RTO चे नवीन नियम – आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही | RTO New Rules

RTO New Rules: पुणे मध्ये घडलेले अपघात प्रकरण खूप धक्कादायक आहे. पुण्याच्या (Pune) कल्याणी नगर (Kalyani Nagar) मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन हाकून त्याच्या लक्झरी Porsche Car ने दोन जणांना चिरडल्याची भयानक घटना घडली. या अपघातात एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर अपघात करणाऱ्या त्या श्रीमंत बापाच्या मुलाला पोलि‍सांनी अटक जरूर केले पण काही राजकारण्यांच्या दबावामुळे त्याला काही तासांतच सोडून दिले. बाल न्याय मंडळाने आरोपीस अवघ्या 15 तासांमध्ये जामीन मंजूर केला. न्याय मंडळाच्या निर्णयावर जन मानसातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. असेही आरोप करण्यात आले की पोलिस स्टेशन मध्ये त्या आरोपी मुलास पिझ्झा बर्गर खाण्यासाठी देण्यात आले. या सर्व घटनेवर सोशल मीडियावर संपूर्ण देशभरातून संतापही व्यक्त झाला. त्यानंतर राजकारणी आणि पोलिस यांना जाग आली आणि त्यांनतर आता त्या अपघात करणाऱ्या मुलावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात झाली. (RTO New Rules – Now no need to go to RTO for driving license..)

खरंतर यात सोशल मिडिया आणि काही चांगल्या पत्रकारांनी हे प्रकरण लावून धरलं. त्यामुळे अखेर राजकारणी आणि पोलिस या प्रकरणात सिरीयस झाले. नाहीतर श्रीमंत बापाच्या मुलाचे हे प्रकरण दाबून टाकण्यात आले असते. कारण पैसे वाल्यांच्या मदतीला राजकारणी, पोलिस प्रशासन आणि सर्व सरकारी यंत्रणा तयार असते. पण गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांच्या मदतीला ही सरकारी यंत्रणा येत नाही. किंवा तुमच्या मुलाने असा अपघात केला तर कोणताही राजकारणी तुमच्या मुलाला वाचवायला पोलिस स्टेशन मध्ये येणार नाही. म्हणून आपल्याकडून किंवा आपल्या मुलांकडून असा गुन्हा घडूच नये यासाठी आपण RTO चे नवीन नियम समजून घेऊया.

RTO New Rules
RTO New Rules

1 जून 2024 पासून RTO चे नवीन नियम (RTO New Rules) लागू होत आहे. नवीन नियमांनुसार आता लायसेन्स काढणे सोपे झाले आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट साठी तुम्हाला आता RTO च्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही मान्यताप्राप्त खाजगी संस्थेतही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट देवून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. तसेच 18 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील कोणी गाडी चालवत असेल तर त्यांना 25,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच तुम्हाला वाहतूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित RTO या नवीन नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी हे नियम (RTO New Rules) समजून घेणे गरजेचे आहे. तर हे नियम खालील प्रमाणे:

RTO चे नवीन नियम (RTO New Rules):

  • वेगमर्यादा ओलांडल्यास: 1000 ते 2000 रुपये दंड
  • अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवणे: 25,000 रुपयांपर्यंत दंड
  • परवान्याशिवाय वाहन चालवणे: 500 रुपये दंड
  • हेल्मेट न घातल्यास: 100 रुपये दंड
  • सीट बेल्ट न लावल्यास: 100 रुपये दंड
  • नियमांनुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येते. मात्र 50 सीसी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना वयाच्या 16 व्या वर्षीही मिळू शकतो. मात्र, हा परवाना 18 वर्षांचा झाल्यानंतर अपडेट करावा लागेल.
  • 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने वाहन चालवले तर त्या वाहनाचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला 25 वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाही. याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे.
  • नव्या नियमानुसार, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट देण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. यापुढे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी वेगळा पर्याय असेल. येत्या 1 जूनपासून तुम्ही सरकार मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा देऊ शकता. यामुळे आता लायसेन्स काढणे सोपे झाले आहे.
  • ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता प्राप्त झाल्यापासून 20 वर्षे आहे.
  • तुम्हाला तुमचा परवाना 40 वर्षांनंतर 10 वर्षांनी आणि नंतर दर 5 वर्षांनी अपडेट करावा लागेल.
  • व्यावसायिक परवाना मात्र दर तीन वर्षांनी नूतनीकरण करावा लागेल.
  • तुमच्याकडे व्यावसायिक परवाना असल्यास किंवा तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, परवान्याचे नूतनीकरण करताना तुम्हाला डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यावर त्याचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्थानिक आरटीओ कार्यालयात जावे लागेल. ड्रायव्हिंग लायसन्सचा परवाना मिळवण्यासाठी तुम्ही https://parivahan.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.

तर असे RTO चे काही नियम (RTO New Rules) आहे. यासंदर्भात सर्व माहिती तुम्ही RTO च्या वेबसाईट वर बघू शकता.

इतर अशाच प्रकारचे आर्टिकल वाचण्यासाठी किंवा आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमच्या मराठीजन वेबसाईटला किंवा युट्युब चैनेलला भेट द्या.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त