Sukanya Samriddhi Yojana Interest Rate

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate: सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ, मोदी सरकारने नववर्षाचे दिले गिफ्ट

Sukanya Samriddhi Yojana: 2024 मध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळेच आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अनेक मोठमोठ्या घोषणा करतांना दिसत आहे. यातीलच एक महत्वाची घोषणा आहे ती सुकन्या समृद्धी योजने संदर्भात. (SSY-Sukanya Samriddhi Yojana interest rate)

इतर योजनांच्या तुलनेत जास्त व्याजदर

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक आर्थिक बचत योजना आहे, जी केवळ मुलींसाठी आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार कडून हि योजना सुरू करण्यात आली आहे. विशेषतः मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी ही योजना आहे. SSY-Sukanya Samriddhi Yojana या Scheme मध्ये 10 वर्षे वय असलेल्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे आई-वडील किंवा पालक या योजनेअंतर्गत आपल्या मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. या योजनेत अनेक Tax फायद्यांसह उच्च व्याज दर सुद्धा आहे. मुलीच्या जन्मापासून दरवर्षी योग्य गुंतवणूक केल्यास मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षी पालकांना 64 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. कारण इतर योजनांच्या तुलनेत या योजनेत जास्त व्याजदर दिला जातो.

SSY व्याज दरात वाढ

सुकन्या समृद्धी योजना सुरु झाली तेव्हा सुरुवातीला याचा व्याजदर 9.1 ते 9.2% होता. पण सध्या हा व्याजदर 7.6% ते 8% दरम्यान असतो. पण आता सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज दरात 0.20% आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात 0.10% वाढ केल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) दिली आहे.

नुकतंच अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार सध्याचे वाढवलेले व्याज खालील प्रमाणे आहे:

  • सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवरील व्याजदर 8% वरून 8.2% असेल. (SSY – 8.2 per cent)
  • तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर 7% वरून 7.1% असेल.
  • पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% व्याज असेल.
  • एक वर्षाच्या ठेवीचा व्याज दर 6.9 टक्के असेल.
  • 2 वर्षांच्या ठेवीचा व्याज दर 7.0 टक्के असेल.
  • 3 वर्षांच्या ठेवींवर 7.1 टक्के व्याजदर असेल.
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) व्याज 7.7 टक्के असेल.
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSSY) व्याजदर जैसे थे म्हणजे 8.2 टक्के आहे.

तर अशा प्रकारे सध्याचे नवीन व्याज दर आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याज दर हे इतर बँक FD वरील व्याज दरापेक्षा जास्त असल्याने अनेक लोक या योजनांत गुंतवणूक करत असतात. म्हणूनच आता व्याज दरात वाढ करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नववर्षाचं दिलेलं हे गिफ्ट हा या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.

सुकन्या समृद्धी योजना नेमकी कोणासाठी आहे? याचे फायदे काय? तसेच या योजनेत खाते कसे उघडायचे? यासाठी पात्रता काय? आणि ऑनलाईन घरबसल्या या योजनेत आपण पैसे कसे जमा करू शकतो? या बद्दलची सर्व माहिती आमच्या “Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेचे आहे प्रचंड फायदे – मिळेल 64 लाख रुपयांपर्यंत रक्कम – पहा संपूर्ण माहिती” या लेखात दिलेली आहे. ती नक्की बघा.. आणि जर तुमच्याही घरात 10 वर्ष वयापेक्षा लहान मुलगी असेल तर तिच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक नक्की करा.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top