Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना आजपासून डिसेंबरच्या दोन टप्प्यात मिळण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हफ्त्याची सर्वच पात्र लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल अशी माहिती दिली होती. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे, आणि या 7 ते 8 दिवसांत म्हणजेच डिसेंबर महिना अखेरपर्यंत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.

डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अगोदरच पात्र ठरलेल्या 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची पडताळणी अजून राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये बजेट नंतर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार सध्या डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. तर दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

Share this Post:

Leave a Comment

Scroll to Top