Maratha Reservation: “हा माणूस.. एक भाबडा म्हणावं की वेडा” असं म्हणत अभिनेत्री अश्विनी महांगडे शेअर केला मनोज जरांगे पाटील यांचा हा फोटो

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे हजारोंच्या मराठा जन समुदायासह विराट मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहे. लवकरच ते मुंबईत फोहोचणार आहे. पण मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांना आंदोलनाची परवानगी मिळाली नाही. तरीही जरांगे पाटील याच मैदानावर उपोषण आंदोलन करण्यावर ठाम आहे. त्यामुळे सरकारची मोठी पंचाईत झाली आहे.

या मोर्च्या दरम्यानचा मनोज जरांगे पाटील यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. यात मनोज जरांगे हे गाडीत एका सहकाऱ्याच्या हातावर झोपले आहे. या सहकाऱ्याने एका हातावर त्यांचे डोके उचलून धरले आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हाच फोटो खूप व्हायरल होत असून आई कुठे काय करते या स्टार प्रवाह वरील मालिकेत झळकणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सुद्धा जरांगे पाटलांचे हाच फोटो शेअर करत त्यांचे कौतुक करत त्यांच्या या आंदोलनाला सपोर्ट केला आहे. (Actress Ashwini Mahangade about Manoj Jarange Patil and Maratha Reservation)

या पोस्ट मध्ये अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने म्हटलंय की “साधं फिरायला जावून घरी परतलो तरी पुढचे 2 ते 3 दिवस “फार दमलो” म्हणत काढतो आपण. पण हा माणूस.. एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने, खरेपणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यात एक स्वप्नं आहे की आता तरी न्याय मिळेल. हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणाप्रती असलेल्या सातत्याने, समाजाप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला, टिकवला, वाढवला. म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटते. हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल.

टीप – माझे कलाकार म्हणून काम पाहणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत तर ते 12 बलुतेदार, 18 पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा असे अजिबात नाही, समाजातील सर्वच घटकांना समान न्याय मिळावा हेच माझे मत.”

असं म्हणत अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करत त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास सपोर्ट केला आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त