Pankaja Munde यांचा पराभव लागला जिव्हारी.. तरुणाने संपवलं जीवन, पंकजा मुंडे दु:खी

Pankaja Munde: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. पण पंकजा मुंडे यांचा पराभव बीड जिल्ह्यातील अनेक जणांना जिव्हारी लागलाय. (Pankaja Munde after lost against NCP Sharad Pawar’s Bajarang Sonawane)

पंकजा मुंडेंच्या समर्थनात अन्नत्याग (Pankaja Munde)

पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आता त्यांच्या समर्थनात पुढे येत काही गावांनी गाव बंदची हाक देत अनेक सभा घेतल्या आहे. काही गावात तर चुलबंद करून अन्नत्यागाला सुरूवात देखील झाली आहे. यात अनेक लोकांनी अशी मागणी केली आहे की मोदी सरकारने पंकजा मुंडे यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं, त्यांना राज्यसभेवर संधी द्यावी.

pankaja munde
Pankaja Munde

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या

यातच आता अशी एक बातमी मिळत आहे की पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने लातूरमधील सचिन मुंडे या तरूणाने आपलं जीवन संपवलं. पंकजा मुंडेंच्या पराभवाने सचिन खचला आणि त्याने जीवन संपवल्याचा दावा या तरूणाच्या कुटुंबाने केला आहे.

यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करत एक पोस्ट केली आहे.

पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

यात पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की “स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही …मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे … “

“मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा!! ..अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा please please..” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुढे लिहिले आहे की “माझ्या साठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची…, 15 जून पासून मी आभार दौरा करत आहे …तो पर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा…” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

आमच्या मराठीजन या वेबसाईट वरील आर्टिकल वाचण्यासोबतच आमचे विविध कोर्सेस ऑनलाईन बघण्यासाठी आमच्या मराठीजन LMS Courses या वेबसाईटला भेट द्या. जर तुम्हाला ऑफलाईन कोर्सेस शिकायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या सोबतच तुम्ही आमचे युट्युब व्हिडीओ ही बघू शकता.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त