अभिनय क्षेत्र बेभरवशाचं म्हणत अभिनेते निळू फुलेंच्या लेकीचा अभिनयाला रामराम | Gargi Phule

gargi phule

Gargi Phule: मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते निळू फुळे हे आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकाच्या मनात कायम जीवंत राहणाऱ्या आहेत. निळू फुले यांनी विनोदी, खलनायकी अशी वेगवेगळी पात्रे साकारली आणि प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलीने म्हणजेच गार्गी फुले यांनी सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी तुला पाहते रे, राजा राणीची ग जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, इंद्रायणी, थोडं तुझं थोडं माझं यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Nilu Phule Daughter Gargi Phule Left Acting Now She Starts Her Own Traveling App)

मात्र आता गार्गी यांनी तिच्या करिअरमधला मोठा निर्णय घेतला आहे. दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक असूनही त्यांनी आता अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतलाय. लेट्सअप मराठी या चॅनलशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, मालिकाविश्वातून मी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. कारण मी गेली १० वर्षे काम केलं. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी १० वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिले. खरं सांगू, मालिकेचे शेड्यूल असतं ना, ते कलाकारांसाठी इतकं विचित्र आहे. पॅशन असेल तर मराठी मालिकाविश्वात काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्यच्या असो किंवा इतर, तर खूप त्रास होतो. शिवाय चॅनलच प्रेशर , निर्मात्याचं प्रेशर असतं. यामुळे स्वत:साठी वेळ मिळत नाहीच शिवाय तब्येतही बिघडते. अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचं आहे, यात काम केल्यानंतर समाधान मिळत नाही असंही त्या म्हणाल्या.

गार्गी फुले यांनेी अभिनय क्षेत्र सोडले असले तरी त्या आता करिअरची नवीन सुरुवात करत आहे. नुकतेच त्यांनी “Solitude Holiday ” या नावाने ट्रॅव्हलिंगचं ॲप सुरू केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून गार्गी फुले पर्यटकांना जगाची ओळख करून देणार आहेत. लवकरच त्यांचा दुबई दौरा सुरू होईल. दुबईची ओळख त्या या मार्फत करून देत आहेत. हे अप सुरू करण्यामागचे उद्दिष्ट सांगताना त्या म्हणाल्या की, निळू फुले यांनाच फिरण्याची आणि वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची आवड होती. ते आपल्या लेकीला म्हणजेच गार्गीला घेऊन सर्वत्र भारतभर फिरायचे हीच आवड गार्गीला पण लागली. तिथूनच ही कल्पना त्यांना सुचली.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top