Maratha Reservation: मराठा समजाला दहा टक्के आरक्षण – स्वागत आणि विरोध

Maratha Reservation: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मसुद्याला (Maratha Reservation Bill) मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. (10 percent reservation for Maratha community in jobs and education)

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर होताच विधिमंडळाच्या बाहेर एकच जल्लोष झाला. अनेकांनी गुलाल उधळत या निर्णयाचे स्वागत केले. इतर समाजाच्या नेत्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल का याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहे.

छत्रपती संभाजी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी ट्वीट करत म्हटलंय की “मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी.” असं छत्रपती संभाजी यांनी म्हटलं आहे.

पण दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मात्र ओबीसीमधून (OBC) मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी आता स्वतःवरील उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या 12 वाजता आंतरवालीमध्ये निर्णायक बैठक घेणार आहे. यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. तसेच मनोज जरांगे यांनी स्वतःवरील उपचार बंद करत सलाईन काढून फेकले आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त