला आहे. OnePlus 12 च्या डिस्प्ले मध्ये Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शनसह 6.82-इंच क्वाड एचडी+ (1,440 x 3,168 पिक्सेल) LTPO 4.0 AMOLED स्क्रीन आहे. या फोन मध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे, जी 100 W SuperVOOC वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

याचे ट्रिपल रियर कॅमेरा युनिट Hasselblad ने ट्यून केले आहे. यात Sony LYT-808 सेन्सर आणि f/1.6 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. याशिवाय, 3x ऑप्टिकल झूमसह 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 64-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आलेला आहे. OnePlus 12 च्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

OnePlus 12 या स्मार्टफोनच्या 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. आणि 16 GB RAM + 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे. OnePlus 12 हा स्मार्टफोन Flowy Emerald आणि Silky Black रंगांमध्ये उपलब्ध झाला आहे.

OnePlus 12R चे फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच 1.5K (1,264×2,780 pixels) LTPO 4.0 AMOLED स्क्रीन आहे. यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर सोबत 16 GB LPDDR5x रॅम आहे. यात 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे, जी 100 W SuperVOOC वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

OnePlus 12R मध्ये Sony IMX890 सेन्सर आणि f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल कॅमेरा दिलेला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोन मध्ये फ्रंटला 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनचा आकार 163.3 x 75.3 x 8.8 मिमी आहे आणि त्याचे वजन अंदाजे 207 ग्रॅम आहे.

OnePlus 12R च्या 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे, आणि 16 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Cool Blue आणि Iron Gray या कलर्स मध्ये खरेदी करू शकता.

OnePlus 12 Specifications

  • 6.82″ 2K OLED LTPO 3.0 Pro-XDR BOE X1 display, 120Hz refresh rate, 1600nits HBM
  • Snapdragon 8 Gen 3 – TSMC 4nm
  • LPDDR5x RAM and UFS 4.0 storage
  • Adreno 750 GPU
  • Snapdragon 8 Gen 3 chipset
  • Android 14
  • 50MP Sony LYT808 OIS+ 48MP IMX581+ 64MP omnivision OV64B OIS Periscope zoom lens rear
  • 32MP Sony IMX615 front camera
  • IR blaster for remote control
  • NFC
  • 5400mAh battery
  • 100 watt wired charging
  • 50 watt wireless charging
  • 10 watt reverse wireless charging
  • USB 3.2 Gen 1 port
  • WiFi 7, 6, 5
  • Bluetooth version 5.4
  • IP65 water & dust resistance rating
  • Rain touch technology
  • Alert slider on left side
  • Volume rockers on the right side
  • New X-axis linear motor for haptics AAC Technologies (CSA+ 0916) Bionic vibration motor codename Megatron
  • Optical In-display fingerprint scanner
  • Super linear dual stereo speakers
  • 4500nits peak brightness, 1600nits peak full screen brightness, DisplayMate A+ rating, Dolby vision,
  • Gorilla Glass Victus protection, 2160Hz PWM dimming
  • Pixelworks X7 Independent display
  • Supervooc S chip
  • 9.15mm thickness
  • 220 gram weight
  • Price : 12GB+256GB = ₹64,999 | 16 GB+512 GB = ₹69,999
  • Sale date: 12 pm on February 6 via OnePlus, Amazon website and offline stores

OnePlus 12 Specifications

  • 6.78″ 1.5K BOE X1 8T LTPO OLED curved ProXDR display, 120Hz refresh rate, Gorilla glass victus 2, 1600nits HBM
  • Snapdragon 8 Gen 2 chipset
  • Adreno 740 GPU
  • LPDDR5x RAM and UFS 4.0 storage
  • 128GB UFS 3.1
  • Android 14
  • 50MP Sony IMX890 OIS+ 8MP IMX355 ultrawide+ 2MP rear
  • 16MP Samsung front camera
  • 5500mAh battery
  • 100 watt charging
  • In-display fingerprint scanner
  • Dual stereo speakers
  • NFC multi directional
  • X-axis linear motor for haptics
  • WiFi 7, 6, 5
  • Bluetooth version 5.3
  • Alert slider
  • Metal frame
  • Dolby Vision
  • Dolby Atmos
  • In-display fingerprint scanner
  • IR blaster for remote control
  • 8.8mm thickness
  • 207 gram weight
  • Pixelworks X7 Independent chip
  • Price : 8GB+128GB = ₹39,999 | 16GB+256GB = 45,999
  • Sale date: 12 pm on February 6 via OnePlus, Amazon website and offline stores

Check Price

OnePlus 12 5G
1Offer
OnePlus 12 5G

12 GB RAM | 256 GB ROM
17.32 cm (6.82 inch) Display
64MP Rear Camera
5400 mAh Battery

OnePlus 12R
2Offer
OnePlus 12R

Display: 6.78-inch (2780×1264)
Processor: Snapdragon 8 Gen 2
Front Camera: 16MP
Rear Camera: 50MP + 8MP + 2MP
RAM: 8GB, 16GB
Storage: 128GB, 256GB
Battery Capacity: 5500mAh

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top