Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तसंच, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत असल्याने यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (Women between 21 and 60 years are to get ₹1,500 per month under ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana’ in Maharashtra, Maharashtra’s Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar announced.)
यात महिलांसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात येत आहे. या योजनेनुसार, राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ काय आहे?
26 जानेवारी 2023 पासून मध्य प्रदेशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने ‘लाडली बहना योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1 हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चीत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना ‘मामा’ आणि ‘भैय्या’ या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळाली. शिवराजसिंह यांनी मध्यप्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली त्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. याच धर्तीवर महाराष्ट्रात युती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आणली आहे. यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी वर्षाला 2 लाख 50 हजार 500 रुपये पेक्षा कमी उत्पन्न असावे असा निकष आहे.
या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे. ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana’ या योजनेचा शासन निर्णय (GR) बघा.
या योजनेसाठी कोण पात्र आहे?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी :
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित व अविवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत
- सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
- सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे
कोण अपात्र असेल?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही, हेही सरकाराने स्पष्टपणे नमूद केलंय. ते तुम्ही खालील मुद्द्यांवरून समजून घेऊ शकता.
(1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
(2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(3) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
(4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
(6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. (नवीन अपडेट नुसार ही अट वगळण्यात आली आहे.)
(8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक :
- Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana च्या लाभासाठी अर्ज
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षांपूर्वीचे 1) रेशनकार्ड, 2) मतदार ओळखपत्र, 3) शाळा सोडल्याचे ओळखपत्र, 4) महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे व केसरी रेशनकार्ड
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1) जन्म दाखला 2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3) आधिवास प्रमाणपत्र, हे ग्राहय धरण्यात येईल.
- सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल :
(1) पात्र महिलेस Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana साठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
(2) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
(4) Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana साठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
(5) अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
- स्वतःचे आधार कार्ड
(6) Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana साठी तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोन द्वारेही अर्ज करू शकतात यासाठी महिलेच्या डोक्यावर फेटा असं चित्र असलेलं ‘नारीशक्ती दूत’ अॅप हे गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करून इन्स्टाॅल करा. त्यानंतर त्या अॅपमध्ये जाऊन तुमची माहिती भरून आपलं प्रोफाईल तयार करावे. त्यानंतर कॅटेगरीची निवड करा. त्यानंतर ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर माहिती भरा. सोबत अर्जदार महिलेचा लाइव्ह फोटोही काढायचा आहे. शिवाय लागणारी इतर सर्व कागदपत्र जोडून तुमचा अर्ज तुम्ही पूर्ण करू शकता. अर्ज पूर्ण भरून आणि कागदपत्रे उपलोड करून झाल्यानंतर सबमिट करा. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Apply Online from Narishakti Doot App)

तसेच वेबसाईट वरूनही तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता. (वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा)
(7) पात्र महिला Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana साठी घरी बसूनच अर्ज करु शकतात. त्यासाठी खाली दिलेला पीडीएफ अर्ज डाऊनलोड करायचा आहे. त्यानंतर त्यात आपले नाव, पत्ता, बँकेची माहिती, आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व गोष्टी भरव्या लागणार आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाइटवर अपलोड करावा लागणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील तेथे अर्ज जमा करावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा खाली दिलेला पीडीएफ अर्ज डाऊनलोड करा: (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana application)
(8) जर तुम्ही स्मार्टफोन द्वारे Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana साठी अर्ज करत असाल तर या अर्जात दिलेले हमीपत्र व्यवस्थित भरून त्याचा फोटो काढून तो स्मार्टफोन मध्ये इतर कागदपत्रांसोबत अपलोड करायचं आहे.

या तारखेपासून अर्ज करता येतील
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख आणि सरकारकडून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्याची तारीख खालीलप्रमाणे आहे:
- अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात – 1 जुलै, 2024
- अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक – 31 ऑगस्ट 2024 (नवीन अपडेट नुसार),
- तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक – 16 जुलै 2024
- तात्पुरत्या यादीवरील तक्रार/ हरकती प्राप्त करण्याचा कालावधी – 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024
- तक्रार/हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी – 21 जुलै 2024 ते 30 जुलै, 2024
- अंतिम यादी प्रकाशन दिनांक – 01 ऑगस्ट, 2024
- लाभार्थ्याचे बँकेमध्ये E-KYC करणे – 10 ऑगस्ट, 2024 लाभार्थी निधी हस्तांतरण – 14 ऑगस्ट, 2024
- त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक – प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana संदर्भात तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे, पण अजूनही या योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरतांना अनेक महिलांना अनेक अडचणी येत आहे. त्यांना अनेक प्रश्न पडलेय जे त्यांनी सोशल मिडिया द्वारे आपल्याला विचारले आहे. तर आज या आर्टिकल मध्ये मी त्या प्रश्नांचे उत्तरे देत आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि मग Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana चा फॉर्म भरा.
1) फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 1MB पेक्षा कमी असावी
2) दिवसभरात लाखो महिला फॉर्म भरत आहेत, त्यामुळे फॉर्म भरतांना आणि सबमिट करतांना अनेक प्रॉब्लेम येतात, नारीशक्ती ॲप किंवा वेबसाईट व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे रात्री 1 वाजेनंतर अथवा सकाळी लवकर उठून नारीशक्ती ॲप द्वारे फॉर्म भरा.. लगेच सबमिट होतो.
3) काही महिलांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी नवीन अपडेट नुसार पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही
4) फॉर्म भरताना नवीन अपडेटेड हमीपत्र दिले आहेत तेच आता इथून पुढे अपलोड करा
5) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा
6) अर्जदाराचा पत्ता म्हणजे आत्ता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे
7) जुन्या फॉर्म मध्ये जन्म ठिकाण आणि त्याचेच ग्रामपंचायत पिनकोड विचारले आहे, जिथे जन्म झाला तिथली सगळी माहिती टाकायची आहे पण नवीन फॉर्म मध्ये सध्या राहत असलेला आधार कार्ड वरील जो पत्ता आहे त्यानुसारच गाव, ग्रामपंचायत आणि पिनकोड टाकायचा आहे.
8) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा लागेल
9) नारीशक्ती ॲप द्वारे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन कुठेही फॉर्म जमा करायची गरज नाही
10) बँकेचे जॉईंट खाते चालत नाही, त्यामुळे बँकेच्या सिंगल खाते बद्दल माहिती भरा.
11) पोस्टाचे अकाउंट टाकत असाल तर फक्त ippb चे अकाउंट चालते
12) अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही, दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्या मराठीजन या युट्युब चॅनेलवर व्हिडिओ द्वारे माहिती देण्यात येईल. किंवा आपल्या WhatsApp व Telegram ग्रुप द्वारे ती माहिती दिली जाईल. या ग्रुपची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रीप्षण मध्ये दिलेली आहे.
13) शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे, त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष अगोदरचा असावा
14) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे, आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे
15) बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत, म्हणजेच तुमचे आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, त्यामुळे आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे
16) सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही
17) आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा
18) सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा कारण बँकेचे डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही
19) फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही फक्त नारीशक्ती दूत ॲप मधूनच फॉर्म भरू शकता
20) ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा
21) डोमासाईल (अधिवास प्रमाणपत्र) नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे- रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी एक कागदपत्र असावे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता, नाहीतर हा फॉर्म तुम्ही भरू शकत नाही.
22) फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता
23) अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार प्रती फॉर्म 50 रुपये देणार आहे, याचा जीआर मध्ये उल्लेख आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही त्यांना पैसे देवू नका.
24) फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिले असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतरच त्यामध्ये बदल करता येईल, आता सध्या लगेचच काही करू शकत नाही
25) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा
26) बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल कारण पैसे आधार डीबीटीने येणार आहेत त्यामुळे बँक पासबुक ॲप वरती अपलोड करणे गरजेचे नाही
27) जन्माचे ठिकाण दुसऱ्या राज्यातील असेल तर त्यांनी आता लगेचच हा फॉर्म भरू नका, काही दिवसांनी ॲप अपडेट होईल तेव्हा भरा.
28) फोटो काढल्यावर फोटोच्या उजव्या कॉर्नरला रेड क्रॉस चे चिन्ह येत आहे, तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी किंवा फोटो बदलण्यासाठी आहे, त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो काढू शकता.
29) उत्पन्नाचा दाखला अपलोड करनार असेल तर तो 2024-25 या वर्षाचा असावा
30) जन्म दाखला जर कोणी आत्ता काढला असेल तरी अपलोड करू शकता
31) डॉक्युमेंट्स ओरिजनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तरी चालेल
32) पाच नंबर आणि सहा नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही (पासबुक आणि पतीचे कागदपत्र)
33) संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा पीएम किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असेल तर हा फॉर्म भरता येणार नाही
34) हमीपत्र प्रिंट काढून घ्या, त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा, सर्व बॉक्स वर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा, दिनांक व ठिकाण टाका. ऑनलाईन याचा फोटो अपलोड करा.
35) एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते, त्या कुटुंबातील इतर बाकी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
36) कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही
37) लाईव्ह फोटो अपलोड करा, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका
38) आता तुम्ही 21 ते 65 वर्षे वय असलेल्या महिलांचे फॉर्म भरू शकता
39) नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर, पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही
40) रेशन कार्डची ऑनलाइन प्रिंट निघते ती अपलोड करू नका, फिजिकली रेशन कार्ड चा फोटो काढून अपलोड करा
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा..
आमच्या मराठीजन या वेबसाईट वरील आर्टिकल वाचण्यासोबतच आमचे विविध कोर्सेस ऑनलाईन बघण्यासाठी आमच्या मराठीजन LMS Courses या वेबसाईटला भेट द्या. जर तुम्हाला ऑफलाईन कोर्सेस शिकायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या सोबतच तुम्ही आमचे युट्युब व्हिडीओ ही बघू शकता.