Pushkar Jog: BMC कर्मचाऱ्यांना लात मारण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगवर अभिजीत केळकर, शरद पोंक्षे आणि मेघा घाडगे यांची नाराजी

Pushkar Jog on BMC employees: मराठी अभिनेता पुष्कर जोग हा सध्या खूप वादात सापडलाय. मराठा आरक्षणासाठी जातीय सर्वेक्षणासाठी आलेल्या बीएमसीची कर्मचाऱ्यांबद्दल पोस्ट करत त्याने त्यांना लात आणि कानाखाली मारण्याची भाषा केली होती. यामुळे अभिनेता पुष्करवर खूप टीका होऊ लागली. आता तर अनेक मराठी कलाकार सुद्धा पुष्कर जोगच्या त्या वक्तव्यावर प्रचंड भडकले आहे. (Abhijit Kelkar, Sharad Ponkshe and Megha Ghadge react to Pushkar Jog talking about BMC employees)

पुष्कर जोगची वादग्रस्त पोस्ट काय होती?

अभिनेता पुष्कर जोगने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाईमाणूस नसते तर 2 लात नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार.” अशी वादग्रस्त पोस्ट पुष्कर जोगने केली होती.

अभिजीत केळकरचे पुष्करला पत्र

अभिनेता पुष्कर जोगच्या त्या वक्तव्यासंबंधी सध्या अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया ये आहे. नुकतंच जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, अभिजीत केळकर, किरण माने आणि अभिनेत्री मेघा घाडगे यांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. अभिनेता अभिजीत केळकर याने तर पुष्कर जोगला फेसबुक द्वारे एक पत्र लिहिलं आहे. यात त्याने म्हटलंय की “प्रिय मित्र पुष्कर जोग यांस, मित्रा,तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली,ती सोशल मीडियावर होती त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच… मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे, माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती… तिच्याबरोबर,तिला, तीच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण ह्या कामात,अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे, मदत केली आहे… उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून, ही कामं करावी लागतात, वरून आदेश आला की त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं, दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात, ते काही त्यांच्या मनातले नसतात…

तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात…
1. घरी आलेल्या अश्या कर्मचऱ्यांच्या लाथ घालावी असं तुला का वाटलं असेल? ते सरकारी कर्मचारी आहेत, ते आपलं काम करत आहेत असा विचार तुला करावासा का वाटलं नसेल?
2. आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी? जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी, किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही, ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते, कितीही हवी किंवा नको म्हटली तरीही, बरोबर ना?
3. सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे, सरकारने काढलेला आदेश आहे, त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे तर थेट त्यांच्याच लाथ घालावी असं का वाटलं नसेल? (मुळात लाथ घालावी हा शब्दप्रयोगच वाईट/चुकीचा आहे) गेला बाजार, त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील? हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे हे सोशल मीडियावर active असलेल्या तुला माहीत असेलच, मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील?
4. समजून चालू घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाथ घातली असतीस? तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं?

आपण कलाकार आहोत, लोक आपल्याला रोज बघतात, आपल्यावर, आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात, आपलं बोलणं , वागणं फॉलो करतात, त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोलणं हे आपलं कर्तव्य आहे… मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते मला फारच लागलं, त्यांचं अतिशय वाईट वाटलं, रागही आला… तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही… ते केलंस तर लोभ आहेच तो तसाच राहील… तुझा मित्र/शुभचिंतक.” असे पत्र अभिनेता अभिजीत केळकर याने पुष्कर जोग याला लिहिले आहे.

शरद पोंक्षे यांची नम्र प्रतिक्रिया

अभिजीत केळकरच्या याच फेसबुक पोस्ट खाली कमेंट करत अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुष्कर जोगच्या त्या वक्तव्यासंबंधी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यात अभिनेते शरद पोंक्षे हे म्हणाले आहे की “माझ्या घरी सुध्दा नगरपालीका वाले आले होते, मी त्यांना चहा पाणी विचारल व मी ब्राह्मण आहे, मला कसलीच सवलत नको, म्हणून नोंदही नको, अस नम्रपणे सांगीतल. त्यावर हसून ते निघून गेले. दरवाजावर कोणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही संस्कृती आहे आपली. नकार सुध्दा नम्रपणे देता येतो.” असं शरद पोंक्षे म्हणाले आहे.

Sharad Ponkshe react on Pushkar Jog
Sharad Ponkshe react on Pushkar Jog

मेघा घाडगे पुष्करवर संतापली

यानंतर लावणी क्वीन म्हणून ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री मेघा घाडगे हि सुद्धा पुष्कर जोगच्या त्या वक्तव्यावर प्रचंड संतापली आहे. तिने instagram वर एक स्टोरी पोस्ट करत म्हटलंय की “जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार?? बाई-माणूस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या?? तुला 2 लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघून मैत्री करणारा तू. विचारांमध्येच घाण. काय करणार? अरे मित्रा… त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा लागतो. आजूबाजूला थोडी चौकशी करावी लागते! माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे, मी तुला नक्की पाठवेन. तेसुद्धा नको असेल तर तुझ्याच जातीचे माझे काही मित्र मैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर… वा घाण…वा घाण…वा घाण…!” असं मेघा घाडगेने म्हटलं आहे.

Megha Ghadge react on Pushkar Jog
Megha Ghadge react on Pushkar Jog

किरण माने यांची संतप्त प्रतिक्रिया

अभिनेते किरण माने यांनीही पुष्कर जोगला चांगलंच सुनावलं आहे. याबद्दलची माहिती आमच्या “Kiran Mane vs Pushkar Jog: अभिनेते किरण मानेंनी पुष्करला सुनावलं – नेत्याला लाथा घाल, लै महागात पडेल, मापात रहा” या लेखात दिलेली आहे.

अभिनेता पुष्कर जोगने मराठा आरक्षणासाठी जातीय सर्वेक्षणासाठी आलेल्या बीएमसीची कर्मचाऱ्यांबद्दल पोस्ट करत त्याने त्यांना लात आणि कानाखाली मारण्याची भाषा केल्याने आता अनेक मराठी कलाकार सुद्धा त्याच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त करत आहे.

पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी

अभिनेता पुष्कर जोगच्या वादग्रस्त पोस्ट मुळे खूप वाद निर्माण झाल्याने आता त्याने पुन्हा एक पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. यात पुष्करने म्हटलंय की “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.” असं पुष्करने त्याच्या या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त