Ashok Saraf: अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, वडिलांचा अभिनयास होता विरोध

Ashok Saraf: ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात जन्मलेल्या अशोक सराफ यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा महाराष्ट्र भूषण जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. (Maharashtra Bhushan Award announced to Actor Ashok Saraf)

अभिनेते अशोक सराफ यांची कारकीर्द

ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी आजपर्यंत अनेक नायक, खलनायक आणि विनोदी अशा अजरामर भूमिका साकारल्या आहेत. फक्त मराठीच नाही तर ते आता पर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा झळकले आहेत. आजही उतरत्या वयात सुद्धा त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट होत असतात. आणि आजही प्रेक्षकांचे ते फेवरेट अभिनेते आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तसेच हिंदी मधील ‘हम पांच’ या गाजलेल्या मालिकेत अशोक सराफ यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. (Actor Ashok Saraf’s career)

प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ या अशोक सराफ यांच्या पत्नी आहेत. तसेच अशोक सराफ आणि निवेदिता यांना एक मुलगा असून तो एक शेफ आहे.

दादा कोंडके यांच्या सोबत अभिनय

अभिनेते अशोक सराफ यांनी वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. अभिनेते अशोक सराफ यांनी प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्या सोबत ‘पांडू हवालदार, राम राम गंगाराम’ या काही चित्रपटांत काम केले होते.

धनंजय माने येथेच राहतात का?

अभिनेते अशोक सराफ यांची आजपर्यंतची सर्वांत लोकप्रिय भूमिका म्हणजे ‘अशीही बनवा बनवी’ या चित्रपटामधील धनंजय मानेची भूमिका. आजही या गाजलेल्या चित्रपटातील ‘धनंजय माने येथेच राहतात का?’ हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा डायलॉग लोक शेअर करत असतात. एका काळात अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती. या दोघांचेही अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते.

अभिनय करण्यास वडिलांचा होता विरोध

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची खूप आवड होती. पण सुरुवातीला अशोक सराफ यांनी अभिनय करु नये असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. त्यांनी नीट शिकावं आणि मग एखादी चांगली नोकरी करावी अशी अशोक सराफ यांच्या वडिलांची इच्छा होती.

सुरुवातीला अशोक सराफ हे बँकेत काम करत होते. पण तरीही त्यांचा अभिनय सुटला नाही. त्यांनी नाटकांत काम करणे सुरु ठेवलं. पुढे अशोक सराफ यांना जस-जशी बक्षीसं मिळू लागली तसं-तसा त्यांच्या वडिलांचा विरोध देखील कमी झाला. त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं की आपला मुलगा खूप चांगला अभिनय करतो, त्यामुळे पुढे त्यांनी विरोध केला नाही. आणि पुढे मराठी फिल्म इंडस्ट्रीजला एक उत्तम अभिनेता मिळाला.

अशोक सराफ यांची प्रतिक्रिया

अभिनेते अशोक सराफ यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मिडिया न्यूज चैनेलला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आनंद व्यक्त करत पत्नी निवेदिता सराफ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही आठवण काढली. यात अशोक सराफ म्हणाले आहे की “माझ्या मनात अत्यंत संमिश्र भावना आहेत. हा पुरस्कार मिळणं ही अत्यंत मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आजवर ज्या थोर लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे आज मला त्यांच्या बरोबरीने नेऊन बसवलं आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्राचा नंबर वन पुरस्कार आहे असं मी समजतो. गेली 50 वर्षं मी चित्रपट, नाटक, मालिका करतोय त्यातली मेहनत कुठेतरी सत्कारणी लागली अन् प्रेक्षकांनीही त्याला दाद दिली त्याचा मला प्रचंड आनंद आहे. आता यापुढेही आणखी वेगळं आणि नवं काम करायचा हुरूप आला आहे. त्यामुळे अधिकाधिक उत्तम काम करत राहीन कारण आज मी जो काही आहे तो तुम्हा प्रेक्षकांमुळे आहे अन् तुम्ही आहात म्हणून मी आहे. यासाठी मला काम करत रहावंच लागणार.” असं अभिनेते अशोक सराफ यांनी म्हटलं आहे.

अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त