Moto G34 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी मोटरोला (Motorola) ही सध्या स्मार्टफोन मार्केट मध्ये कमाल करत आहे. कमी बजेटमध्ये अतिशय चांगले आणि उपयोगी फीचर्स ते अगदी स्वस्तात उपलब्ध करून देतात. जे काम अगोदर शाओमी आणि रिअलमी या कंपन्यांनी केले तेच काम आता आता मोटरोला करत आहे. ते म्हणजे कमी किमतीत दर्जेदार फीचर्स असणारे स्मार्टफोन मार्केट मध्ये आणणे. पण आता तर शाओमी आणि रिअलमी या कंपन्याच्या फोन पेक्षाही मोटरोलाचे फोन कमी किमतीत मिळतात. (Moto G34 Features and Specifications and Price in India)
आता पुन्हा एकदा मोटरोलाने एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. या फोनचे नाव आहे Moto G34 5G स्मार्टफोन. या फोन मध्ये 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळत असल्याने गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच लॉन्च होण्याअगोदर पासूनच हा फोन खूप चर्चेत आहे. यात Premium Vegan Leather Design, 8GB पर्यंत रॅम आणि 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, 5000 mAh ची बॅटरी, 13 5G Bands, 50 मेगापिक्सल कॅमेरा तसेच Snapdragon 695 5G Processor, असे अनेक फीचर्स या नवीन फोन मध्ये अत्यंत कमी दरात मिळतात. त्यामुळेच आज बघूया Moto G34 5G या नवीन फोनचे काही महत्वाचे फीचर्स आणि या फोनची भारतात किंमत.
Moto G34 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Moto G34 5G हा स्मार्टफोन लेटेस्ट Android 14 वर आधारित आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. कमी किंमतीत मिळणारा हा एक जबरदस्त प्रोसेसर आहे. यात 6.5 इंचाचा मोठा LCD एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही पंच होल असलेली 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीनला सपोर्ट करतो.
Moto G34 5G मध्ये 4 ते 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच 8 जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीनं एकूण 16 जीबी रॅम पर्यंत सपोर्ट मिळतो. Moto G34 5G फोन मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिलेला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा क्वॉड पिक्सेल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.
Moto G34 मध्ये पावर बॅकअप बद्दल बोलायचे झाल्यास यात 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. या फोन मध्ये कंपनीनं एकूण 13 5G बँडचा सपोर्ट दिलेला आहे. यामुळे भारतात 5G नेटवर्क वापरताना कोणतीही समस्या येणार नाही. तसेच Moto G34 फोन मध्ये Dolby Atmos सपोर्ट, 3.5mm audio jack, ड्युअल स्टीरियो स्पिकर, Side fingerprint sensor, यूएसबी टाइप सी पोर्ट, धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी P52 रेटिंग या सारखे अनेक फीचर्स या फोन मध्ये देण्यात आले आहेत.
Moto G34 ची बजेट फ्रेंडली किंमत
Moto G34 5G हा नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये अगदी बजेट फ्रेंडली किंमतीत मिळतो. याचा 4GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सध्या 10 हजार 999 रुपये इतकी आहे. पण सध्या लाँच ऑफर सुरु असल्याने मोटरोला कंपनी 1000 रुपयांचे एक्स्ट्रा एक्सचेंज डिस्काउंट देखील देत आहे. म्हणजेच या ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्हाला हा फोन फक्त 9 हजार 999 रुपयांत मिळेल.
या फोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 11 हजार 999 रुपये इतकी आहे. यातही 1000 रुपयांचे एक्स्ट्रा एक्सचेंज डिस्काउंट ऑफरचा लाभ घेतल्यास हा व्हेरिएंट तुम्हाला फक्त 10 हजार 999 रुपयांना मिळेल.
Moto G34 हा फोन Charcoal Black, Ice Blue आणि Ocean Green या तीन कलर ऑप्शन मध्ये मिळेल.
Moto G34 5G हा फोन आता भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच झाला असला तरीही या फोनचा सेल 17 जानेवारी पासून सुरु होईल. म्हणजेच 17 जानेवारी पासून हा फोन तुम्हाला मोटरोलाची ऑफिशियल वेबसाईट आणि फ्लिपकार्ट या वेबसाईटवर विकत घेता येईल.
Moto G34 Features and Specifications:
- 6.5-inch LCD HD (1600 x 720p) 120Hz display
- Snapdragon 695, 13 5G bands
- 4GB / 8GB LPDDR4x RAM
- 128GB storage
- 5,000mAh battery with Turbo Charging
- Front: 16MP | Rear: 50MP + 2MP dual cam
- Dolby Atmos dual speakers, 3.5mm audio jack
- Side fingerprint sensor, microSD via hybrid SIM slot
- Android 14, My UX (One OS upgrade | 3-yr security updates)
- IP52-rated
- 162.7 x 74.6 x 8mm | 180 grams
Moto G34 Price in India:
- 4GB+128GB: Rs 10,999
- 8GB+128GB: Rs 11,999
- Offer: Starting at ₹9,999 (Inc. exchange offer)
- Sale date: January 17 via Flipkart, Amazon, Motorola website and retail stores
- Color: Charcoal Black, Ice Blue, Ocean Green (vegan leather back)
Check Offer
Flipkart![]() | Amazon![]() | |
---|---|---|