Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची तब्बेत बिघडली – नाकातून रक्त, पोट दुखी, पाणीही घोटेना, बेशुद्ध

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil Health: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची मिळतेय. (maratha reservation: manoj jarange patil latest health update, antarwali sarathi jalna maharashtra)

तब्बेत आता प्रचंड बिघडली

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा येऊन भोवळ आली. त्यांनी अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई केली आहे. पण त्यांची तब्बेत आता प्रचंड बिघडली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला तसेच आता त्यांना पोट दुखीचा त्रास सुद्धा होतोय. म्हणून आता महंतांनी त्यांना आग्रहाने पाणी पाजलं. पण जरांगेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पाणीही घोटवत नाही. म्हणून आता सर्वजन खूप चिंतेत पडले आहे. जरांगेंच्या आंदोलनस्थळी सध्या मोठी गर्दी जमली आहे. तेथे सर्वांकडून ‘पाणी घ्या’ असं म्हणत घोषणाबाजी सुरु आहे.

आपल्या भूमिकेवर ठाम

आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात व्हावं, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठीच जरांगे यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. सलग सहाव्या दिवशी उपोषण सुरुच असल्याने जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे. पण सरकारने मात्र 20 फेब्रुवारीला अधिवेशन बोलावले आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील हे सरकारवर खूपच भडकले आहे.

मी जर मेलो तर मला

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना भावनिक आवाहन केलं आहे. ते म्हणाले की “मी जर मेलो तर मला असंच सरकारच्या दारात नेऊन टाका. मी मेल्यावर या सरकारला धारेवर धरा. सरकारने आपल्याला येत्या 18 किंवा 19 फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण मुंबईला जाऊ. सरकार आपल्यासाठी इथे येत नाहीये, तर आपण तिथे जाऊ. मी मेलो तर या सरकारला सोडू नका. मला तिकडे नेऊन टाका. आपण 18 फेब्रुवारीपर्यंत वाट बघू. सरकार आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी कधी करणार हे त्यांनी आधी आम्हाला सांगावं, त्यानंतर मी उपचार घेण्यास तयार आहे.” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकार जाऊदे खड्ड्यात

पण आज मात्र त्यांची तब्बेत खूपच बिघडली आहे. ते बेशुद्ध झाल्याचे दिसताय. त्यामुळेच “सरकार जाऊदे खड्ड्यात, तुम्ही आत्ता उपचार घ्या, तुम्ही किमान आमच्यासाठी स्वतःवर उपचार करून घ्या.” असं म्हणत तेथे उपस्थित असलेले लोक मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह करत आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top