Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती | Eligibility, Benefits, How to Apply Online, Form, Documents

Lek Ladki Yojana: महाराष्ट्र सरकारने मुलगी जन्मल्यानंतर ती 18 वर्ष वयाची होईपर्यंत तिला 1 लाख, 1 हजार रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली आहे. या योजनेचे नाव ‘लेक लाडकी योजना’ असं आहे. राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. यासोबतच महाराष्ट्र सरकारची ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचाही या लेक लाडकी योजनेत समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या योजनेत गरीब कुटुंबांना त्यांची मुलगी जन्मल्यापासून तर ती 18 वर्ष वयाची होईपर्यंत टप्प्याटप्प्यात ही रक्कम दिली जाईल. मुलींचा जन्मदर वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच आज या योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया.

महाराष्ट्र सरकारने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही अगोदर पासूनच सुरु असलेली योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून ‘लेक लाडकी योजना’ या नावाने नवीन योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ही योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक (Ration Cards) कुटुंबातील मुलींना लागू आहे.

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

  • मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
  • मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
  • मुलींचा मृत्यूदर कमी करणे.
  • मुलींचे बालविवाह रोखणे.
  • मुलींमधील कुपोषण कमी करणे
  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे

लेक लाडकी योजनेतील लाभ काय?

लेक लाडकी योजनेत मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये, याप्रमाणे मुलगी जन्मल्यापासून तर ती 18 वर्ष वयाची होईपर्यंत असे टप्प्याटप्प्यात एकूण 1 लाख, 1 हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल. अशा प्रकारची ही योजना आहे.

Lek Ladki Yojana Benefits:

  • Rs. 5,000 at the time of birth of a girl child.
  • Rs. 6,000 on her getting admitted to a school.
  • Rs. 7,000 when she reaches class 7.
  • Rs. 8,000 upon getting admission in a college.
  • Rs. 75,000 when she reaches the age of 18 years.
    Thus, the government will be providing the girl child and her family a total of Rs. 1,01,000.

लेक लाडकी योजनेसाठी अटी व शर्ती (Eligibility Criteria)

  • लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
  • पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक (Ration Card) कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना योजना ही लागू आहे. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतांना माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • दुसऱ्या प्रसुतीच्यावेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास व एक मुलगा आणि एक मुलगी किंवा दोन्ही मुली झाल्यास त्या मुलींना योजनेचा लाभ मिळू शकेल. त्यानंतर आई-वडीलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी व एक मुलगा असल्यास आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू आहे. मात्र त्यांच्या आई-वडीलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • लाभार्थीचा जन्मदाखला.
  • कुटुंब प्रमुखाचा तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
  • लाभार्थीचे आधारकार्ड (प्रथम लाभाच्यावेळी ही अट शिथिल आहे).
  • आई-वडील किंवा पालकांचे आधारकार्ड.
  • बँकेच्या पासबूकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • पिवळे किंवा केशरी रेशनकार्डची साक्षांकित प्रत (Ration Card Xerox Copy).
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे नाव मतदार यादीत असल्याचा दाखला).
  • संबंधित टप्प्यातील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला.
  • कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (अटी व शर्तीमधील अटीनुसार).
  • अं‍तिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहिल. अविवाहित असल्याबद्दलचे लाभार्थ्यांचे स्वंय घोषणापत्र सादर करावे.

लेक लाडकी योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

  • लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आई-वडीलांनी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्याची नोंद संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत करावी.
  • त्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जांची छाननी केल्यानंतर काही कागदपत्रे कमी असल्यास किंवा एखादा अर्ज पूर्ण भरलेला नसल्यास 15 दिवसांच्या आत अर्जदाराला तसे कळवून 1 महिन्याच्या आत त्याची योग्य पूर्तता करून घ्यावी.
  • अपरिहार्य कारणास्तव विहित मुदतीत अर्ज न आल्यास वाढीव 10 दिवसांची मुदत मिळू शकेल. अशाप्रकारे कमाल 2 महिन्यांच्या आत अर्जावरची कार्यवाही पूर्ण होईल.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे मिळतील? (Form)

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त – महिला व बालविकास कार्यालय येथे उपलब्ध होतील. अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून घ्यावा व तो अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.

लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? (How To Apply Online?)

योजनेचा लाभ देण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करता येऊ शकेल. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर (Official Website) लवकरच यासंबंधी अर्ज उपलब्द होईल. यासाठी वेबसाईट आहे – www.womenchild.maharashtra.gov.in

ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका किंवा नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका यांच्याकडून लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, तपासणे, पोर्टलवर अपलोड करणे ई. कामे केली जातील.

ग्रामीण भागात संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) किंवा शहरी भागात संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे अर्जाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे हे सर्व अर्ज मान्यतेसाठी सादर करतील.

लेक लाडकी योजने संबंधीत अर्जावर अंतिम मंजूरी

अर्जावर अंतिम मंजूरी हे संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) हे व मुंबई आणि मुंबई उपनगराबाबतीत नोडल अधिकारी यांना आहेत. ते यादीस मान्यता देतील व मंजूर यादी आयुक्त, महिला व बालविकास यांना सादर करतील.

राज्यस्तरावर महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती तर महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे.

योजनेचे पैसे कुठे मिळणार?

लाभाचे हस्तांतरण थेट डीबीटी प्रक्रियेद्वारे होईल. म्हणजेच डायरेक्ट बँक खात्यात पैसे पाठवले जातील. हे बँक खाते लाभार्थी मुलगी आणि आईच्या नावे असे संयुक्तपणे असेल. अर्ज सादर करतांना आईचा मृत्यू झाल्यास आईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जोडून मुलगी आणि वडील यांच्या संयुक्त नावे खाते उघडता येईल.

लाभार्थी कुटुंबाचे स्थलांतर झाल्यास करावे?

एखादे लाभार्थी कुटुंबाने योजनेतील एक अथवा काही टप्प्यातील लाभ घेतल्यानंतर राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ मिळण्यासाठी स्थलांतरीत झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकाऱ्याकडे त्यांना अर्ज सादर करावा लागेल. याचप्रमाणे एखादे कुटुंब दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झाले असेल आणि त्यांनी योजनेतील एक किंवा काही टप्प्यातील लाभ घेतले असतील तर पुढील टप्प्यातील लाभ मिळण्यासाठी त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योजनेचा कालावधी पाच वर्षांसाठी आहे. त्यानंतर योजना पुढे सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय होईल.

(Lek Ladki Yojana in Maharashtra: How to apply online, How to Submit form, Eligibility criteria, Benefits, Required Documents, Official website)

महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकार यांच्या इतर अनेक महत्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी ‘योजना – marathijan.com‘ या वेबसाईट पेजला भेट द्या.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top