Bajrang Sonwane: बीडच्या राजकारणात भूकंप? – बजरंग सोनवणे अजित पवार गटात जाणार?

Bajrang Sonwane: बीडमध्ये (Beed) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभूत करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘जायंट किलर’ खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी ट्विटच्या माध्यमातून बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं नमूद केले आहे. अमोल मिटकरींच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे. (Will Bajrang Sonwane join Ajit Pawar group?)

लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता केंद्रात मोदी यांचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, तरीही राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात जय-पराजयाची चर्चा थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. यात बीडचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. महाराष्ट्रात सर्वात उशिरा बीड लोकसभेचा निकाल लागला. अजूनही या निवडणुकीची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा असल्याचे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “माझ्या विजयाचं श्रेय बीड जिल्ह्याच्या जनतेला आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील 2 माणसांचा मी आभार मानणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे. तर आदरणीय सुरेश धस यांचा वाटा देखील आहे.” असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं आहे.

तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनीही बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यावर आता बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे की “अमोल मिटकरींनी लोकसभेत एखादा खासदार निवडून आणायला पाहिजे होता त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांविषयी बोलावे.मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबत राहणार आहे. अमोल मिटकरी यांनी गोंधळ निर्माण करण्याचे प्रकार बंद करावे. अगोदर एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आणावा नंतर दुसऱ्यांचे बोलावे. मी फोन करण्याचा संबंधच कुठे येतो? राजकारणाच्या प्रक्रियेत काही वैयक्तिक विषय असतात. वैयक्तिक विषयाला राजकारणात आणतात. मिटकरींनी दिशाभूल करण्याचा प्रकार बंद करावा.” असं बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त